विदर्भातील संत्रा, मोसंबी व लिंबुवर्गीय फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या शाश्वत प्रगतीसाठी ठोस व धोरणात्मक निर्णय घेऊ: कृषी मंत्री दत्तात्रय भरणे.
नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक संपन्न!
नागपूर, दि. 14 : विदर्भातील संत्रा, मोसंबी व लिंबुवर्गीय फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणे, तसेच या प्रदेशातील फळ उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक दर्जा मिळवून देणे अत्यंत आवश्यक आहे. या अनुषंगाने शासन पातळीवर ठोस व धोरणात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. तसेच रोपवाटिका नोंदणी राष्ट्रीय बागवानी बोर्डाकडे करणे आणि सर्व नर्सरी चे मानांकन बंधनकारक करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment