Saturday, 15 November 2025

STचालक–वाहकांसाठी स्पष्ट उद्दिष्टे – कार्यक्षमतेवर भर डिझेल हा एसटीच्या खर्चातील सर्वांत मोठा घटक. त्यामुळे KPTL (किलोमीटर प्रति १० लीटर)नुसार चालकांना दररोजचे लक्ष्य दिले जाईल. KPTL कमी असणाऱ्यांना समुपदेशन, प्रशिक्षण आणि गरजेनुसार प्रादेशिक स्तरावर उन्नत प्रशिक्षण देण्याचे नियोजन आखले गेले आहे. तिकीट विक्री ही महसुलाची जीवन वाहिनी असल्याने वाहकांना आगाराच्या दैनंदिन CPKM (संचित प्रति किलोमीटर उत्पन्न) प्रमाणे उत्पन्नाचे स्पष्ट उद्दिष्ट देण्यात येणार आहे. उत्पन्न कमी असल्यास समुपदेशन, कर्तव्यात बदल किंवा तोंडी/लेखी समज सर्व पर्याय वापरले जातील. सातत्याने कमी उत्पन्न करणाऱ्या वाहकांवर विशेष लक्ष दिले जाईल. वेळापत्रक व्यवस्थापनात सुधारणांचे वारे एसटीचे वेळापत्रक हा त्याच्या वाहतूक यंत्रणेचा ‘आत्मा’ मानला जातो. लांब पल्ल्याच्या समांतर धावणाऱ्या बसेसवरील तक्रारींची

 चालकवाहकांसाठी स्पष्ट उद्दिष्टे – कार्यक्षमतेवर भर

डिझेल हा एसटीच्या खर्चातील सर्वांत मोठा घटक. त्यामुळे KPTL (किलोमीटर प्रति १० लीटर)नुसार चालकांना दररोजचे लक्ष्य दिले जाईल. KPTL कमी असणाऱ्यांना समुपदेशनप्रशिक्षण आणि गरजेनुसार प्रादेशिक स्तरावर उन्नत प्रशिक्षण देण्याचे नियोजन आखले गेले आहे.

तिकीट विक्री ही महसुलाची जीवन वाहिनी असल्याने वाहकांना आगाराच्या दैनंदिन CPKM (संचित प्रति किलोमीटर उत्पन्न) प्रमाणे उत्पन्नाचे स्पष्ट उद्दिष्ट देण्यात येणार आहे. उत्पन्न कमी असल्यास समुपदेशनकर्तव्यात बदल किंवा तोंडी/लेखी समज सर्व पर्याय वापरले जातील. सातत्याने कमी उत्पन्न करणाऱ्या वाहकांवर विशेष लक्ष दिले जाईल.

वेळापत्रक व्यवस्थापनात सुधारणांचे वारे

एसटीचे वेळापत्रक हा त्याच्या वाहतूक यंत्रणेचा आत्मा’ मानला जातो. लांब पल्ल्याच्या समांतर धावणाऱ्या बसेसवरील तक्रारींची दखल घेत आता सर्व वेळापत्रकांची शास्त्रशुद्ध पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जात आहे. मध्यवर्ती कार्यालयाची मंजुरी असलेल्या फेऱ्याच राबवाव्यातअसे निर्देश देण्यात आले आहेत.

१ जानेवारीला बसस्थानकनिहाय नवे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असून त्याची व्यापक प्रसिद्धी सोशल मीडियाद्वारे केली जाईल. वक्तशीरपणा आणि नियमितता ही एसटीची नवी ओळख बनवण्याचा संकल्प यातून स्पष्ट दिसतो.

एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री

 एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी पंचसूत्री

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

·         दैनंदिन बैठकाउद्दिष्टनिश्चितीनव्या वेळापत्रकासह प्रवासी सेवांच्या उन्नतीचा संकल्प

 

मुंबईदि. १४ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) उत्पन्नवाढकार्यक्षमता आणि प्रवासी सुविधांच्या उन्नतीसाठी सर्वसमावेशक पंचसूत्री आराखडा’ तयार केला आहे. आगार पातळीपासून प्रादेशिक कार्यालयापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी अधिक स्पष्ट करतसुधारणा, वेग’ आणि नियमितता’ या आधारे एसटी महामंडळाला पुढे नेण्याचा निर्धार केल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

मुंबई येथे एसटी महामंडळाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत बोलत होते. बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांच्यासह सर्व खाते प्रमुखप्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रक उपस्थित होते.

दैनंदिन बैठकींनी प्रशासन सज्ज

एसटी स्वतःला चल संस्था’ म्हणून परिभाषित करते. दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या या व्यवस्थेचे मूल्यमापन आणि नियोजन दैनंदिन पातळीवर व्हावेयासाठी सकाळी १० वाजता आगारात११ ला विभागात आणि १२ वाजता प्रादेशिक स्तरावर आढावा बैठक अनिवार्य करण्यात आली आहे.

प्रवासी तक्रारीरद्द फेऱ्यानादुरुस्त वाहनेगैरहजर कर्मचारीया सर्वांची काटेकोर छाननी करून कार्यपद्धतीत तत्काळ सुधारणा करण्याचा आदेश बैठकीत दिला.

संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत आगारविभाग व प्रदेशस्तरावर दुसऱ्या दिवशीच्या वाहतूक आराखड्याचे नियोजन केले जाईल. यात्रांपासून बाजारपेठांपर्यंत आणि शालेय सहलींपासून आकस्मिक गर्दीपर्यंत सर्व परिस्थितीसाठी आगार सज्ज राहणार आहे.

कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत राज्यात १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी

 कुष्ठरोग शोध अभियान अंतर्गत राज्यात

 १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी

मुंबई, दि.१४ : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात मागील पाच वर्षांप्रमाणे यंदाही कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षणाद्वारे कुष्ठरोगाचे रुग्ण शोधण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

यंदाच्या अभियानात ८.६६ कोटी लोकसंख्या आणि १ कोटी ७३ लाख २५ हजार घरे सर्वेक्षणासाठी निवडली असून६५,८३२ पथके आणि १३,१६६ पर्यवेक्षक या मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात प्रत्येक पथक दररोज २० घरेतर शहरी भागात २५ ते ३० घरांना भेट देऊन प्रत्यक्ष शारीरिक तपासणी करणार आहे. प्रत्येक पथकात एक आशा स्वयंसेविका आणि एक पुरुष स्वयंसेवक सहभागी असूनते सलग १४ दिवस सर्वेक्षण करतील.

कुष्ठरुग्ण शोध अभियानाच्या राज्यस्तरीय जनजागरण समितीची बैठक आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला आरोग्य सेवा सहसंचालक (क्षयरोग व कुष्ठरोग) डॉ. राजरत्न वाघमारेराज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचे सहायक संचालक डॉ. संजयकुमार जठारदूरदर्शन प्रतिनिधी डॉ. आलोक खोब्रागडेआकाशवाणी मुंबईचे राजेश शेजवलेअलर्ट इंडियाचे वरिष्ठ प्रोग्रामर विन्सेंट के. ए., ‘अपालचे अध्यक्ष माया रणवरेमहाराष्ट्र कुष्ठ पीडित संघटनेच्या सदस्या मदिना शेखराज्य जागरण समिती सदस्य विकास सावंत या बैठकीला उपस्थित होते.

संशोधित वीज वितरण क्षेत्र योजनेसाठी महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्रीय ऊर्जामंत्री खट्टर यांच्यासोबत बैठक

 संशोधित वीज वितरण क्षेत्र योजनेसाठी महाराष्ट्राला मिळणार 2655 कोटी

मुख्यमंत्री फडणवीस यांची केंद्रीय ऊर्जामंत्री खट्टर यांच्यासोबत बैठक

 

नवी दिल्ली14 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांची नवी दिल्ली येथे भेट घेत पायाभूत सुविधांच्या संशोधित वीज वितरण क्षेत्र योजनेसाठी (आरडीएसएस) महाराष्ट्राला 2655 कोटी रुपये देण्याची मागणी केली. लवकरच हा निधी देण्याचे सोबतच 8000 मेगावॅट तास क्षमतेच्या बॅटरी स्टोरेज प्रकल्पासाठी व्यवहार्यता तूट निधी देण्यासाठी सुद्धा सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिले.

 

नवीनीकरणीय ऊर्जा प्रकल्पात निर्माण झालेली अतिरिक्त वीज बॅटरी स्टोरेज साठवून कमाल मागणीच्या वेळी ती वापरली जाते. यात 4500 मे.वॅ. तास क्षमतेच्या अशा प्रकल्पासाठी केंद्राने यापूर्वीच व्यवहार्यता तूट निधी मंजूर केला आहे. त्याच्या निविदाही जारी करण्यात आल्या आहेत. आता अशा प्रकारचा 8000 मे.वॅ. तास क्षमतेचा आणखी एक प्रकल्प महावितरण उभारत आहे. त्यासाठी व्यवहार्यता तूट निधी देण्यासाठी केंद्र सरकार मदत करेलअसे केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले. सौर ऊर्जा पारेषण जाळ्यातून नेण्यासाठीचे प्रकल्पराज्यातील 18 मोठे सौर प्रकल्पग्रीडच्या तांत्रिक अडचणींवर उपाय अशा विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. या बैठकीत महाराष्ट्रातर्फे ऊर्जा क्षेत्रात हाती घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यात संसाधन पर्याप्तता आराखडामुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनाबॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (बीईएसएस)पंपस्टोरेज प्रकल्प इत्यादींचा समावेश होता.

प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी 'एआय' प्रशिक्षण कार्यशाळा घेणार

 प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी 'एआयप्रशिक्षण कार्यशाळा घेणार

-         कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा

 

मुंबईदि.१४ : प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर आणि त्याचे महत्व लक्षात घेऊन  कौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे पत्रकारांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक कार्यशाळा हा नवा उपक्रम राबवला राबविण्यात येत असून कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी विशेष एआय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालय येथील पत्रकार कक्षात एआय संदर्भात चार दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. समारोप कार्यक्रमात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकरएआय तज्ज्ञ किशोर जशनानी, उपकुलसचिव राजेंद्र तलवारेमंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटेसरचिटणीस दिपक भातुसे, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे  प्रशिक्षक लोमेश नारखेडेसल्लागार गजानन हेगडेवरिष्ठ सल्लागार आशिष श्रीवास्तवप्रशासकीय सहाय्यक ऋषी देठेशॉर्ट टर्म कोर्सेसचे शुभम शेंडेश्रावणी कोचरेभूषण पवार तसेच प्रिंट,इलेक्ट्रॉनिकडिजिटल माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते.

११ ते १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान मंत्रालयात आयोजित या कार्यशाळेत  एआय साधनांचा पत्रकारितेसाठी वापरवृत्ताची पडताळणीमाहिती शोधण्याची गतीतसेच डिजिटल कामकाजातील अचूकता आणि सुलभता याविषयी पत्रकारांना मार्गदर्शन मिळाले. या प्रशिक्षणाला पत्रकारांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा उपक्रम राज्यभर नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा व तालुका स्तरावर काम करणाऱ्या पत्रकारांना आधुनिक एआय साधनांची ओळख आणि त्यांचा वापर प्रत्यक्ष शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या निर्णयाबद्दल कौशल्य मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणालेआज प्रत्येक पत्रकारावर बातमीच्या वेगासोबतच तिची अचूकता टिकवण्याची जबाबदारी वाढली आहे. अशावेळी एआय ही केवळ तांत्रिक सुविधा नाहीतर कामाला नवी धार देणारे साधन आहे. राज्यातील प्रत्येक पत्रकार अधिक सक्षम व्हावाहा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या माध्यमातून पत्रकारांद्वारे जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील आणि हेच या उपक्रमाचे खरे यश ठरेल", राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असून याचबरोबर रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात ‘एआय फॉर न्यूज’ या विषयाचा चार महिन्यांचा डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना आली असून याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असेही श्री.लोढा यांनी सांगितले.

चार दिवसीय कार्यशाळेत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ञ किशोर जशनानी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरताना द्यायचे प्रॉम्प्टचॅट जीपीटीला असलेले पर्यायत्याचप्रमाणे पत्रकारितेसाठी इतर सहायक टूल्स बनविणे. फोटोवरून बातमी करणेफोटोवरून व्हिडिओ लेखन बनविणे, न्यूज रिपोर्ट बनविणे,  प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व  डिजिटल मीडियासाठी बातमी लेखन त्याचप्रमाणे चॅट पीडीएफ चा वापर याबाबत माहिती दिली.

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर म्हणाल्या की‘एआय’ फॉर न्यूज या विषयाचा डिप्लोमा सुरू करण्याची सूचना आली असून याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. कृत्रिम बुद्धिमत्ता ही कार्यशाळा सर्व पत्रकारांना त्यांच्या दैनदिन कामात अत्यंत उपयुक्त ठरेल. पत्रकारांचा या कार्यशाळेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

एआय पत्रकारिता कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले

पत्रकार दीपक कैतकेसंजय जोगक्लारा लुईस यांनी चार दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेविषयी मनोगत व्यक्त केले.

मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी आभार मानले. सरचिटणीस दीपक भातुसे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारिणी सदस्य खंडूराज गायकवाड यांनी कार्यक्रमाचे समन्वयन केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांची भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला भेट · स्टॉलधारकांशी संवाद; उत्पादनांची केली पाहणी

 मुख्यमंत्री फडणवीस यांची भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील

महाराष्ट्र दालनाला भेट

·         स्टॉलधारकांशी संवादउत्पादनांची केली पाहणी







नवी दिल्लीदि. १४ : प्रगती मैदान येथे सुरू असलेल्या ४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  भेट दिली.

भारत व्यापार वृद्धी संस्थे (आयटीपीओ) मार्फत आयोजित या मेळाव्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने 'एक भारत श्रेष्ठ भारतया  संकल्पनेवर आधारित महाराष्ट्र दालनाची उभारणी केली आहे. हे दालन १०९८ चौरस मीटर क्षेत्रात पसरलेले असूनत्याची रचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशावर आधारित आहे. १४ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा मेळा २७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.  यावेळी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक  लोकेश चंद्राउद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबळगनमहाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमलामहाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक पानसरेसहव्यवस्थापकीय संचालक प्रशाली दिघावकर उपस्थित होते. दालनाचे उद्घाटन  सकाळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांनी दालनातील महाराष्ट्र राज्य हस्तकला आणि हातमाग महामंडळविविध स्वयंसहाय्यता गटमराठी भाषा दालनपैठणी कारागीर तसेच इतर स्टॉल्सची पाहणी केली. पैठणी साड्याकोल्हापुरी चप्पलचामड्याच्या वस्तूघरसजावटीच्या वस्तूहॅंड पेंटिंगऑरगॅनिक उत्पादनेकाथ्यापासून बनवलेल्या वस्तूखादी आणि बांबूच्या वस्तू तसेच बचत गटातील महिलांनी बनवलेले खाद्यपदार्थ आदी वस्तू प्रदर्शित करणाऱ्या स्टॉल्सना त्यांनी भेट दिली. स्टॉलधारकांशी संवाद साधून उत्पादनांची माहिती घेतली. तसेच पैठणी स्टॉलवर महिलांशी चर्चाही केली. 

राष्ट्रीय राजधानीत राज्याच्या उत्कृष्ट उत्पादनांचे प्रदर्शन करण्यासाठी उद्योग विभागाच्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबळगन यांनी मेळा संकल्पना आणि उद्योग विभागाने केलेली कार्यवाही याची माहिती दिली.  निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी मेळाव्यात प्रदर्शित विविध उत्पादने व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

या मेळाव्यात झारखंडला फोकस राज्याचा दर्जा देण्यात आला असूनउत्तर प्रदेशबिहारमहाराष्ट्र आणि राजस्थान या चार राज्यांना भागीदार राज्य म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाला आहे.

0000

देशातील २४ भाषांतील बाल साहित्यिकांचा सन्मान

 साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार प्रदान

·       

·         देशातील २४ भाषांतील बाल  साहित्यिकांचा सन्मान

 

नवी दिल्ली, दि. १४: 

इतर २३ भाषांमधील विजेते

डॉ. सावंत यांच्यासह असमियासाठी सुरेंद्र मोहन दास (मइनाहंतर पद्य’ - कविता)बांगलासाठी त्रिदिब कुमार चट्टोपाध्याय (एखनउ गाये काँटा देय’ - कहानी)बोडोसाठी बिनय कुमार ब्रह्म (खान्थि बोसोन आरो आखु दानाय’ - कहानी)डोगरीसाठी पी.एल.परिहार शौक़’ (‘नन्हींटोर’ - कविता)इंग्रजीसाठी नितिन कुशलप्पाएमपी (दक्षिणसाउथ इंडियन मिथ्स अँड फै़ब्लस रिटोल्ड’ - कहानी)गुजरातींसाठी कीर्तिदा ब्रह्मभट्ट (टिंचाक’ - कविता)हिंदीसाठी सुशील शुक्ल (एक बटे बारह’ - संस्मरण)कन्नडसाठी के. शिवलिंगप्पा हंदिहाल (नोटबुक’ - कहानी)कश्मीरीसाठी इज़हार मुबशिर (शुरे ते चुरे ग्युश’ - कहानी)कोंकणीसाठी नयना आडारकार (बेलाबायचो शंकर आनी हेर काणयो’ - कहानी)मैथिलीसाठी मुन्नी कामत (चुक्का’ - कहानी)मलयाळमसाठी श्रीजित मुत्तेडत्तु (पेन्गिनुकळुडे वन्करायळ’ - उपन्यास)मणिपुरीसाठी शांतो एम (अंगाङ्शिङ्गी शान्बुङ्सिदा’ - नाटक)नेपाळीसाठी साङ्मुलेप्चा (शान्ति वन’ - उपन्यास)ओडिआसाठी राजकिशोर पाढ़ी (केते फुल फुटिचि’ - कविता)पंजाबीसाठी पाली खादिम (अमृत पाल सिंह) (जादू पत्ता’ - उपन्यास)राजस्थानीसाठी भोगीलाल पाटीदार (पंखेरुवं नी पीड़ा’ - नाटक)संस्कृतसाठी प्रीति पुजारा (बालविश्वम्’ - कविता)संतालीसाठी हरलाल मुर्मु (सोना मीरु-वाक् सांदेश’ - कविता)सिंधीसाठी हीना अगनाणी हीर’ (‘आसमानी परी’ - कविता)तमिळसाठी विष्णुपुरम सरवणन (ओट्राइचिरगु ओविया’ - उपन्यास)तेलुगुसाठी गंगिशेट्टी शिवकुमार (कबुर्ला देवता’ - कहानी) आणि उर्दूसाठी ग़ज़नफ़र इक्बाल (क़ौमी सितारे’ - लेख) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

0000

 

Featured post

Lakshvedhi