Saturday, 17 January 2026

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिपला मंजुरी

 मुंबईत पोलीस अधिकारीकर्मचाऱ्यांसाठी ४५ हजार शासकीय निवासस्थाने

मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिपला मंजुरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारीकर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध व्हावीत यादृष्टीने "मुंबई पोलीस हाऊसिंग टाऊनशिप प्रकल्प राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हा प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाची राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. या टाऊनशिप प्रकल्पाद्वारे सुमारे पाच कोटी चौरस फूट क्षेत्राचे विकसन करण्यात येणार असूनत्यासाठी सुमारे २० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या टाऊनशिपसाठी लागणारा ३० टक्के निधी शासन देणार आहे. तर उर्वरित ७० टक्के निधी एमएसआयडीसी शासन हमीद्वारे विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरुपात उभारणार आहे. या प्रकल्पाचा तांत्रिक व आर्थिक सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी आणि प्रकल्प सुरु करण्याकरिता महामंडळास १०० कोटी रुपयांचा प्राथमिक निधी देण्यास आज मान्यता देण्यात आली.

मुंबईतील वाढत्या लोकसंख्येच्या व सुरक्षेची आवश्यकता लक्षात घेऊनपोलीस दलातील अधिकारीकर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज व अद्ययावत वसाहती व निवासस्थानांची मोठी गरज आहे. यामुळे पोलीस दलातील अधिकारीकर्मचारी अधिक तत्पर आणि कार्यक्षमरित्या कर्तव्य बजावू शकणार आहेत.

मुंबई पोलीस दलात ५१ हजार ३०८ इतके मनुष्यबळ आहे. पोलीस दलाकडे उपलब्ध सेवा निवासस्थाने ब्रिटीशकालीन जुन्या व जीर्ण इमारतींमध्ये आहेत. उपलब्ध २२ हजार ९०४ सेवा निवासस्थानांपैकी सुमारे ३ हजार ७७७ निवासस्थाने वापरासाठी अयोग्य आहेत. याशिवाय दरमहा सुमारे चारशे ते पाचशेहून अधिक अधिकारी-कर्मचारी निवासस्थानांसाठी अर्ज करतात. निवासस्थाने उपलब्ध नसल्याने मुंबई पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दररोज प्रवास करून कामाच्या ठिकाणी यावे लागते. पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामांचे स्वरूप पाहतात्यांना कार्यालयाजवळ निवासस्थान असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीकोनातून टाऊनशिप प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.


हिती व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन

 हिती व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले.

तसेच २४ जानेवारी रोजी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथून निघणाऱ्या पालखी मिरवणुकीचे स्वागत करून मोठ्या संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन करीत या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याने सेवा व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांनी अधिकाधिक योगदान देण्याचे जिल्हाधिकारी श्री.कर्डिले यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी दोन दिवसांत ८ ते १० लाख भाविक नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता असूनत्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणांसह सामाजिक संघटनांनी सज्ज राहणे आवश्यक आहेअसे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या बाहेरपार्किंग स्थळीस्टॉलसाठी आवश्यक साहित्य आणण्यासाठी वाहने व संबंधित व्यक्तींना प्रवेश पासेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्यसेवा आणि  प्रेरणा देणारा ऐतिहासिक सोहळा असल्याने जास्तीत जास्त सामाजिक संघटनांनी पुढे येऊन सहभाग घ्यावा व हिंद-दी-चादर शहीदी समागम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावाअसे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या एकूण नियोजनाची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी उपस्थितांना दिली.

00000

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा

 हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी

सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा

- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

नांदेडदि. १७ : ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदाननांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्थासंघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावाअसे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकरजिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळेकार्यकारी अधिकारी तथा समन्वयक डॉ. जगदीश सकवान,तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.

मोदी मैदानावर कार्यक्रमस्थळी सुमारे ३५० स्टॉल उभारण्यात येणार असून प्रत्येक सामाजिक संघटनेने किमान ५ ते १० स्टॉल उभारून भाविकांना सेवा द्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले. हे स्टॉल दोन्ही दिवस सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. प्रत्येक स्टॉलवर संबंधित संघटनेचे बॅनर लावण्यात येणार असून भाविकांसाठी पिण्याचे पाणीप्रसादअल्पोपहारमाहिती व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले.

पु.ल.देशपांडे अकादमी येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन

 पु.ल.देशपांडे अकादमी येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन

 

मुंबईदि. १७ : राज्य शासनाने गणेशोत्सवास राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. या महोत्सवांतर्गत विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गतपु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमुंबईसांस्कृतिक कार्य विभाग यांच्यावतीने दि. २२, २३ व २४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता अकादमी संकुलातील तिसऱ्या मजल्यावरील लघुनाट्यगृहात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

या व्याख्यानमालेंतर्गत दि. 22 जानेवारी रोजी ज्येष्ठ लेखकविश्लेषक व अभ्यासक अच्युत गोडबोले यांचे ‘ए आय तंत्रज्ञान व कलाविश्व’दि. २३ जानेवारी रोजी पुरातत्वशास्त्रज्ञ आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या युनेस्को नामांकनाचा रोमांचक प्रवास’ आणि दि. २४ जानेवारी रोजी मराठी भाषा विभाग व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे अभिजात ‘मराठी: इतिहास वर्तमान व भविष्यया विषयांवर व्याख्यान होणार आहे.

 

ही व्याख्यानमाला विनामूल्य असूनसर्वांसाठी प्रवेश खुला आहे. या व्याख्यानांचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केले आहे.

००००


मतदान प्रक्रियेत सहभागी झालेले निवडणूक अधिकारी, कर्मचारी, पोलीस यंत्रणा तसेच इतर संबंधित

 संपूर्ण निवडणूक कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा व अधिकारी-कर्मचारीकामगार अहोरात्र कार्यरत होते. यासोबतच मुंबई पोलीस दलातील सुमारे ३० हजार अधिकारी व अंमलदार प्रत्यक्ष बंदोबस्तात कार्यरत होते. तसेच केंद्र शासनराज्य शासनविविध प्राधिकरणेबँका आणि निमशासकीय संस्थांमधील अधिकारी-कर्मचारी यांनीही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान दिले.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि माननीय राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनानुसार अधिकारी व कर्मचारीकामगार यांनी आपली जबाबदारी अत्यंत दक्षतेने पार पाडली.

मतदान प्रक्रियेत सहभागी झालेले निवडणूक अधिकारीकर्मचारीपोलीस यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांनी दाखविलेल्या शिस्तबद्ध व समर्पित कामगिरीबाबत महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे. सर्व संबंधित यंत्रणांमधील समन्वयामुळे मतदान प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकलीअसे त्यांनी नमूद केले.

लोकशाहीचा हा महत्त्वाचा उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्व घटकांनी दाखविलेल्या जबाबदारीमुळेच निवडणूक प्रक्रिया विश्वासार्ह व प्रभावी ठरली आहे. भविष्यातही प्रशासकीय कामकाजात सर्वच घटकांचे अशाच प्रकारचे सहकार्य अपेक्षित असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.अश्विनी जोशी यांनी नमूद केले आहे.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे संपन्न महानगरपालिका प्रशासनाने मानले मुंबईकरांचे आभार

  

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे संपन्न

महानगरपालिका प्रशासनाने मानले मुंबईकरांचे आभार

 

मुंबईदि.१७ : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत पार पडलेल्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सर्व घटकांचे सहकार्य लाभले. मुंबईकर मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदानाचा हक्क बजावला. एकूणच संपूर्ण निवडणूक मतदान प्रक्रिया शांततेतपारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी मुंबईकर नागरिकसर्व राजकीय पक्षउमेदवारकार्यकर्तेप्रसार माध्यमसर्व यंत्रणांनी मोलाचे सहकार्य केले.

या सहकार्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणीअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी तसेच विशेष कार्य अधिकारी (निवडणूक)  विजय बालमवारसहआयुक्त (करनिर्धारण व संकलन)  विश्वास शंकरवारअपर जिल्हाधिकारी (कोकण विभाग) तथा महानगरपालिका निवडणूक समन्वयक सहायक फरोग मुकादमसहायक आयुक्त (कर निर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे यांनी सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार मानले.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या २२७ नगरसेवक निवडीसाठी गुरुवारदिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. एकूण मिळून १० हजार २३१ मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधामतदारांसाठी आवश्यक सोयी-सुविधादिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्थापिण्याचे पाणीस्वच्छता तसेच रॅम्प व मार्गदर्शक सूचना यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. एकूण ६४ हजार ३७५ मनुष्यबळाच्या प्रभावी व्यवस्थापनासह ४ हजार ५०० स्‍वयंसेवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविला.

या निवडणुकीत मुंबई महानगरातील १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदारांपैकी सुमारे ५४ लाख ७६ हजार ०४३ मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. त्‍यात पुरूष मतदारांची संख्‍या २९ लाख २३ हजार ४३३ इतकीमहिला मतदारांची संख्‍या २५ लाख ५२ हजार ३५९ तर इतर मतदारांची संख्‍या २५१ इतकी आहे. एकूण ५२.९४ टक्के मतदानाची नोंद झाली.

विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान

 विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान

या वर्षीच्या दीक्षान्त समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर मिळून विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ८४ हजार ३१८ मुले आणि ८८ हजार २०२ मुलींचा समावेश असून इतर ०२ विद्यार्थी समाविष्ट आहेत. यामध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी १ लाख ४९ हजार ९८२ विद्यार्थ्यांचा समावेश असून पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २२ हजार ५४० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी ७४ हजार ७२९ मुले आणि ७५ हजार २५२ मुलींचा समावेश आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ९ हजार ५८९ मुले आणि १२ हजार ९५० मुलींचा समावेश असून इतर १ विद्यार्थ्याचा समावेश आहे.

Featured post

Lakshvedhi