Tuesday, 6 January 2026

दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. हितेश सिंघवी यांची विशेष मुलाखत

 दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. हितेश सिंघवी यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम दिलखुलास’ मध्ये मुख व डोके-मान कर्करोग : लक्षणेनिदान आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत मुख व डोके-मान कर्करोग शस्त्रक्रिया (ऑन्कोसर्जरी) तज्ज्ञ डॉ. हितेश सिंघवी यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

 

ही विशेष मुलाखत 7 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत दररोज सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News on AIR’ या मोबाईल अॅपवर प्रसारित होणार आहे. मुलाखत निवेदिका सुचिता गरूडे यांनी घेतली आहे.

           

डोके आणि मानेचा कर्करोग हा गंभीर व गुंतागुंतीचा आजार असून तो तोंडाची पोकळीघसाआवाजलाळ ग्रंथीनाकसायनस तसेच लिम्फ नोड्स अशा डोके-मान विभागातील विविध अवयवांवर परिणाम करतो. जागतिक पातळीवर हा आजार मोठे आव्हान ठरत असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे. या कर्करोगाचा रुग्णांच्या बोलण्यावरगिळण्यावरश्वसनावर तसेच चेहऱ्यावर व त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर खोलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या आजाराचे लवकर निदान अत्यंत महत्त्वाचे असून त्याद्वारे उपचार अधिक परिणामकारक ठरतात आणि संभाव्य गुंतागुंतींचा धोका कमी करता येतो. या पार्श्वभूमीवरमुख व डोके-मान कर्करोगाची प्राथमिक लक्षणेवेळेवर करण्याच्या तपासण्या तसेच या आजारापासून संरक्षणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर व शास्त्रशुद्ध माहिती डॉ. हितेश सिंघवी यांनी दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi