Friday, 9 January 2026

मुख्यमंत्री फडणवीस ने पुरंदर विमानतल परियोजना से प्रभावित सात गांवों के ग्रामीणों से संवाद साधा।

 मुख्यमंत्री फडणवीस ने पुरंदर विमानतल परियोजना से प्रभावित सात गांवों के ग्रामीणों से संवाद साधा। इस अवसर पर पूर्व मंत्री विजय शिवतारेअपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्तापरिवहन विभाग के अपर मुख्य सचिव संजय सेठीउद्योग विभाग के प्रधान सचिव पी. अन्बलगनमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडल के मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासूपुणे जिलाधिकारी जितेंद्र डुडी तथा परियोजना-प्रभावित गांवों के नागरिक उपस्थित थे।

 

पुरंदर विमानतल से पुणे क्षेत्र के औद्योगिक विकास को बढ़ावा

 पुरंदर विमानतल से पुणे क्षेत्र के औद्योगिक विकास को बढ़ावा

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विमानतल परियोजना से प्रभावित गांवों के प्रतिनिधियों से मुख्यमंत्री का संवाद

 

• पुरंदर विमानतल के लिए भूमि अधिग्रहण में अधिकतम दर देने पर विचार

• विमानतल परिसर में छत्रपति संभाजी महाराज की भव्य प्रतिमा स्थापित की जाएगी

• परियोजना-प्रभावित किसानों के बच्चों के लिए कौशल विकास केंद्रनौकरियों में प्राथमिकता

• परियोजना-प्रभावितों को विशेष रूप से परियोजना-ग्रस्त प्रमाणपत्र दिया जाएगा

 

मुंबई23 दिसंबर:पुणे में अनेक उद्योग आने के लिए इच्छुक हैं और इसके लिए पुरंदर विमानतल अत्यंत महत्वपूर्ण साबित होगा। इस विमानतल से पुणे और आसपास के क्षेत्र के औद्योगिक विकास को गति मिलेगी। यह केवल यात्री विमानतल नहीं बल्कि कार्गो विमानतल भी होगाजिससे नाशवान (परिशेबल) वस्तुओं के व्यापार को विशेष लाभ मिलेगा। इस परियोजना से पुरंदर और आसपास के नागरिकों को बड़ा फायदा होगा तथा पुणे के सकल घरेलू उत्पाद (जीडीपी) में कम से कम 2 प्रतिशत की वृद्धि होगीऐसा प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया।

 

सोलापूर जिल्ह्यातील अरण (ता. माढा) येथे असलेल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज स्मारकाच्या

 सोलापूर जिल्ह्यातील अरण (ता. माढा) येथे असलेल्या श्री संत शिरोमणी सावता महाराज स्मारकाच्या विकासासाठी देखील स्वतंत्र आढावा  घेण्यात आला. या बैठकीत तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करावीतसेच विकास आराखड्यातील कामांना गती देण्याच्या सूचना मंत्री गोरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

००००

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या विकासासाठी भूसंपादन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी

 ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या विकासासाठी

 भूसंपादन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

 

मुंबई, दि. २३ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व संत सावता महाराज स्मारकांच्या भूसंपादनाची प्रक्रिया कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण करुन त्यानंतर कार्यादेश लवकरात लवकर जारी करण्यात यावाअशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

 

राज्यातील महापुरुषांच्या स्मारकांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सातारा व सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

 अभियानाच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी पारंपरिक तसेच आधुनिक माध्यमांचा प्रभावी वापर करावा. ग्रामसभांमधून जनजागृती करणेमाहिती फलकभित्तीपत्रकेडिजिटल माध्यमे तसेच सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून अभियानाची उद्दिष्टेलाभ आणि अपेक्षित सहभाग नागरिकांपर्यंत पोहोचवावाअशा सूचना त्यांनी दिल्या.

 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हा केवळ प्रशासकीय उपक्रम नसून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी एक लोकचळवळ आहे. त्यामुळे सर्व अधिकारीकर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे प्राधान्य देऊन काम केल्यास गाव विकासाच्या प्रक्रियेला गती मिळेल आणि राज्यातील पंचायतराज व्यवस्था अधिक सक्षम बनेलअसा विश्वास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचार व प्रसिध्दीच्या अनुषंगाने

 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रचार व प्रसिध्दीच्या अनुषंगाने मंत्रालयात आढावा बैठकीत ते बोलत होते, यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत राज्यभरात अभियानाची अंमलबजावणीप्रचाराच्या कार्यपद्धती आणि जनसहभाग वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले कीमुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे ग्रामविकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि परिवर्तनकारी अभियान असून त्याची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. जिल्हा परिषदांनी या अभियानाला सर्वोच्च प्राधान्य देऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. पंचायत समितीग्रामपंचायतविविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी समन्वयाने काम केल्यासच अभियानाचा अपेक्षित परिणाम साध्य होईल.

वेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन cons.caracas@mea.gov.in ,किंवा +58-412-9584288

 वेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी'

नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

 

नवी दिल्ली 4: वेनेझुएलातील अलीकडील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायझरी) जारी केली आहे. वेनेझुएलातील सद्यस्थिती पाहताभारतीय नागरिकांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय त्या देशाचा प्रवास करणे टाळावेअसे आवाहन केंद्र सरकारकडून अधिकृतपणे करण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसारजे भारतीय नागरिक सध्या वेनेझुएलामध्ये वास्तव्यास आहेतत्यांनी कमालीची सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. तेथील भारतीयांनी आपल्या हालचालींवर मर्यादा ठेवाव्यात आणि शक्यतो सुरक्षित ठिकाणी राहावेअशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेचकोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी काराकस येथील भारतीय दूतावासाच्या सातत्याने संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावासाने संपर्क यंत्रणा सज्ज ठेवली असूननागरिक cons.caracas@mea.gov.in  या ईमेलवर किंवा +58-412-9584288 या तातडीच्या फोन नंबरवर संपर्क साधू शकतात. परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून भारतीय प्रवाशांनी या सूचनांचे पालन करावेअसे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

000

Featured post

Lakshvedhi