Monday, 17 November 2025

नैसर्गिक व जैविक शेतीमध्ये मोठा फरक आहे

 नैसर्गिक व जैविक शेतीमध्ये मोठा फरक आहे असे सांगून रासायनिक तसेच जैविक शेती पेक्षा नैसर्गिक शेती मानव तसेच सूक्ष्म जीव कल्याणाची आहे असे राज्यपालांनी सांगितले.


धर्म, अर्थ व काम यांच्या माध्यमातून मोक्षप्राप्तीसाठी निरामय आरोग्य आवश्यक आहे व आरोग्यासाठी दिनचर्या, भोजन यांसह पर्यावरण महत्वाचे आहे असे राज्यपालांनी सांगितले. आज जागतिक तापमानवाढ जगापुढे मोठे संकट आहे. त्याचा थेट परिणाम शेतीवर पडत आहे. त्यामुळे सर्वांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी व नैसर्गिक उत्पादने खरेदी करावी असे आवाहन राज्यपालांनी केले.      


संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष कुमार तनेजा यांनी आपल्या प्रास्ताविकात संकल्प फाउंडेशनने आजवर हजारो प्रशासकीय अधिकारी घडवले असून ते भारतीय सांस्कृतिक विचार पुढे नेत असल्याचे सांगितले.


कार्यक्रमाला रा. स्व. संघाचे मुंबई येथील संघचालक सुरेश भगेरिया, संकल्पचे महासचिव संतोष पाठक, सचिव राजू चौहान तसेच इतर निमंत्रित उपस्थित 

होते.


प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी:

 प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीला चालना द्यावी: राज्यपाल आचार्य देवव्रत

 

मुंबई, दि. 16 : रासायनिक खताच्या अति वापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा विविध आजारांचे प्रमाण अनेक पटींनी वाढत आहे.  हे सर्व रोखण्यासाठी  नैसर्गिक शेतीलाच प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी व प्रबुद्ध समाजाने आपल्या स्तरावर नैसर्गिक शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज येथे केले.

'संकल्प फाउंडेशन' या प्रशासकीय अधिकारी घडवणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे प्रशासकीय अधिकारी तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांसाठी 'नैसर्गिक कृषी : अनुपम भारतीय वारसा' या विषयावर राजभवन मुंबई येथे आयोजित चर्चासत्रामध्ये संवाद साधताना राज्यपाल बोलत होते.  

मोठ्या प्रमाणात होत असलेली रासायनिक खतांची आवक थांबवली पाहिजे या खतांमुळे गहू व तांदूळ यातील पोषणमूल्य कमी झाले आहे. भावी पिढ्यांची अन्नधान्य व जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

Sunday, 16 November 2025

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ति संग्रामात अमुल्य योगदान

 वृत्त क्र.4419

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ति संग्रामात अमुल्य योगदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे व कमल तलावाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण

 

छत्रपती संभाजीनगरदि.16 :- मराठवाडा मुक्ति संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत केली. तसेच महिला व अनेक स्वातंत्र्यसैनिकांना सोबत घेऊन निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त केले. त्यांचे हे योगदान अमुल्य आहेअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.   

क्रांती चौक येथील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे, तसेच ऑनलाईन पद्धतीने ऐतिहासिक कमल तलावाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी इतर मागास बहुजन कल्याणदुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावेखासदार संदिपान भुमरेराज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराडआमदार संजय केणेकरआमदार अनुराधा चव्हाणमहापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह मराठवाडा मुक्ति संग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय उपस्थित होते. 

मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले कीस्वामी रामानंद तीर्थ यांचे संपूर्ण जीवन व्रतस्थ होते. स्वामी विवेकानंदाप्रमाणेच तरूणाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी देशभक्ती जागृत केली. भारत स्वतंत्र झाल्या नंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळण्याकरीता जवळपास 13 महिन्यांचा कालावधी लागला. या कालावधीत मराठवाडा निजामाच्या इस्टेटचा भाग होता. रजाकारांच्या संपूर्ण अन्यायाची पराकाष्टा झाली होती, त्याच्याविरुद्ध एक मोठा रणसंग्राम उभा झाला होता. स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्यात नेतृत्व करुन हैदराबाद, मराठवाड्यात स्वतंत्र अस्मितेची ज्योत पेटवली. त्यातून अनेक तरुण, महिला या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये सहभागी झाले. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी या स्वतंत्र संग्राम सेनानींच्या हाकेला प्रतिसाद देत सैनिकी कारवाई केली आणि त्यातून मराठवाडा मुक्त झाला. तो दिवस म्हणजे 17 सप्टेंबर 1948 हा होता. दरवर्षी मराठवाडा मुक्ती दिन म्हणून आपण साजरा करतो. या लढ्यात भरीव योगदान दिलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करत आहोतअसे मुख्यमंत्री म्हणाले. स्वामी रामनंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे शिल्पकार निरंजन मडिलगेकर यांचा यावेळी  मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच यावेळी ऐतिहासिक कमल तलावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. शहरातील पर्यटन स्थळांमध्ये कमल तलावामुळे भर पडल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कमल तलावाचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्वत: तिकीटाची खरेदी करून कमल तलाव नागरिकांसाठी खुला करण्यात आल्याचे जाहिर केले.

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ

 येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटर नूतन वास्तू उद्घाटन

 

छत्रपती संभाजीनगरदि.१६(जिमाका): आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष मंत्रालयाने या उपचार पद्धतीला शिक्षणउपचारात वापरसंशोधन अशा विविध प्रकारे चालना दिली असून येणारा काळ हा आयुर्वेदाचा सुवर्णकाळ असेल,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

            येथील सातार तांडा भागातील श्रीयश आयुर्वेदिक कॉलेज ॲण्ड हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या नवीन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेराज्यसभा सदस्य खा. डॉ. भागवत कराडश्रीयश प्रतिष्ठानचे बसवराज मंगरुळे,सचिव संगिता मंगरुळेरुग्णालय अधीक्षक डॉ. परेश देशमुखअधिष्ठाता स्वाती इटगे आदी मान्यवर उपस्थित होते.

                         मुख्यमंत्री म्हणाले कीभारतीय जीवनपद्धतीस अनुकूल व निसर्गाशी साधर्म्य सांगणारी ही उपचार पद्धती वेदांमध्ये आयुर्वेद या नावाने सांगण्यात आली आहे. आजाराच्या लक्षणांवर नव्हे तर मुळाशी जाऊन आयुर्वेदात उपचार केले जातात. ही उपचार पद्धती शाश्वत उपचार पद्धती आहे. आयुर्वेद उपचार पद्धतीचा जगभरात वापर वाढत आहे. भारतात आयुर्वेद उपचार पद्धतीने उपचार घेण्यासाठी अनेक लोक  येत आहेत. आयुर्वेदाने या जगाला विज्ञाननिष्ठ उपचार पद्धती देऊन शल्यचिकित्सा पद्धतीही दिली आहे. 

            कोविड काळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या पूरक औषधांमध्ये आयुर्वेदीक औषधींचा सर्वाधिक समावेश होता. केंद्र सरकारमार्फत या उपचार पद्धतीला प्रोत्साहन दिले जात आहे. प्रशिक्षित वैद्य तयार करण्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयांना चालना दिली जात आहे.  आगामी दशकात भारत हा जगातली प्रमुख अर्थव्यवस्था बनून तिसऱ्या क्रमांकावर झेप घेऊ पहात आहे. 2047 पर्यंत आपला देश आर्थिक महासत्ता झालेला असेल. मराठवाड्यातही आपण उद्योग क्षेत्राला पाठबळ देत असून इलेक्ट्रिक व्हेईकलची कॅपिटल म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख निर्माण होत आहेअसेही मुख्यमंत्री 

विश्वविख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांचे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये

 विश्वविख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांचे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये

१८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत प्रदर्शन 

मुंबईदि. १५ जागतिक कीर्तीचे वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन बघण्याची संधी प्रथमच मुंबईकरांना मिळणार आहे. प्रभादेवी येथील पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या तळमजल्यावरील व पहिल्या मजल्यावर प्रदर्शन दालनांमध्ये हे प्रदर्शन दिनांक १८ ते २३ नोव्हेंबर 2025या कालावधीत सकाळी ११ ते ७ या वेळेत रसिकांसाठी खुले असेल.

पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीसांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने राज्यात प्रदर्शनासाठी प्रथमच श्री पटनाईक यांना निमंत्रित करण्यात आले असून रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अद्वितीय कलेचा अनुभव लाभ घ्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

ओडिशा येथील समुद्र किनाऱ्यांवर वाळूच्या माध्यमातून कलाकृती साकार करणारे सुदर्शन पटनाईक हे त्यांच्या अनोख्या वाळूशिल्पांमुळे जगविख्यात झाले आहेत. समुद्रकिनारी वाळूपासून ते अतिशय कलात्मक शिल्प तयार करत असून त्यांची अनेक वाळूशिल्पे ही सामाजिक मुद्यांवर भाष्य करणारी तसेच जनजागृती करणारी असतात.

श्री.पटनायक यांनी आजपर्यंत ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. पद्मश्री (२०१४)गोल्डन सॅण्ड मास्टर अवॉर्ड (२०२४) आणि युनायटेड किंग्डममधील फ्रेड डॅरिंग्टन सॅण्ड मास्टर अवॉर्ड (२०२५) यांसारख्या अनेक प्रतिष्ठित सन्मानांनी त्यांची कलायात्रा गौरवली गेली आहे.

 अलीकडील काळात त्यांनी मिश्र-माध्यमातील कलाकृतींमध्ये उल्लेखनीय प्रयोग केले आहेत. गोल्डन सॅण्ड आर्ट इन्स्टिट्यूट या संस्थेद्वारे ते नव्या पिढीतील कलाकार घडवत आहेत.

भारताच्या प्रगतीचा पाया डिझाइन थिंकिंगमध्येच

 भारताच्या प्रगतीचा पाया डिझाइन थिंकिंगमध्येच आहे. अभियांत्रिकीवास्तुकलाउत्पादनअ‍ॅनिमेशनगेमिंगडिजिटल कंटेंटतंत्रज्ञान आदी सर्व क्षेत्रांत डिझाइन नवोपक्रमाची मुख्य ताकद बनली आहे. नवीन अभ्यासक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) एआर/व्हीआर (Augmented & Virtual Reality) UX/UI Creative Technologies बरोबर उद्योग-शैक्षणिक सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना हँड्स-ऑनव्यावहारिकप्रोजेक्ट-आधारित शिक्षण आणि मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती करण्यात येत आहे. असेही मंत्री श्री पाटील यांनी सांगितले.

 

यावेळी व्यासपीठावर आमदार. पराग अळवणीउर्मीज आर्ट फोरमच्या संस्थापिकाराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कोमल उल्लालगुरुचरण सिंग संधूक्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभूमोहन वेदपाठक आदी उपस्थित होते.


मुलांच्या शिक्षणात आणि विकासात कला आणि सर्जनशील

 मुलांच्या शिक्षणात आणि विकासात कला आणि सर्जनशील विषयांची भूमिका महत्त्वाची असते. डिझाइन हा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूचा अविभाज्य भाग बनला आहेडिझाईन आता केवळ चित्रकलेपुरते मर्यादित न राहता विज्ञानसौंदर्यशास्त्रमानवी गरजा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणारे एक व्यापक व्यावसायिक क्षेत्र आहे. एक्स्पोचे आयोजन हे महाराष्ट्रातील सर्जनशीलतेला योग्य दिशा देणारे पाऊल  ठरणार आहेअसे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

            भारताच्या प्रगतीचा पाया डिझाइन थिंकिंगमध्येच आहे. अभियांत्रिकीवास्तुकलाउत्पादनअ‍ॅनिमेशनगेमिंगडिजिटल कंटेंटतंत्रज्ञान आदी सर्व क्षेत्रांत डिझाइन नवोपक्रमाची मुख्य ताकद बनली आहे. नवीन अभ्यासक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) एआर/व्हीआर (Augmented & Virtual Reality) UX/UI Creative Technologies बरोबर उद्योग-शैक्षणिक सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना हँड्स-ऑनव्यावहारिकप्रोजेक्ट-आधारित शिक्षण आणि मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती करण्यात येत आहे. असेही मंत्री श्री पाटील यांनी सांगितले.

 

यावेळी व्यासपीठावर आमदार. पराग अळवणीउर्मीज आर्ट फोरमच्या संस्थापिकाराष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कोमल उल्लालगुरुचरण सिंग संधूक्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभूमोहन वेदपाठक आदी उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi