Monday, 19 January 2026

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन

 सांस्कृतिक कार्य विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी

मराठी एकांकिका स्पर्धेचे आयोजन

-सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, छत्रपती संभाजी नगर, पुणे व अमरावती येथे प्राथमिक फेरीचे आयोजन

 

मुंबई दि. १८ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित महाराष्ट्र राज्य मराठी एकांकिका स्पर्धा यावर्षी चार विभागांतून साकार होत आहे. या स्पर्धेतून मराठी एकांकिका चळवळीत नवा इतिहास घडणार असल्याचा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे.

        

ही एकांकिका स्पर्धा यावर्षीपासून फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे. कोकण विभागातील स्पर्धेचे १९ ते २३ जानेवारी२०२६ या कालावधीत यशवंत नाट्य मंदिरमाटुंगा येथे आयोजन करण्यात येत आहे. याचबरोबर ही स्पर्धा पुणेअमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या चार प्रमुख विभागांत प्राथमिक फेरीच्या स्वरुपात घेण्यात येणार आहे. राज्यभरातून सहभागी होणाऱ्या नाट्यसंघांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

 

प्राथमिक फेरीत सादरीकरण करणाऱ्या संघांमधून प्रत्येक विभागातून ५ उत्कृष्ट संघांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार असूनअशा प्रकारे एकूण २० संघ अंतिम टप्प्यात पोहोचणार आहेत. 

       

विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण प्राथमिक फेरी निशुल्क ठेवण्यात आली आहे. जास्तीत जास्त नाट्यसंघांनी व रसिक प्रेक्षकांनी या एकांकिका स्पर्धेतील नाटकांचा लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

     

मराठी रंगभूमीतील नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणेएकांकिका चळवळीला नवसंजीवनी देणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा अधिक समृद्ध करणेहाच या भव्य स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi