Friday, 16 January 2026

महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल

 महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल

-         आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

 

मुंबई, दि. 16 :- महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या, मेनोपॉज म्हणजे महिलांच्या आयुष्यातील अत्यंत संवेदनशील टप्पा. या काळात होणारे शारीरिक बदलमानसिक ताणहॉर्मोन असंतुलनहाडांचे आजारझोपेचे विकार व नैराश्य याकडे आजवर दुर्लक्ष होत होते. हीच गरज ओळखून  राज्य शासनाने महिलांसाठी मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले की, या क्लिनिकच्या माध्यमातूनतज्ज्ञांकडून वैद्यकीय सल्लामानसिक आरोग्य समुपदेशनहाडेहृदय व हॉर्मोन तपासणीऔषधोपचार व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे. देशात प्रथमच अशा प्रकारचे ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे. महिलांच्या आरोग्याबाबत राज्य शासनाने उचललेले हे पाऊल इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

मेनोपॉज हा आजार नाहीतर महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. मात्र या टप्प्यात महिलांना शारीरिक आणि मानसिक आधाराची अत्यंत गरज असते. राज्यातील प्रत्येक महिलेला या काळात योग्य सल्लाउपचार आणि सन्मान मिळावा, यासाठीच मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 19 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 जिल्हा युवा पुरस्कारासाठी 19 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

 मुंबईदि. १५ : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकयुवतींमुळे समाजात युवाशक्तीची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. युवकांना मानव संसाधन विकासाचा प्रमुख स्रोत मानले जात असून विकास प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या अनुषंगाने राज्याच्या युवा धोरण २०१२ नुसार राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

 

मुंबई शहर जिल्ह्यातील पात्र युवकयुवती व संस्थांनी २०१९-२० ते २०२४-२५ या कालावधीसाठी जिल्हा युवा पुरस्कारासाठी १९ जानेवारी २०२६ पर्यंत अर्ज करावेतअसे आवाहन मुंबई शहराचे जिल्हा क्रीडा अधिकारी मार्क धरमाई यांनी केले आहे.

 

पुरस्कारासाठीचे अर्ज भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुलदुसरा मजलाजिल्हा क्रीडा अधिकारीमुंबई शहर कार्यालयधारावी येथे सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

समाजातील दुर्बल घटकअनुसूचित जाती-जमातीआदिवासी भागतसेच शिक्षणरोजगारआरोग्यपर्यावरणसंस्कृतीकलाक्रीडाविज्ञान-तंत्रज्ञानउद्योगमहिला सक्षमीकरणस्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंधव्यसनमुक्ती आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवकयुवती व संस्थांना जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी 9594369561 या क्रमांकावर संपर्क साधावाअसेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार

 

टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच

अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार

 

मुंबईदि. १५ : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गतनिवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक २०० ते २०६) यांनी टपाली मतपत्रिकांबाबत दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व उमेदवारांना पाठविलेले पत्र अनावधानाने प्रसारित झाले होते. पत्र तत्काळ मागे घेण्यात आले असून त्याऐवजी सुधारित पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसारगुरुवार१५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता टपाली मतपत्रिकांच्या पेट्या अभिरक्षा कक्षातून (स्टाँग रुमबाहेर काढण्यात येणार नाहीत.

 

राज्‍य निवडणूक आयोगमहाराष्‍ट्र यांच्‍या आदेशानुसारटपाली मतपत्रिकेच्‍या पेट्या मतदान यंत्रासह (ईव्हीएममतमोजणीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारदिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी अभिरक्षा कक्षातून बाहेर काढण्‍यात येतील. त्या अनुषंगानेउमेदवार किंवा उमेदवाराने अधिकृतरीत्या नेमलेले प्रतिनिधी यांनी नमूद केलेल्या वेळेत उपस्थित राहावेअसे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे. टपाली मतपत्रिकांचे प्रभागनिहाय विलगीकरण (Segregation) देखील त्याचवेळेला करण्यात येणार आहेअसे मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

0000

हिंदूहृदयसम्राटबाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ हे देखील सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत कार्यरत

 त्याचबरोबर 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ हे देखील सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत कार्यरत आहेत. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेची रुग्णालयेखासगी रुग्णालये इत्यादींना देखील वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने तत्पर राहण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींमुळे आणि करण्यात आलेल्या विविध स्तरीय नियोजनामुळे गरजूंना तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहेअशी ही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे देण्यात येत आहे.

प्रामुख्याने ३ हजार ३०० पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या चमू कार्यरत

 याबाबत अधिक माहिती देताना कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी सांगितले कीमहानगरपालिका आयुक्त भूषण गगराणीअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार व उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांच्या ठिकाणी प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ३ हजार ३०० पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या चमू कार्यरत आहेत. तसेच गरज भासल्यास गरजू रुग्णाला तत्काळ रुग्णालयात नेणे सुलभ व्हावीयासाठी ८० रुग्णवाहिका देखील तैनात ठेवण्यात आल्या आहेत. प्राथमिक वैद्यकीय सेवा सुविधेच्या दृष्टीने आवश्यक असणारी औषधेगोळ्याइंजेक्शन्स इत्यादी देखील सर्व वैद्यकीय चमूंकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

लोकशाही उत्सवात सहभाग नोंदविणाऱ्या मुंबईकरांच्या सेवेसाठी महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग तत्पर · महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व रुग्णवाहिकांसह १,६७४ चमू कार्यरत

 लोकशाही उत्सवात सहभाग नोंदविणाऱ्या मुंबईकरांच्या सेवेसाठी

महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग तत्पर

·         महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय अधिकारीपरिचारिका व रुग्णवाहिकांसह १,६७४ चमू कार्यरत

·         मतदारांसह निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा उपलब्ध

 

मुंबई, दि.१५ : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सकाळी लोकशाहीच्या उत्सवास प्रारंभ झाला. ज्येष्ठ नागरिकांसह प्रथमच मतदार झालेले नव मतदार अत्यंत उत्साहाने या मतदान प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवीत आहेत. या मतदारांना आणि निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही वैद्यकीय गरज भासल्यासवैद्यकीय मदत तत्काळ उपलब्ध व्हावीया हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुढाकाराने महानगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांच्या ठिकाणी प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याकरिता वैद्यकीय अधिकारीपरिचारिका आणि संबंधित वैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश असलेल्या १ हजार ६७४ चमू कर्तव्य तत्पर आहेतअशी माहिती महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.

 

मतमोजणीसाठी ७५९ पर्यवेक्षक आणि ७७० सहायक यांच्‍यासह ७७० चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्त

 मतमोजणीसाठी ७५९ पर्यवेक्षक आणि ७७० सहायक यांच्‍यासह ७७० चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. मतमोजणी अधिकारीपर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रणवाहनतळ व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी अधिकृत प्रतिनिधीउमेदवारतसेच माध्‍यम प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे. मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने ज्या व्यक्तींना ओळखपत्र दिले आहेअशा पात्र व्यक्तींनाच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. राज्‍य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडावीनागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ व्हावाया दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामकाज करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले आहेत.

Featured post

Lakshvedhi