Saturday, 17 January 2026

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा

 हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी

सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा

- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

 

नांदेडदि. १७ : ‘हिंद-दी-चादर’ अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदाननांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्थासंघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावाअसे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकरजिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळेकार्यकारी अधिकारी तथा समन्वयक डॉ. जगदीश सकवान,तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.

मोदी मैदानावर कार्यक्रमस्थळी सुमारे ३५० स्टॉल उभारण्यात येणार असून प्रत्येक सामाजिक संघटनेने किमान ५ ते १० स्टॉल उभारून भाविकांना सेवा द्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी केले. हे स्टॉल दोन्ही दिवस सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. प्रत्येक स्टॉलवर संबंधित संघटनेचे बॅनर लावण्यात येणार असून भाविकांसाठी पिण्याचे पाणीप्रसादअल्पोपहारमाहिती व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi