Sunday, 7 December 2025

राज्यातील सौरकृषी पंपाचे डिजिटल लोकार्पण ,महाराष्ट्र थांबणार नाही

 महाराष्ट्र थांबणार नाही

            मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात सुरुवातीला शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यातील जनतेचे आभार व्यक्त केले. जनतेला समर्पित वर्ष होते. सगळ्यांच्या जीवनात मूलभूत परिवर्तनसाठी योजना आणल्या त्या कार्यान्वित केल्या. महाराष्ट्र थांबणार नाहीअसाच पुढे जात राहीलहा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यातील सौरकृषी पंपाचे डिजिटल लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी लाभार्थी  शेतकऱ्यांशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. गिनीज बुक विक्रम नोंदचे निरीक्षक पंच कार्ल सॅबेले यांनी  विक्रमाची घोषणा केली. प्रमाणपत्र व मेडल मान्यवरांना प्रदान केले. सौर कृषी पंप योजनेसाठी अर्थसहाय्य करणाऱ्या एआयआयएम बॅंकेसोबतच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. बॅंकेचे प्रत्युष मिश्रा व  महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

कार्ल सॅबेले म्हणाले कीविक्रमासाठी ३५ हजार पंप स्थापित करणे आवश्यक होते मात्र प्रत्यक्षात ४५ हजार ९११ पंप स्थापित करण्यात आलेहा एक विश्वविक्रम आहे. या प्रत्येक पंपाच्या उभारणी ते कार्यान्वयन या सर्व टप्प्यांवर पडताळणी करुनच या विक्रमास मान्यता देण्यात आली आहे.

सौर ऊर्जेद्वारे १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता

 सौर ऊर्जेद्वारे १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीअशा प्रकारे सौर ऊर्जेचा वापर वाढवून आपण शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीज निर्मिती करु शकतो. शिवाय ही वीज निर्मिती कोणत्याही प्रदूषणाशिवाय असेल. तिचा निर्मिती खर्च कमी असल्याने इतर क्षेत्राला लागणारी वीज मुबलक आणि स्वस्तात उपलब्ध होईल. त्यामुळे दरवर्षी ३ टक्क्यांनी आपण विजेचे दर कमी करुअशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ऊर्जाक्षेत्राला नवी दिशा

            मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे सांगितले कीसौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे सौर ऊर्जा उपकरण निर्मिती कंपन्यावेंडर्स,  कामगारदेखभाल करणारे अशा १ लाख लोकांना रोजगार मिळाला. त्यामुळे ऊर्जाक्षेत्राला नवी दिशा देणारी ही योजना आहे.

सौर ऊर्जेद्वारे १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता

  

सौर ऊर्जेद्वारे १६ हजार मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीअशा प्रकारे सौर ऊर्जेचा वापर वाढवून आपण शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र १६ हजार मेगा वॅट वीज निर्मिती करु शकतो. शिवाय ही वीज निर्मिती कोणत्याही प्रदूषणाशिवाय असेल. तिचा निर्मिती खर्च कमी असल्याने इतर क्षेत्राला लागणारी वीज मुबलक आणि स्वस्तात उपलब्ध होईल. त्यामुळे दरवर्षी ३ टक्क्यांनी आपण विजेचे दर कमी करुअशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कृषी सौरपंप स्थापित करण्याच्या क्षमतेत वाढ

 सौरपंप स्थापित करण्याच्या क्षमतेत वाढ

            मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीप्रखर दुष्काळाचा सामना करतांना नेहमीच पाण्याची आणि विजेची अडचण होती. जलयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याची उपलब्धता करतांना विजेच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना सिंचन करण्यात अडचण होती. दिवसा वीज मिळावी ही प्रमुख मागणी होती. रात्री अपरात्री शेतावर जाण्यात विषारी जीवजंतूजनावरांची भीती होती. त्यासाठी शासनाने  शेतकऱ्यांचे फिडर हे सौर ऊर्जेवर नेण्याचे धोरण निश्चित केले. त्यातून एक लाख सोलर पंप ची योजना आखण्यात आली. ही योजना इतकी ,खूप चांगली असल्याने अन्य राज्यांनी जशीच्या तशी राबवावी,असे पत्र केंद्रांमार्फत इतर राज्यांना पाठविण्यात आले. त्यानुसार कुसुम’ ही केंद्राची योजना तयार झाली. याच योजनेअंतर्गत आज देशात सर्वाधिक ७ लाख पंप राज्याने बसविले आहेत. शेतकऱ्यांनी मागणी केल्यापासून ते पंप बसविण्याच्या क्षमतेत वाढ करुन आपण  प्रतिक्षा कालावधी कमी केला. महावितरणचे कर्मचारी अधिकारी. सगळ्या पुरवठादारांचे कर्मचारीतंत्रज्ञ यांच्या मेहनतीमुळे आज आपण हा विश्वविक्रम करु शकलो. आता हा आपला विक्रम आपणच मोडू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढच्या वर्षभरात सौर कृषी पंपांची संख़्या १० लाख झाली पाहिजे,असेही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सांगितले.

सौर ऊर्जा उपलब्धतेमुळे विजेच्या दरात कपात करणार

 सौर ऊर्जा उपलब्धतेमुळे विजेच्या दरात कपात करणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·        मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद

 

 

छत्रपती संभाजीनगरदि.५:- देशात महाराष्ट्र सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगावॅट निर्मिती करु. त्यामुळे अन्य वापरातील विजेच्या दरात आपण दरवर्षी ३ टक्के कपात करुन ग्राहकांना स्वस्त वीज देऊ शकतो,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            'मागेल त्याला सौर कृषीपंपयोजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये नोंद झाली. गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा एमआयडीसीमध्ये ऑरिक सिटी मैदानावर पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या विश्वविक्रमाची घोषणा करण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सचे कार्ल सॅबेले यावेळी उपस्थित होते.

संकल्प एक - योगदान हजारोंचे

  संकल्प एक - योगदान हजारोंचे





तहानभूक विसरुनकुटुंबापासून दूर.. देशाच्या सीमेवर तैनात असलेले सैनिक हे ऊनवारा पाऊसथंडीत मृत्यूच्या छायेत दररोज झुंजतात.. ते केवळ कर्तव्य म्हणून नाहीतर देशसेवेचे व्रत पाळण्यासाठी. देशाच्या संरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये अमूल्य योगदान देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्राण पणाला लावून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीतून व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वज दिन. ध्वज दिन निधी संकलनासाठी सन २०२५ सालासाठी ४० कोटी निधी संकलित करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यासाठी आहे. चला तर मग.. सशस्त्र सेना ध्वज दिना निमित्त आपल्या सैनिकांना सलाम करुया.. ध्वज दिन निधीमध्ये आपला मोलाचा हातभार लावूया..!

000

सैनिक कल्याण विभाग, पुणे निधी जमा करण्यासाठी संपर्क

निधी जमा करण्यासाठी संपर्क -

संचालकसैनिक कल्याण विभागपुणे यांच्या नावाने

 बँक ऑफ महाराष्ट्रशाखा घोरपडीपुणे

 Name of Account : FLAG DAY FUND (PUBLIC) Bank A/c No. : ६००६१३४७७८४,  IFSC  Code- MAHB0000184,  MICR Code-411014004 यामध्ये

  रोखधनादेश अथवा CBS द्वारे ध्वज निधी जमा करता येतो.

 आपल्या नजीकची शाळामहाविद्यालय किंवा राज्य शासनाचे कार्यालयतसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात निधी देता येतो.

 सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी दिलेली संपूर्ण रक्कम आयकर कायदा १९६१ कलम ८० जी (५) (vi) अन्वये करमुक्त आहे. त्यासाठीचे आयकर सुटीचे प्रमाणपत्र आवश्यतेनुसार संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय किंवा सैनिक कल्याण विभागपुणे येथून दिले जाते.

Featured post

Lakshvedhi