लोकशाही उत्सवात सहभाग नोंदविणाऱ्या मुंबईकरांच्या सेवेसाठी
महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग तत्पर
· महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व रुग्णवाहिकांसह १,६७४ चमू कार्यरत
· मतदारांसह निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा उपलब्ध
मुंबई, दि.१५ : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सकाळी लोकशाहीच्या उत्सवास प्रारंभ झाला. ज्येष्ठ नागरिकांसह प्रथमच मतदार झालेले नव मतदार अत्यंत उत्साहाने या मतदान प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवीत आहेत. या मतदारांना आणि निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही वैद्यकीय गरज भासल्यास, वैद्यकीय मदत तत्काळ उपलब्ध व्हावी, या हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुढाकाराने महानगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांच्या ठिकाणी प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याकरिता वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि संबंधित वैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश असलेल्या १ हजार ६७४ चमू कर्तव्य तत्पर आहेत, अशी माहिती महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment