दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या वैश्विक ओळखपत्राची तपासणी करावी
- सचिव तुकाराम मुंढे
· बनावट प्रमाणपत्र प्रकरणात कडक कारवाई
मुंबई, दि. ०५ : दिव्यांग व्यक्तींना दिले जाणारे वैश्विक दिव्यांग ओळखपत्र (यूडीआयडी) हे शासकीय, निमशासकीय नोकरीतील आरक्षण, विविध शासकीय योजना,आर्थिक सवलती आणि इतर लाभ मिळविण्यासाठी महत्त्वाचे दस्तऐवज आहे. मात्र, अलीकडे काही ठिकाणी बनावट किंवा चुकीच्या तपासणी अहवालांच्या आधारे यूडीआयडी कार्ड मिळविण्याचे प्रकार समोर आले आहेत. यामुळे खऱ्या दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होत असल्याने यूडीआयडी कार्ड जारी करण्यापूर्वी संबंधित वैद्यकीय तपासणी अहवालांची पडताळणी संबंधित संस्थेमार्फत करणे आवश्यक असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
चुकीचे किंवा बनावट दिव्यांगत्व प्रमाणपत्र घेणे अथवा देणे हा कायद्याने गुन्हा असून, अशा प्रकरणांमध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मधील तरतुदींनुसार संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले
No comments:
Post a Comment