Thursday, 13 November 2025

समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद

 समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांसमवेत संवाद

 

मुंबईदि. १२ : समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण हे ध्येय ठेवत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद प्रशासनात आहे. त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेचा उपयोग करावा. राज्याच्या विकासगाथेला पुढे नेण्याची जबाबदारी सार्थपणे सांभाळण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 

प्रशासनात आलेल्या तुकडीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करत नागरिक केंद्रित व जबाबदार प्रशासन व्यवस्था निर्माण करावीअसे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

            २०२४ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी वर्षा निवासस्थानी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी उपस्थित होते.

संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेमहाराष्ट्र हे सर्वात जास्त नागरीकरण झालेले राज्य आहे. राज्यामध्ये ग्रामीण आणि नागरी विकास केंद्रित प्रशासन गरजेचे आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडे नागरी प्रशासनात मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी आहे.


सांस्कृतिक कार्यक्रम: महाराष्ट्राच्या समृद्ध कला-संस्कृतीचे दर्शन

 सांस्कृतिक कार्यक्रम: महाराष्ट्राच्या समृद्ध कला-संस्कृतीचे दर्शन

महाराष्ट्राची समृद्ध कला आणि संस्कृती दर्शविणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन  शनिवार, 15 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता प्रगती मैदानातील ॲम्फी थिएटर नं. येथे होईल. दोन्ही कार्यक्रमांना मान्यवरांची उपस्थिती राहणार असूनमहाराष्ट्राच्या उद्योग-व्यवसायाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी हे दालन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमाचे पासेस महाराष्ट्र परिचय केंद्रए/स्टेट एम्पोरिया बिल्डिंगबाबा खडकसिंग मार्गनवी दिल्ली या कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी तेथे संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 

भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025मधील महाराष्ट्र दालनाचे 14 नोव्हेंबरला उद्घाटन · सांस्कृतिक कार्यक्रमाचे 15नोव्हेंबरला

 भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025मधील महाराष्ट्र दालनाचे 14 नोव्हेंबरला उद्घाटन

·         सांस्कृतिक कार्यक्रमाचे 15नोव्हेंबरला आयोजन

 

नवी दिल्ली 12 : भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-2025चे 14 ते 27 नोव्हेंबर दरम्यान प्रगती मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वा.  उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

 या कार्यक्रमासउद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगनमहाराष्ट्र सदन सचिव तथा निवासी आयुक्त आर. विमलाविकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्र कुशवाहमहाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ उपाध्यक्ष जयदीप कवाडेव्यवस्थापकीय संचालक विवेक पानसरे आदी उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांच्यावतीने हे दालन उभारण्यात आले आहे. महाराष्ट्र दालनात एकूण 60 गाळे उभारण्यात आले असून एक जिल्हा एक उत्पादनमहिला बचत गटमहिला उद्योजिकायांना गाळ्यांचे वाटप करण्यात

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवावाwww.yuvacareer.com

 संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रम व्यापक स्वरुपात राबवावा

राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

मुंबई दि.१२ : 'संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच भारतीय संविधानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी हा उपक्रम अधिक व्यापक स्वरुपात राबवावाअशा सूचना महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिल्या.

‘संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा उपक्रम २०२५’ ची आढावा बैठक महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या कार्यालयात  झाली.  बैठकीस  शिक्षणसामाजिक न्याय,  इतर मागास बहुजन कल्याण विभागआदिवासीअल्पसंख्यांक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले कीया स्पर्धेचे प्रारूप लवकरच तयार केले जाणार आहे. संबंधित विभागांनी या स्पर्धेची संपूर्ण पूर्वतयारी करावी. प्रत्येक शाळेतून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी जनजागृती करावी. या स्पर्धेसाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद शाळांना उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून करण्यात यावी.

शालेय शिक्षण विभागाने हा उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात राबवण्यासाठी आवश्यक परवानगी त्यांच्या स्तरावर घ्यावी.  याबाबत तातडीने कार्यवाही करून अहवाल कार्यालयास सादर करावा, असेही धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.

आदिवासी विकास विभागाने त्यांच्या अखत्यारित असलेल्या वसतिगृहात हा उपक्रम राबवण्याची संपूर्ण तयारी केली असल्याचे सांगितले. सामाजिक न्याय विभागानेही शासकीय निवासी शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यासाठी  खर्चाची तरतूद केली जात असल्याचे सांगितले. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे सांगितले.

अल्पसंख्यांक विभागामार्फत अल्पसंख्यांक विभाग योजनेचे लाभार्थी मुलांची वसतिगृहशिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी यांनाही उपक्रमात सहभागी करून घेतले जाईल असे सांगितले. प्रश्नमंजुषा उपक्रम www.yuvacareer.com या संकेतस्थळाद्वारे राबविण्यात येणार आहे.

आरोग्य पर्यटनाअंतर्गत राज्यात दंतोपचाराला मोठी संधी

 आरोग्य पर्यटनाअंतर्गत राज्यात दंतोपचाराला मोठी संधी

-         सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

·         डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम डेंटल एक्सलन्स सेंटरला भेट

 

मुंबईदि. १२ : महाराष्ट्र शासन आरोग्य पर्यटनाला चालना देणार असूनराज्यात विशेषतः मुंबईत असलेल्या पायाभूत सुविधाकुशल तज्ज्ञ आणि कमी खर्चातील सेवा यामुळे दंत उपचाराला आरोग्य पर्यटनाच्या क्षेत्रात मोठी संधी असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

 

इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीएतर्फे स्थापन करण्यात आलेल्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम एज्युकेशनरिसर्च अँड इन्क्युबेशन सेंटर (प्रभादेवीमुंबई) येथे सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांनी भेट देऊन केंद्राची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.

 

सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले कीदंतोपचारसेवेची जागतिक मागणी वाढत आहे. आंतरराष्ट्रीय रुग्णांना आकर्षित करण्यासाठी जागतिक दर्जाची सेवा मुंबईत आहे. इंडियन डेंटल असोसिएशन गिनीजबुक मध्ये रेकॉर्ड असलेली जागतिक दर्जाची संस्था गेली 78 वर्षे चांगली सेवा देत आहे. संशोधन आणि प्रशिक्षण क्षेत्रात आयडीए चे काम उत्तम आहे. राज्य शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशन मिळून दंत आरोग्य जनजागृतीप्रतिबंधात्मक कार्यक्रमसंशोधन आणि कौशल्यविकास या क्षेत्रात काम करता येईलअसेही त्यांनी सांगितले.

 

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांचे स्वागत आयडीएचे मानद सरचिटणीस डॉ. अशोक धोबळे यांनी केले व अत्याधुनिक सुविधांची सविस्तर माहिती दिली. डॉ. अशोक धोबळे म्हणाले कीमंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. या भेटीने प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविण्याचा आमचा संकल्प अधिक दृढ झाला आहे.

 

हेल्दी स्माईल मिशन २०२५ अंतर्गत महाराष्ट्र शासन आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांनी एकत्रितपणे दंत आरोग्य सुधारणा व प्रतिबंधात्मक सेवा देण्याचा संकल्प केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसंदर्भात बैठक

 संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीसंदर्भात बैठक

·        सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांना संकल्पचित्राचे सादरीकरण

 

मुंबईदि. 12 :  रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारण्याच्या अनुषंगाने या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे सादरीकरण सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्याकडे करण्यात आले.

 

माजी आमदार प्रमोद जठार यांनी हे स्मारक वेगवेगळ्या टप्प्यात करून ते अधिक भव्यदिव्य व्हावे अशी मागणी केली होती. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर स्मारक उभारावेअशी सूचना केली होती. याबाबत संकल्पना समजून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी पहिल्या टप्प्यात संकल्पचित्रानुसार मुख्य स्मारकाचे काम करण्याचे निर्देश दिले. तसेच माजी आमदार प्रमोद जठार यांनी मांडलेल्या सूचनेनुसार आजूबाजूच्या परिसरात पर्यटकांसाठी सेवासुविधा व विकासाच्या कल्पनांचा अभ्यास करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशी दिले. प्रस्तावित स्मारक 5 एकर क्षेत्रात उभारले जाणार असूनपार्किंग आणि अन्य सुविधांसाठी अतिरिक्त 2 एकर जागा शासनाने घेतली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार

 लंडन मधील ऐतिहासिक ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार

- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

 

मुंबईदि. 12 : भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे वास्तव्य असलेले लंडनमधील "इंडिया हाऊस"  महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करेल. या इंडिया हाऊसमध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वास्तव्य होतेअशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

 

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार हे नागपूरकरचे रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होतेतेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिली होती. त्यावेळी लंडनस्थित भारतीयांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही ही मागणी केली होती. याबाबत आमदार देवयानी फरांदेसामान्य प्रशासनसांस्कृतिक कार्यपुरातत्व विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात आला.

 

"मित्रा"च्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यात सामान्य प्रशासन विभागसांस्कृतिक कार्य विभागपुरातत्व विभाग आणि वित्त विभागाचा सहभाग असेल. ही समिती इंडिया हाऊस’ ताब्यात घेण्याबाबतचा सर्वंकष अहवाल तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Featured post

Lakshvedhi