Monday, 19 January 2026

वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार फेलोंना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

 वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय

सुरक्षा व्यवहार फेलोंना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

 

मुंबईदि. १८: सहाव्या वार्षिक निःशस्त्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहार फेलोशिप कार्यक्रम अंतर्गत मुंबई येथे आलेल्या विविध ४० देशातील प्रतिनीधींना सह्याद्री अतिथीगृह येथे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात या प्रतिनीधींना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी मिळाली. यावेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे उपस्थित होते.

विविध ४० देशांतून आलेल्या फेलोंचे मुख्य राजशिष्टाचार अधिकारी श्री. गवांदे यांनी स्वागत करीत भारताच्या विविधांगी संस्कृतीचे महत्व विषद केले. त्यांनी मुंबईचे जागतिक आणि भारतातील महत्व अधोरेखित करीत महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी माहिती दिली.

यावेळी लावणीपंढरपूर वारी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील गीतनाट्य सादर करण्यात आले.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi