मुलांच्या शिक्षणात आणि विकासात कला आणि सर्जनशील विषयांची भूमिका महत्त्वाची असते. डिझाइन हा आपल्या जीवनाच्या प्रत्येक पैलूचा अविभाज्य भाग बनला आहे, डिझाईन आता केवळ चित्रकलेपुरते मर्यादित न राहता विज्ञान, सौंदर्यशास्त्र, मानवी गरजा आणि तंत्रज्ञान यांचा समन्वय साधणारे एक व्यापक व्यावसायिक क्षेत्र आहे. एक्स्पोचे आयोजन हे महाराष्ट्रातील सर्जनशीलतेला योग्य दिशा देणारे पाऊल ठरणार आहे, असे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
भारताच्या प्रगतीचा पाया डिझाइन थिंकिंगमध्येच आहे. अभियांत्रिकी, वास्तुकला, उत्पादन, अॅनिमेशन, गेमिंग, डिजिटल कंटेंट, तंत्रज्ञान आदी सर्व क्षेत्रांत डिझाइन नवोपक्रमाची मुख्य ताकद बनली आहे. नवीन अभ्यासक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) एआर/व्हीआर (Augmented & Virtual Reality) UX/UI Creative Technologies बरोबर उद्योग-शैक्षणिक सहकार्य वाढवून विद्यार्थ्यांना हँड्स-ऑन, व्यावहारिक, प्रोजेक्ट-आधारित शिक्षण आणि मोठ्या प्रमाणत रोजगार निर्मिती करण्यात येत आहे. असेही मंत्री श्री पाटील यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर आमदार. पराग अळवणी, उर्मीज आर्ट फोरमच्या संस्थापिका, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कोमल उल्लाल, गुरुचरण सिंग संधू, क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, मोहन वेदपाठक आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment