Friday, 16 January 2026

टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार

 

टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच

अभिरक्षा कक्षातून बाहेर काढणार

 

मुंबईदि. १५ : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गतनिवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक २०० ते २०६) यांनी टपाली मतपत्रिकांबाबत दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व उमेदवारांना पाठविलेले पत्र अनावधानाने प्रसारित झाले होते. पत्र तत्काळ मागे घेण्यात आले असून त्याऐवजी सुधारित पत्र निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसारगुरुवार१५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता टपाली मतपत्रिकांच्या पेट्या अभिरक्षा कक्षातून (स्टाँग रुमबाहेर काढण्यात येणार नाहीत.

 

राज्‍य निवडणूक आयोगमहाराष्‍ट्र यांच्‍या आदेशानुसारटपाली मतपत्रिकेच्‍या पेट्या मतदान यंत्रासह (ईव्हीएममतमोजणीच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारदिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी अभिरक्षा कक्षातून बाहेर काढण्‍यात येतील. त्या अनुषंगानेउमेदवार किंवा उमेदवाराने अधिकृतरीत्या नेमलेले प्रतिनिधी यांनी नमूद केलेल्या वेळेत उपस्थित राहावेअसे सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे. टपाली मतपत्रिकांचे प्रभागनिहाय विलगीकरण (Segregation) देखील त्याचवेळेला करण्यात येणार आहेअसे मुंबई महानगर पालिकेच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi