Thursday, 8 January 2026

2034 च्या फुटबॉल विश्वचषकासाठी 'प्रोजेक्ट महादेवा' मधून गुणवान खेळाडू मिळतील

 2034 च्या फुटबॉल विश्वचषकासाठी  'प्रोजेक्ट महादेवामधून गुणवान खेळाडू मिळतील

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जागतिक फुटबॉलपट्टू लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते

प्रोजेक्ट महादेवा'चा शुभारंभ

महाराष्ट्रातून निवडलेल्या 13 वर्षाखालील 60 बालफुटबॉलपटूंना विशेष प्रशिक्षण शिबिर व मार्गदर्शन

 

मुंबईदि.14: मिशन ऑलिम्पिक 2026 अंतर्गत महाराष्ट्रातून अधिकाधिक सुवर्णपदके मिळवणे आणि 2034 पर्यंत फुटबॉल विश्वचषकासाठी   तयारीचे लक्ष्य ठेवून 'प्रोजेक्ट महादेवाराबवण्यात येत आहे.या प्रोजेक्टमधून नक्कीच गुणवान खेळाडू मिळतीलअशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनातर्फे 'प्रोजेक्ट महादेवाया राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ  आज वानखेडे स्टेडियम येथे करण्यात  आला. 'प्रोजेक्ट महादेवाहा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग या विविध संस्थांच्या  विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

जागतिक फुटबॉलपट्टू  लिओनेल मेस्सीअर्जेंटीनचे माजी खेळाडू लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डिपॉलक्रीडामंत्री माणिकराव कोकाटेखासदार प्रफुल्ल पटेलभारतरत्न सचिन तेंडुलकरभारतीय लोकप्रिय फुटबॉलपटू सुनील छेत्रीभारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार राहुल भेकेमहाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्राचे)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशीश्रीमती अमृता देवेंद्र फडणवीसगोट टूर प्रमोटर सत्तादूर दत्ताटायगर श्रॉफ,  अजय देवगणकार्तिक आर्यनदिनों मोरियाजिंदाल ग्रुपच्या पार्थ जिंदलवेदना जिंदल यांनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

        मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'प्रोजेक्ट महादेवा'  हा महाराष्ट्र शासनाचा  महत्त्वाचा उपक्रम आहेजो संपूर्ण राज्यात तरुण फुटबॉल मधील  प्रतिभेचा (13 वर्षांखालील) शोध घेवून फुटबॉल मधील उच्च दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शिष्यवृत्तीपरदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी दिली जाणार आहे. निवडलेल्या 60 खेळाडूंची (30 मुले30 मुली) पाच वर्षांची संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती मिळणार आहे.  तसेच अव्वल खेळाडू नक्कीच फिफा विश्वचषक मध्ये खेळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कृषी विद्यापीठ अंतर्गत 20 मॉडेल नर्सरी ,विरळणी करिता एआय आधारित यंत्रसामुग्री, संत्रा मॉडेल फार्म

 कृषी विद्यापीठ अंतर्गत 20 मॉडेल नर्सरी ,विरळणी करिता एआय आधारित यंत्रसामुग्रीसंत्रा मॉडेल फार्म तसेच इतर आवश्यक संशोधन करिता कृषी विद्यापीठ यांनी प्रस्ताव सादर करावा ,याबाबत प्राधान्याने कृषी विद्यापीठास भरीव मदत केली जाईल असे नितीन गडकरी यांनी निर्देश दिले. नितीन गडकरी यांनी विदर्भातील फळांचे महत्व आणि शेतकऱ्यांची प्रगती कशी साधता येईल यावर मार्गदर्शन केले.

या बैठकीत सध्या अस्तित्वात असलेल्या नर्सरी कायद्यात सुधारणा करणेविदर्भातील संत्रामोसंबी व लिंबूवर्गीय रोपवाटिका (नर्सरी) सर्वोत्तम दर्जाच्या असो बंधनकारक करणेनर्सरी परवाना देताना ठोस नियमअटी व आवश्यक तांत्रिक बाबींचा स्पष्ट अंतर्भाव करणेप्लँटिंग मटेरियल सर्वोच्च दर्जाचे असणेरूट स्टॉक व मदर स्टॉक चा मानक दर्जा अनिवार्य करणेप्रत्येक नर्सरी धारकासाठी रोप उत्पादनाची किमान व कमाल मर्यादा निश्चित करणे तसेच योग्य Ratio ठरवणेसध्या अस्तित्वात असलेल्या नर्सरींना सुधारणा करण्यासाठी 3-5 वर्षाची मुदत उपलब्ध करून देणेभविष्यातील सर्व नवीन परवाने नव्या धोरणानुसारच जारी करणेरंगपूरजबेरी व अंलिमो रूट स्टॉक ची लागवड व पुरवठा अनिवार्य करणेया रूट स्टॉक चे प्रभावी विकासकार्य एनआरसीसी व पीकेव्ही यांनी पुढाकार घेऊन करणेज्या ठिकाणी बाग नाही तेथे नर्सरी चालविण्यास परवानगी नसणे,  रोपांची गुणवत्ता नियंत्रण व एकसमान दर निश्चित करणेओ एनएचबी चे Accreditation अनिवार्य करणेपॅकेटमधील रोपांची साइज किमान 8x12 बंधनकारक करणेरोपे किती वर्षांपर्यंत विक्रीस योग्य मानली जातील याबाबत स्पष्ट धोरण तयार करणेप्रत्येक रोप लॉट प्रमाणित (सर्टिफाइड) असणे व सर्टिफिकेशनसाठी अधिकृत Norms व Authority निश्चित करणेनर्सरी धारकांसाठी स्वतंत्र डिजिटल पोर्टल तयार करणेज्यावर ते रोपवाटिकेचे फोटो/व्हिडिओ व तांत्रिक माहिती अपलोड करतीलज्यामुळे शेतकऱ्यांना गुणवत्ता ओळखणे आणि योग्य खरेदी करणे सुलभ होईल आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. या सर्व बाबींवर सविस्तर विचारमंथन करून ठोस निर्णय घेण्यासाठी बैठक संपन्न झाली.

आजच्या झालेल्या बैठकीतील मुद्दे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. या निर्णयांमुळे उत्पादन गुणवत्तानिर्यात क्षमता आणि जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता लक्षणीयरीत्या वाढेल असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

00000

विदर्भातील संत्रा, मोसंबी व लिंबुवर्गीय फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी ठोस व धोरणात्मक निर्णय घेऊ: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.

 विदर्भातील संत्रा, मोसंबी व लिंबुवर्गीय फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी ठोस व धोरणात्मक निर्णय घेऊ: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.


नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न!


नागपूर, दि. 14 : विदर्भातील संत्रा, मोसंबी व लिंबुवर्गीय फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे, तसेच या प्रदेशातील फळ उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक दर्जा मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने शासन पातळीवर ठोस व धोरणात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. तसेच रोपवाटिका नोंदणी राष्ट्रीय बागवानी बोर्डाकडे करणे आणि सर्व नर्सरी चे मानांकन बंधनकारक करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

प्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम

 प्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम

प्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहेजो संपूर्ण राज्यात तरुण फुटबॉल प्रतिभेचा (13 वर्षांखालील) शोध घेण्यासाठी आणि त्यांना विकसित करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत शिष्यवृत्तीपरदेशी प्रशिक्षकांकडून जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि सर्वांगीण विकासाची संधी दिली जाणार आहे. निवडलेल्या 60 खेळाडूंची (30 मुले30 मुली) पाच वर्षांसाठी संपूर्ण निवासी शिष्यवृत्ती मिळणार आहे.               


सक्षम आणि शाश्वत फुटबॉल विकास व्यवस्था उभी राहणार

 सक्षम आणि शाश्वत फुटबॉल विकास व्यवस्था उभी राहणार

'प्रोजेक्ट महादेवाहा उपक्रम महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (MITRA), व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (WIFA), सिडको (CIDCO) आणि महाराष्ट्र शासनाचा क्रीडा विभाग या विविध संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे धोरणात्मक दिशातळागाळातील सहभागव्यावसायिक फुटबॉल कौशल्यपायाभूत सुविधा आणि प्रशासकीय पाठबळ मिळून राज्यात एक सक्षम आणि शाश्वत फुटबॉल विकास व्यवस्था उभी राहणार आहे.

लिओनोल मेस्सी या नावाचा वानखेडे स्टेडियमवर जल्लोष

 लिओनोल मेस्सी या नावाचा वानखेडे स्टेडियमवर  जल्लोष

           जागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने फुटबॉल प्रेमींना फुटबॉल प्रेक्षकांकडे भिरकवताच  प्रेक्षकांनी लिओनोल मेस्सी या नावाचा जल्लोष केला. संपूर्ण मैदान मेस्सीच्या नावाने दुमदुमत होते. या वेळेला जागतिक फुटबॉलपटू लिओनल मेस्सीला सचिन तेंडुलकर यांच्या नावाची दहा नंबरची जर्सी सचिन तेंडुलकर यांनी भेट केली. जागतिक फुटबॉलपटू लिओनाल मेस्सीनेही सचिन तेंडुलकर याला फुटबॉल भेट दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागतिक फुटबॉलपटू लिओनोल मेस्सी यांनी जर्सी भेट दिली. पार्थ जिंदालवेदना जिंदाल यांनी जिंदाल ग्रुपतर्फे व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन मार्फत 75 लाख रुपयांचा चेक  प्रोजेक्ट महादेवाला दिला. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी तर्फे  व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन मार्फत 99 लाख 99 हजार रुपयांचा धनादेश प्रोजेक्ट महादेवाला  दिला.

प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही: सचिन तेंडुलकर

 प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही: सचिन तेंडुलकर

       भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणाले कीजागतिक फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आणि त्यांचे सहकारी भारतात आल्याबद्दल आणि तेही मुंबईत आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मानतो.मुंबईकरांनी ज्या प्रकारे या तिघांचे स्वागत केले ते अत्यंत अविस्मरणीय आहे. मुंबई ही स्वप्नांची नगरी आहे आजचा क्षण हा अत्यंत अविस्मरणीय आहे. प्रेक्षकांच्या पाठिंब्याशिवाय आपण मोठे होऊ शकत नाही. आज मला वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सन 2011 च्या  क्रिकेटच्या विश्वचषकाची आठवण झाली. आजचा क्षण हा सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल. खेळामध्ये खेळाडूंना चिकाटी जिद्द अत्यंत महत्त्वाचे आहे लिओनेल मेस्सी जागतिक दर्जाचा खेळाडू असून त्याच्यामध्ये संवेदनशीलता त्याच प्रकारे त्यांनी या खेळाडूला दिलेल्या उत्तेजन अत्यंत महत्त्वाचे आहे याबद्दल मी मेसेज आभार मानतो आणि मेसीला व त्याच्या कुटुंबांना आरोग्यमय शुभेच्छा देतो.

Featured post

Lakshvedhi