Tuesday, 6 January 2026

दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. हितेश सिंघवी यांची विशेष मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. हितेश सिंघवी यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम दिलखुलास’ मध्ये मुख व डोके-मान कर्करोग : लक्षणेनिदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत मुख व डोके-मान कर्करोग शस्त्रक्रिया (ऑन्कोसर्जरी) तज्ज्ञ डॉ. हितेश सिंघवी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

 

ही विशेष मुलाखत 7 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News on AIR’ या मोबाईल अॅपवर प्रसारित होणार आहे. मुलाखत निवेदिका सुचिता गरूडे यांनी घेतली आहे.

           

डोके आणि मानेचा कर्करोग हा गंभीर व गुंतागुंतीचा आजार असून तो तोंडाची पोकळीघसाआवाजलाळ ग्रंथीनाकसायनस तसेच लिम्फ नोड्स अशा डोके-मान विभागातील विविध अवयवांवर परिणाम करतो. जागतिक पातळीवर हा आजार मोठे आव्हान ठरत असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. या कर्करोगाचा रुग्णांच्या बोलण्यावरगिळण्यावरश्वसनावर तसेच चेहऱ्यावर व त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर खोलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या आजाराचे लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे असून त्याद्वारे उपचार अधिक परिणामकारक ठरतात आणि संभाव्य गुंतागुंतींचा धोका कमी करता येतो. या पार्श्वभूमीवरमुख व डोके-मान कर्करोगाची प्राथमिक लक्षणेवेळेवर करण्याच्या तपासण्या तसेच या आजारापासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर व शास्त्रशुद्ध माहिती डॉ. हितेश सिंघवी यांनी दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या पूर्व प्रशिक्षणाबाबत आवाहनtraining.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप क्र. ९१५६०७३३०६ pl share

 भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारीपदाच्या

 पूर्व प्रशिक्षणाबाबत आवाहन

 

मुंबईदि.५ : भारतीय सैन्यदलनौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना कंबाईन्ड डिफेन्स सर्विस (सीडीएस) परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक नवयुवतींसाठी १९ जानेवारी २०२६ ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. ६६ आयोजित करण्यात येत आहे. निवड केलेल्या प्रशिक्षणार्थीनी दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर रहावेअसे मुंबई शहर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षणनिवास व भोजन दिले जाते. तरी. मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर येथे १२ ते १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजेपर्यंत मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी सैनिक कल्याण विभागपुणे या वेबसाईट वर सर्च करून त्यामधील सीडीएस ६६ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेले) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरून सोबत घेऊन यावे.

या सीडीएस वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी नमूद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावेत :-

अ) उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

व) उमेदवार लोकसंघ आयोग (यूपीएससी) नवी दिल्ली यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या सीडीएस या परीक्षेकरिता ऑनलाईनद्वारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारीछात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रनाशिक रोडनाशिक यांचा ईमेल आय डीः training.petenashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाट्सअप क्र. ९१५६०७३३०६ (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहनमुंबई शहरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  यानी प्रसिद्ध प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे.

डिसॅबिलिटीज (AYJNISHD) येथे प्रत्यक्ष तपासणी न करता तयार करण्यात आलेले बनावट अहवाल

 अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज (AYJNISHD) येथे प्रत्यक्ष तपासणी न करता तयार करण्यात आलेले बनावट अहवाल तसेच संस्थेच्या अधिकृत तपासणीवर आधारित नसलेले अहवाल राज्य व केंद्र शासनाच्या विविध सवलती व लाभ मिळविण्यासाठी संबंधित प्राधिकरणांकडे सादर केले जात असल्याचेही काही ठिकाणी आढळून आले आहे.

   

या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित प्राधिकरणांनी यूडीआयडी कार्ड या संस्थेमार्फत जारी केल्याचे दर्शविण्यात येणारे सर्व श्रवण व भाषण तपासणी अहवाल पडताळणीसाठी संस्थेच्या अधिकृत ayjnihh-mum@nic.in ई-मेल पत्त्यावर पाठविणे अनिवार्य असल्याचे प्रसिद्धीपत्रक अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूटने काढले आहे. त्यानुसार कार्यालयांनी तत्काळ कार्यवाही करावी तसेच चुकीची माहिती देऊन दिव्यांगांचे प्रमाणपत्र अथवा लाभ घेऊ नये असे आवाहन सचिव मुंढे यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करावी

 दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करावी

-         सचिव तुकाराम मुंढे

·         बनावट प्रमाणपत्र प्रकरणात कडक कारवाई

 

            मुंबईदि. ०५ : दिव्यांग व्यक्तींना दिले जाणारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडीहे शासकीयनिमशासकीय नोकरीतील आरक्षणविविध शासकीय योजना,आर्थिक सवलती आणि इतर लाभ मिळविण्यासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्रअलीकडे काही ठिकाणी बनावट किंवा चुकीच्या तपासणी अहवालांच्या आधारे यूडीआयडी कार्ड मिळविण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत असल्याने यूडीआयडी कार्ड जारी करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय तपासणी अहवालांची पडताळणी संबंधित संस्थेमार्फत करणे आवश्यक असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

 

चुकीचे किंवा बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र घेणे अथवा देणे हा कायद्याने गुन्हा असूनअशा प्रकरणांमध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम२०१६ मधील तरतुदींनुसार संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले

राज्यात बंदी असलेल्या सुंगधित तंबाखू आणि हुक्का

 

राज्यात बंदी असलेल्या सुंगधित तंबाखू आणि हुक्का उत्पादन करत कायद्याचे कोणी उल्लंघन करताना आढळल्यास त्याच्यावर १६ जुलै २०२५ रोजी काढलेल्या प्रतिबंधात्मक आदेशानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल"असा इशारा अन्न व औषध प्रशासनविशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.

००००

आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम

 आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम

-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 03 :-राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक लोकाभिमुखअधिक सक्षमतंत्रशुद्ध व सेवाभावी बनवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील वेगवेगळ्या केडरवर काम करणाऱ्या राज्यभरातील सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षणासंबंधी सादरीकरण करण्यात आले. या बैठकीला राज्यातील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रांचे प्राचार्यआरोग्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधीआरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायकसचिव ई. रविंद्रनआरोग्यसेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेआरोग्य संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकरआणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            प्रशिक्षण हा आरोग्य क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठीचांगली वागणूक देण्यासाठीकामकाजात गतिमानतातांत्रिक कौशल्य येण्यासाठी तसेच कार्यक्षमता वाढण्यासाठी प्रशिक्षण हा महत्त्वाचा घटक असल्यानेआरोग्य विभागात विविध पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक व प्रशासकीय प्रशिक्षण देणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी एसईआरसीएचपीएचएफआयआयएमएमएएसटीइनिशिएटिव्ह ऑफ चेंजताम्हिणी घाट पुणे या प्रशिक्षण संस्थांनी सादरीकरण केले. या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे आपले अनुभव सांगितले. प्रशिक्षणामुळे टेक्निकल स्किलइथिकल व्हॅल्यूटीम मॅनेजमेंटपर्सनॅलिटी डेव्हलपमेंटलीडरशिप मॅनेजमेंटव कॉन्फिडन्स वाढल्याचे सांगितले. या प्रशिक्षणाचा फायदा झाला असूननागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल असेही सांगितले. 

रुग्णालयातील सर्वसाधारण व्यवस्थापनरुग्णाला दिली जाणारी वागणूकउपचारातील आधुनिक तांत्रिक कौशल्ये,कृत्रिम बुद्धिमत्ता यांसह सर्व आधुनिक घटकांचा शिक्षणात समावेश असावा. तसेच प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी 'मास्टर ट्रेनरबनून इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावेअसे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले.

Monday, 5 January 2026

योजनेत समाविष्ट उपचार नाकारणे किंवा रुग्णांकडून रक्कम मागणे अशा तक्रारी आल्यास चौकशीनंतर संबंधितरुग्णालयावर दंड, निलंबन किंवा अंगीकरण रद्द करण्याची

 योजनेत समाविष्ट उपचार नाकारणे किंवा रुग्णांकडून रक्कम मागणे अशा तक्रारी आल्यास चौकशीनंतर संबंधित रुग्णालयावर दंडनिलंबन किंवा अंगीकरण रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल. राज्यातील सर्व नागरिक या एकत्रित योजनेतर्गत उपचारांसाठी पात्र आहेत. नागरिकांनी योजनांबाबत जागरूक राहून आपले हक्क बजावावेत आणि कोणत्याही अडचणीसाठी आरोग्यमित्रजिल्हास्तरीय अधिकारीजिल्हाधिकारी यांच्या समिती किंवा राज्य आरोग्य हमी सोसायटीशी संपर्क साधावाअसे आवाहन प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

0000

Featured post

Lakshvedhi