भारताने २०२६ या वर्षासाठी ‘इंटरनॅशनल आयडीईए’ या संस्थेच्या सदस्य राष्ट्रांच्या परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मांडलेल्या दृष्टिकोनानुसार ही परिषद आयोजित होत असून, “समावेशक, शांततापूर्ण, सक्षम आणि शाश्वत जगासाठी लोकशाही” ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे.
आयआयआयडीईएम चे महासंचालक राकेश वर्मा यांनी या परिषदेसंदर्भातील रूपरेषा मांडताना सांगितले की, ही परिषद निवडणूक व्यवस्थापन संस्थांमधील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे व्यासपीठ ठरेल. निवडणूक प्रक्रियेत येणाऱ्या समकालीन आव्हानांवर सामूहिक चर्चा, सर्वोत्तम पद्धती व नावीन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण आणि संयुक्त उपाययोजनांची निर्मिती या परिषदेत होणार आहे. यावेळी आयआयसीडीईएम २०२६ च्या अधिकृत लोगोचे अनावरणही करण्यात आले.
या परिषदेत सहभागी प्रतिनिधींना भारताची निवडणूक व्यवस्था, प्रक्रिया तसेच तंत्रज्ञानाधारित नवकल्पना यांची माहिती देण्यात येणार असून, भारतीय निवडणुका जगातील लोकशाही व्यवस्थांसाठी आदर्श ठरत असल्याचे अधोरेखित केले जाणार आहे.
परिषदेच्या कार्यक्रमात उद्घाटन सत्र, निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या प्रमुखांची विशेष बैठक, कार्यगट बैठका, ईसीआयनेट चे उद्घाटन तसेच जागतिक निवडणूक विषयांवरील आणि आंतरराष्ट्रीय मानकांवरील विविध विषयक सत्रांचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment