Sunday, 4 January 2026

वेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहननागरिक cons.caracas@mea.gov.in या ईमेलवर किंवा +58-412-9584288

 वेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी'

नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

 

नवी दिल्ली 4: वेनेझुएलातील अलीकडील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायझरी) जारी केली आहे. वेनेझुएलातील सद्यस्थिती पाहताभारतीय नागरिकांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय त्या देशाचा प्रवास करणे टाळावेअसे आवाहन केंद्र सरकारकडून अधिकृतपणे करण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसारजे भारतीय नागरिक सध्या वेनेझुएलामध्ये वास्तव्यास आहेतत्यांनी कमालीची सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. तेथील भारतीयांनी आपल्या हालचालींवर मर्यादा ठेवाव्यात आणि शक्यतो सुरक्षित ठिकाणी राहावेअशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेचकोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी काराकस येथील भारतीय दूतावासाच्या सातत्याने संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावासाने संपर्क यंत्रणा सज्ज ठेवली असूननागरिक cons.caracas@mea.gov.in  या ईमेलवर किंवा +58-412-9584288 या तातडीच्या फोन नंबरवर संपर्क साधू शकतात. परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून भारतीय प्रवाशांनी या सूचनांचे पालन करावेअसे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

000

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल

 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक

विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

सातारादि. ३: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नायगाव येथे उभे राहणारे स्मारक त्यांच्या कार्याची आठवण देईलत्यामुळे लढण्याची प्रेरणा तर मिळेलच परंतु समाजातील विषमतेच्या विरोधात क्रांतीची बिजे तयार होतीलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महिलांना अधिकार देण्यासाठीत्यांना सक्षम करण्यासाठी येथे उभ्या राहणाऱ्या महिला प्रशिक्षण केंद्रात आवश्यक सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येईलअसेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

नायगाव (ता. खंडाळा) येथे आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या १४३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे तसेच महिला प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेचे सभापती      प्रा. राम शिंदेअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळपालकमंत्री शंभूराज देसाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेमदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटीलराज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरआमदार डॉ. अतुल भोसलेमनोज घोरपडेसचिन पाटीलग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेनायगावच्या सरपंच स्वाती जमदाडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात आणि देशात स्त्री शिक्षणाची सुरुवात करणाऱ्यास्त्रीयांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमहात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अनिष्ट रुढीवादाच्या विरोधात क्रांतीचे रणशिंग फुंकले आणि समाजामध्ये समता प्रस्थापित करण्याकरिता व्यवस्था उभी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेरूढीवादविषमताजातिवाद यामुळे सामाजिक, आर्थिक गुलामगिरी ओढवते. महिलांना शिक्षणाचा अधिकार नव्हताविधवांना संपत्तीचा अधिकार नव्हता. अशा स्थितीत त्यांनी समाजातील रुढींच्या विरोधात बंड पुकारले आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी पहिली मुलींची शाळा सुरू केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या मार्गावर शासन चालत आहे. शासनाने लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनविण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार आतापर्यंत ५० लाख लखपती दीदी झाल्या असून यावर्षी १ कोटीपर्यंत पोहोचूअसा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्ह्यात दीड लाख लखपती दीदी झाल्या आहेत याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. संत सावता माळी यांचे अरण येथील स्मारकही भव्य-दिव्य असेल. त्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था उभ्या करण्यात येत आहेतअसेही त्यांनी सांगितले.

नायगावचे नाव सावित्रीबाई फुले यांच्या नावाने करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामसभेने तसा निर्णय घेऊन तो ग्राम विकास विभागामार्फत पाठविल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.


क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा व तालुका स्तरावरमिशन मोडमध्ये विशेष रणनीती

 क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी जिल्हा व तालुका स्तरावर मिशन मोडमध्ये विशेष रणनीती राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच तपासणी मोहीम व्यापक करणेउपचारांमध्ये सातत्य राखणे आणि रुग्णांना पोषण सहाय्य देणेनिक्षय मित्र यांचे मार्फत फूड बास्केट देणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. राज्यातील क्षय रोगाच्या रुग्णांची एक्स-रे तपासणी वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या. केंद्र शासनामार्फत 96 अतिरिक्त हॅन्ड हेल्ड एक्स-रे मशीन राज्याला देण्यात येणार आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून राज्याच्या आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांना गती देत लोकाभिमुखसक्षम आणि विश्वासार्ह आरोग्य व्यवस्था उभारण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्राची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक प्रभावी बनविण्याच्या दिशेने ही बैठक महत्त्वाची ठरली आहे. सदर बैठकीसाठी आरोग्य मंत्री यांचे सोबत आरोग्य सचिव इ रवींद्रनसंचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर उपस्थित होते.

000

आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या सोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक

 राज्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या सोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक

 

जनऔषधीक्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार

 

मुंबईदि. 4 - राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम व गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा व राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्ली येथे महत्त्वपूर्ण आढावा संपन्न झाली.

 या बैठकीत राज्यातील राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणेसार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणेआणि रुग्णकेंद्रित सेवा देणे बाबत चर्चा करण्यात आली.

बैठकी दरम्यान नागरिकांना दर्जेदार व परवडणाऱ्या दरात औषधे सहज उपलब्ध व्हावीतयासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात जनऔषधी केंद्र आणि अमृत फार्मसींचे जाळे राज्यात अधिक विस्तारण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी दिल्या. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रुग्णांवरील औषध खर्चाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

वेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी' नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहननागरिकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावासाने संपर्क यंत्रणा सज्ज ठेवली असून, नागरिक cons.caracas@mea.gov.in या ईमेलवर किंवा +58-412-9584288

 वेनेझुएलातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारची 'ट्रॅव्हल ॲडव्हायझरी'

नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन

 

नवी दिल्ली 4: वेनेझुएलातील अलीकडील राजकीय आणि सामाजिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना (ट्रॅव्हल ॲडव्हायझरी) जारी केली आहे. वेनेझुएलातील सद्यस्थिती पाहताभारतीय नागरिकांनी अत्यंत आवश्यक कामाशिवाय त्या देशाचा प्रवास करणे टाळावेअसे आवाहन केंद्र सरकारकडून अधिकृतपणे करण्यात आले आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकानुसारजे भारतीय नागरिक सध्या वेनेझुएलामध्ये वास्तव्यास आहेतत्यांनी कमालीची सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. तेथील भारतीयांनी आपल्या हालचालींवर मर्यादा ठेवाव्यात आणि शक्यतो सुरक्षित ठिकाणी राहावेअशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेचकोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी काराकस येथील भारतीय दूतावासाच्या सातत्याने संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावासाने संपर्क यंत्रणा सज्ज ठेवली असूननागरिक cons.caracas@mea.gov.in  या ईमेलवर किंवा +58-412-9584288 या तातडीच्या फोन नंबरवर संपर्क साधू शकतात. परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून भारतीय प्रवाशांनी या सूचनांचे पालन करावेअसे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

“जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी” गठीततास कार्यरत टोल-फ्री कॉल सेंटर सेवा सुरू करण्यात आली असून. नागरिक या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात — १५५३८८ / १८००२३३२२००, १४५५५ / १८००१११५६५ pl share

 योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती तसेच पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. नागरिकांना योजनांविषयी माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी २४ तास कार्यरत टोल-फ्री कॉल सेंटर सेवा सुरू करण्यात आली असून. नागरिक या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात  १५५३८८ / १८००२३३२२००१४५५५ / १८००१११५६५

प्रत्येक अंगीकृत रुग्णालयात दर्शनी भागात योजना कक्ष (किऑस्क) स्थापन करणे बंधनकारक असून या कक्षात नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्यमित्र नियुक्त करण्यात आले आहेत. उपचार व सुविधा मिळण्यात अडचण आल्यास तक्रारींचे तात्काळ निवारण करण्याची जबाबदारी जिल्हा समन्वयकक्षेत्रीय व्यवस्थापकअंमलबजावणी सहाय्य संस्था आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे. त्यांच्या संपर्क क्रमांकांची माहिती प्रत्येक रुग्णालयात स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित लागू केल्याने उपचारांची गुणवत्ता सुधारलीpl share

  

आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित लागू केल्याने उपचारांची गुणवत्ता सुधारली

 

मुंबईदि. ०५: राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना एकत्रित करून  जानेवारी २०२५ पासून महत्त्वपूर्ण सुधारणा लागू केल्या आहेतअशी माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.

रुग्णांना मिळणाऱ्या उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात आली असून उपचारांच्या दरात वाढ तसेच पेमेंट प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात आल्या आहेत. उपचारांची गुणवत्ता वाढविण्यासाठी एनएबीएच आणि एनक्यूएएस  प्रमाणित रुग्णालयांना दावा रक्कमेतून प्रति उपचार १० ते १५ टक्के प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Featured post

Lakshvedhi