Tuesday, 6 January 2026

आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम

 आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम

-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. 03 :-राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक लोकाभिमुखअधिक सक्षमतंत्रशुद्ध व सेवाभावी बनवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील वेगवेगळ्या केडरवर काम करणाऱ्या राज्यभरातील सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षणासंबंधी सादरीकरण करण्यात आले. या बैठकीला राज्यातील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रांचे प्राचार्यआरोग्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधीआरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायकसचिव ई. रविंद्रनआरोग्यसेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेआरोग्य संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकरआणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            प्रशिक्षण हा आरोग्य क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नागरिकांना अधिक चांगली सेवा देण्यासाठीचांगली वागणूक देण्यासाठीकामकाजात गतिमानतातांत्रिक कौशल्य येण्यासाठी तसेच कार्यक्षमता वाढण्यासाठी प्रशिक्षण हा महत्त्वाचा घटक असल्यानेआरोग्य विभागात विविध पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक व प्रशासकीय प्रशिक्षण देणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी एसईआरसीएचपीएचएफआयआयएमएमएएसटीइनिशिएटिव्ह ऑफ चेंजताम्हिणी घाट पुणे या प्रशिक्षण संस्थांनी सादरीकरण केले. या संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे आपले अनुभव सांगितले. प्रशिक्षणामुळे टेक्निकल स्किलइथिकल व्हॅल्यूटीम मॅनेजमेंटपर्सनॅलिटी डेव्हलपमेंटलीडरशिप मॅनेजमेंटव कॉन्फिडन्स वाढल्याचे सांगितले. या प्रशिक्षणाचा फायदा झाला असूननागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल असेही सांगितले. 

रुग्णालयातील सर्वसाधारण व्यवस्थापनरुग्णाला दिली जाणारी वागणूकउपचारातील आधुनिक तांत्रिक कौशल्ये,कृत्रिम बुद्धिमत्ता यांसह सर्व आधुनिक घटकांचा शिक्षणात समावेश असावा. तसेच प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी 'मास्टर ट्रेनरबनून इतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावेअसे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सूचित केले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi