Friday, 9 January 2026

विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ कार्यक्रम में राज्यपाल आचार्य देवव्रत का युवाओं से संवाद

 विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ कार्यक्रम में राज्यपाल आचार्य देवव्रत का युवाओं से संवाद

भारतीय संस्कृति की विरासत को संजोते हुए युवाओं को भारत को विकसित राष्ट्र बनाने में योगदान देना चाहिए

-राज्यपाल आचार्य देवव्रत

 

मुंबईदि. 7 : भारत को वर्ष 2047 तक एक विकसित राष्ट्र बनाने के संकल्प में युवाओं की भूमिका अत्यंत महत्वपूर्ण और मूल्यवान है। देश के सर्वांगीण विकास के लिए युवाओं को अपने विचारकर्म और नवाचार के माध्यम से आगे आना चाहिए तथा भारतीय संस्कृति की विरासत को संजोते हुए विकसित भारत के निर्माण में योगदान देना चाहिएऐसा आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत ने किया।

 

राष्ट्रीय युवा महोत्सव – विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2025–26 की राष्ट्रीय प्रतियोगिता के लिए राज्य से चयनित युवाओं से राज्यपाल आचार्य देवव्रत ने वीडियो कान्फरन्सिंग के माध्यम से संवाद किया।

 

सह्याद्री अतिथिगृह में आयोजित इस कार्यक्रम में खेल विभाग के प्रधान सचिव संजय खंदारेराज्यपाल के सचिव डॉ. प्रशांत नारनवरेसह सचिव एस. राममूर्तिखेल विभाग के उप सचिव सुनील पांढरेसहायक संचालक मिलिंद दीक्षितमुंबई विभाग की उप खेल संचालक सुवर्णा बारटक्के तथा राष्ट्रीय युवा महोत्सव के लिए चयनित विद्यार्थी उपस्थित थे।

 

राष्ट्रीय युवा महोत्सव में सहभागिता राज्य के युवाओं के लिए गौरवपूर्ण और प्रेरणादायी विषय हैऐसा उल्लेख करते हुए राज्यपाल आचार्य देवव्रत ने दिल्ली में आयोजित संवाद कार्यक्रम के लिए चयनित युवाओं को शुभकामनाएं दीं।

२०२५-२६ या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे दिल्ली येथे ९ जानेवारी २०२६ पासून आयोजनडिझाईन फॉर भारत आणि हॅक फॉर सोशल कॉज या स्पर्धेतून ५ स्पर्धकांची निवड

 २०२५-२६ या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे दिल्ली येथे ९ जानेवारी २०२६ पासून आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव-विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या अंतर्गत ऑन लाईन स्पर्धा प्रथम टप्पा विकसित भारत क्विजव्दितीय टप्पा निबंध लेखन स्पर्धातृतीय टप्पा –विकसीत भारत पीपीटी चॅलेंज अशी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतून राज्यामधून ४५ युवांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच जिल्हाविभाग व राज्यस्तरीय युवा महोत्सव अंतर्गत सांस्कृतिक विभागातून २८ कलाकारांची आणि डिझाईन फॉर भारत आणि हॅक फॉर सोशल कॉज या स्पर्धेतून ५ स्पर्धकांची निवड करण्यात आली आली आहे. राज्यातून निवड झालेल्या युवक व त्यांच्यासोबत असलेल्या अधिकारी  वर्गासह ८५ जणांचा चमू दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी आज मुंबई येथून रवाना झाला.

०००००

स्टार्टअप्स, आत्मनिर्भर भारत अभियानामुळे भारत जागतिक पातळीवर वेगाने

 राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणालेदेश सर्व क्षेत्रात प्रगती करीत असून

स्टार्टअप्सआत्मनिर्भर भारत अभियानामुळे भारत जागतिक पातळीवर वेगाने प्रगती करत आहे. भारत आज जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला असूनतिसऱ्या क्रमांकाकडे वाटचाल करीत आहे. विकासाचा लाभ समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचत आहे. युवकांमध्ये देशाला आत्मनिर्भरसमृद्ध आणि शक्तिशाली बनविण्याची क्षमता असल्याचे सांगून राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले युवकांनी अपयश आल्यास खचून न जाता परिश्रमचिकाटी आणि सकारात्मक विचार करून विकसित राष्ट्र निर्माणात आपले योगदान द्यावे.

या संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांवरही राज्यपालांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी निवड झालेल्या युवकांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.


भारताने २०२६ या वर्षासाठी ‘इंटरनॅशनल आयडीईए’ या संस्थेच्या सदस्य राष्ट्रांच्या परिषदेचे

 भारताने २०२६ या वर्षासाठी ‘इंटरनॅशनल आयडीईए’ या संस्थेच्या सदस्य राष्ट्रांच्या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मांडलेल्या दृष्टिकोनानुसार ही परिषद आयोजित होत असून, “समावेशक, शांततापूर्ण, सक्षम आणि शाश्वत जगासाठी लोकशाही” ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे.


आयआयआयडीईएम चे महासंचालक राकेश वर्मा यांनी या परिषदेसंदर्भातील रूपरेषा मांडताना सांगितले की, ही परिषद निवडणूक व्यवस्थापन संस्थांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे व्यासपीठ ठरेल. निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या समकालीन आव्हानांवर सामूहिक चर्चा, सर्वोत्तम पद्धती व नावीन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण आणि संयुक्त उपाययोजनांची निर्मिती या परिषदेत होणार आहे. यावेळी आयआयसीडीईएम २०२६ च्या अधिकृत लोगोचे अनावरणही करण्यात आले.


या परिषदेत सहभागी प्रतिनिधींना भारताची निवडणूक व्यवस्था, प्रक्रिया तसेच तंत्रज्ञानाधारित नवकल्पना यांची माहिती देण्यात येणार असून, भारतीय निवडणुका जगातील लोकशाही व्यवस्थांसाठी आदर्श ठरत असल्याचे अधोरेखित केले जाणार आहे.


परिषदेच्या कार्यक्रमात उद्घाटन सत्र, निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रमुखांची विशेष बैठक, कार्यगट बैठका, ईसीआयनेट चे उद्घाटन तसेच जागतिक निवडणूक विषयांवरील आणि आंतरराष्ट्रीय मानकांवरील विविध विषयक सत्रांचा समावेश आहे.

‘इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट २०२६’ चे २१ ते २३ जानेवारीदरम्यान नवी दिल्ली येथे आयोजन

 इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट २०२६’ चे

२१ ते २३ जानेवारीदरम्यान नवी दिल्ली येथे आयोजन

 

मुंबईदि. ८ : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने २१ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयसीडीईएम२०२६’ या पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदचे आयोजन नवी दिल्लीतील भारत मंडपमयेथे करण्यात येणार आहे. ही तीन दिवसीय परिषद भारतीय आंतरराष्ट्रीय लोकशाही व निवडणूक व्यवस्थापन संस्था (आयआयआयडीईएममार्फतनिवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केली जाणार आहे.

भारतामध्ये निवडणूक व्यवस्थापन आणि लोकशाही विषयावरील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय परिषद ठरणार असूनजगभरातील विविध देशांच्या निवडणूक व्यवस्थापन संस्थांचे सुमारे १०० आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीआंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रतिनिधीभारतातील परराष्ट्र मिशनचे अधिकारी तसेच निवडणूक क्षेत्रातील तज्ज्ञ व अभ्यासक या परिषदेत सहभागी होणार आहेत.

राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

 राज्यातील 29 महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात

15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

 

मुंबईदि. ८ : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवारदिनांक १५ जानेवारी २०२६  रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदान क्षेत्रात 15 जानेवारी 2026 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना राज्य शासनाने प्रसिद्ध केली आहे.

 

अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीयनिमशासकीय कार्यालयेमहामंडळेमंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे.

 

 महानगरपालिका क्षेत्रांतील केंद्रशासनाची कार्यालयेनिमशासकीय कार्यालयेसार्वजनिक उपक्रमबँका व तत्सम आस्थापनांनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहीलअसे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

 

सार्वजनिक सुट्टी लागू असलेल्या महानगरपालिकांमध्ये बृहन्मुंबईठाणेनवी मुंबईउल्हासनगरकल्याणडोंबिवलीभिवंडीनिजामपूरमीराभाईंदरवसईविरारपनवेलनाशिकमालेगावअहिल्यानगरजळगावधुळेपुणेपिंपरीचिंचवडसोलापूरकोल्हापूरइचलकरंजीसांगलीमिरजकुपवाडछत्रपती संभाजीनगरनांदेडवाघाळापरभणीजालनालातूरअमरावतीअकोलानागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे.

 

मतदारांनी मतदानासाठी लोकशाहीच्या उत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावाअसे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहनdsomumbaisub@gmail.com

 राज्य क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन

मुंबई, दि. 8 : ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन १५ जानेवारी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने १२ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध क्रीडाविषयक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले आहे.

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करणे तसेच नवोदित खेळाडूंना दर्जेदार कामगिरी करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन देणेहा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यात १२ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत शाळा व महाविद्यालयांमध्ये पुढील उपक्रमांचे आयोजन करण्यात यावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमांतर्गत ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची जीवनगाथा व क्रीडा क्षेत्रातील त्यांचे योगदान याविषयी व्याख्यानेक्रीडा संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी रॅलीमॅरेथॉन स्पर्धाशालेय विद्यार्थ्यांसाठी विविध खेळांवरील नियमावलीऑलिम्पिक स्पर्धांसह अन्य महत्त्वाच्या स्पर्धांबाबत माहिती देणारी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात यावीत. तसेच ऑनलाईन माध्यमातून नामवंत खेळाडूंशी विद्यार्थ्यांचा संवादविविध खेळांचे प्रदर्शनीय सामनेविजेत्यांना पुरस्कार वितरण तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव करण्यात यावा.

राज्य क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व उपक्रमांच्या ठिकाणी जिल्हा क्रीडा कार्यालयाचा बॅनर लावणे अत्यावश्यक व अनिवार्य राहील.

या सर्व उपक्रमांचा सविस्तर अहवाल Instagram Reel, YouTube ध्वनिफित स्वरूपात तयार करून dsomumbaisub@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावा.

उत्कृष्ट नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या प्रथम तीन क्रमांकांच्या संस्थांना अनुक्रमे ₹१०,०००, ₹,००० व ₹५,००० रोख पारितोषिकगौरवपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहेअसे आवाहन मुंबई उपनगरच्या जिल्हा क्रीडा अधिकारी रश्मी आंबेडकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Featured post

Lakshvedhi