त्याचबरोबर 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ हे देखील सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत कार्यरत आहेत. त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिकेची रुग्णालये, खासगी रुग्णालये इत्यादींना देखील वैद्यकीय सेवेच्या दृष्टीने तत्पर राहण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. या सर्व बाबींमुळे आणि करण्यात आलेल्या विविध स्तरीय नियोजनामुळे गरजूंना तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे, अशी ही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे देण्यात येत आहे.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Friday, 16 January 2026
प्रामुख्याने ३ हजार ३०० पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या चमू कार्यरत
याबाबत अधिक माहिती देताना कार्यकारी आरोग्य अधिकारी यांनी सांगितले की, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनानुसार व उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांच्या ठिकाणी प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने ३ हजार ३०० पेक्षा अधिक वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या चमू कार्यरत आहेत. तसेच गरज भासल्यास गरजू रुग्णाला तत्काळ रुग्णालयात नेणे सुलभ व्हावी, यासाठी ८० रुग्णवाहिका देखील तैनात ठेवण्यात आल्या आहेत. प्राथमिक वैद्यकीय सेवा सुविधेच्या दृष्टीने आवश्यक असणारी औषधे, गोळ्या, इंजेक्शन्स इत्यादी देखील सर्व वैद्यकीय चमूंकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
लोकशाही उत्सवात सहभाग नोंदविणाऱ्या मुंबईकरांच्या सेवेसाठी महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग तत्पर · महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व रुग्णवाहिकांसह १,६७४ चमू कार्यरत
लोकशाही उत्सवात सहभाग नोंदविणाऱ्या मुंबईकरांच्या सेवेसाठी
महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग तत्पर
· महानगरपालिका क्षेत्रात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व रुग्णवाहिकांसह १,६७४ चमू कार्यरत
· मतदारांसह निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा उपलब्ध
मुंबई, दि.१५ : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सकाळी लोकशाहीच्या उत्सवास प्रारंभ झाला. ज्येष्ठ नागरिकांसह प्रथमच मतदार झालेले नव मतदार अत्यंत उत्साहाने या मतदान प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवीत आहेत. या मतदारांना आणि निवडणूक कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही वैद्यकीय गरज भासल्यास, वैद्यकीय मदत तत्काळ उपलब्ध व्हावी, या हेतूने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या पुढाकाराने महानगरपालिका क्षेत्रातील मतदान केंद्रांच्या ठिकाणी प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याकरिता वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि संबंधित वैद्यकीय कर्मचारी यांचा समावेश असलेल्या १ हजार ६७४ चमू कर्तव्य तत्पर आहेत, अशी माहिती महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
मतमोजणीसाठी ७५९ पर्यवेक्षक आणि ७७० सहायक यांच्यासह ७७० चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्त
मतमोजणीसाठी ७५९ पर्यवेक्षक आणि ७७० सहायक यांच्यासह ७७० चतुर्थश्रेणी कर्मचारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. मतमोजणी अधिकारी, पर्यवेक्षक व सहाय्यक कर्मचाऱ्यांना पूर्व प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र परिसरात वाहतूक नियंत्रण, वाहनतळ व्यवस्था तसेच प्रसारमाध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. निकाल जाहीर करताना अचूकता व पारदर्शकता राखण्यासाठी संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी अधिकृत प्रतिनिधी, उमेदवार, तसेच माध्यम प्रतिनिधींनी वेळेत उपस्थित राहावे. मतमोजणी प्रक्रियेसाठी निवडणूक विभागाने ज्या व्यक्तींना ओळखपत्र दिले आहे, अशा पात्र व्यक्तींनाच मतमोजणीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडावी, नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ व्हावा, या दृष्टीने सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामकाज करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी दिले आहेत.
निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून निवडणूक मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार
महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून निवडणूक मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रांची रचना व नियोजन, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, तसेच अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा सविस्तर आढावा घेऊन त्याबाबतचा तपशील अंतिम करण्यात आला आहे. मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधण्यात आला आहे. आवश्यक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असेही आयुक्त गगराणी यांनी स्पष्ट केले.
मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला.
महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी (कोकण विभाग) फरोग मुकादम, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) गजानन बेल्लाळे, उपजिल्हाधिकारी महादेव किरवले यांच्यासह २३ निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण २२७ निवडणूक प्रभागांकरिता एकूण २३ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी प्रक्रियेकरिता प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय अंतर्गत अभिरक्षा कक्ष (Strong Room) व मतमोजणीची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस विभागाकडून आवश्यक ती मान्यता प्राप्त झाली आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...