Tuesday, 11 November 2025

कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण · ३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य


 कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

·         ३८ वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य

 

मुंबईदि. ११ : राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच 'शाश्वत शेती - समृद्ध शेतकरीया नवीन घोषवाक्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे अनावरण करण्यात आले. तसेच बोधचिन्ह स्पर्धेतील विजेता आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेक्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफजलसंपदा मंत्री गिरीश महाजनकृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वालमुख्य सचिव राजेश कुमारकृषी आयुक्त सूरज मांढरेउपसचिव प्रफुल्ल ठाकूरसंचालक रफिक नाईकवाडीकृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

2018 च्या शासन निर्णयानुसार 25 हजार लोकसंख्येच्या मागे एक सेवा केंद्र

 2018 च्या शासन निर्णयानुसार 25 हजार लोकसंख्येच्या मागे एक सेवा केंद्र होतेआता ती संख्या वाढवून दोन केंद्रे करण्यात आली आहेत. या माध्यमातून नागरिकांना दाखलेप्रमाणपत्रेनॉन-क्रीमीलेअरअधिवासउत्पन्न दाखला अशा एक हजारहून अधिक सेवांचा लाभ मिळतो. शासकीय कार्यालयात वारंवार फेऱ्या न मारतानागरिकांना त्यांच्या परिसरातच सेवा मिळावीहा या योजनेचा हेतू असल्याचेही पालकमंत्री ॲड शेलार यांनी सांगितले

आपले सरकार सेवा केंद्र’ नागरिकांच्या विश्वासाचे प्रतिक व्हावे

 आपले सरकार सेवा केंद्र’ नागरिकांच्या विश्वासाचे प्रतिक व्हावे

- मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार

·         मुंबई उपनगरात २३८ आपले सरकार सेवा केंद्रांचे वितरण

 

मुंबईदि. 10 : शासनाने सुरू केलेली आपले सरकार सेवा केंद्र’ ही योजना नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सेवांचा सुलभ लाभ मिळवून देण्यासाठी आहे. त्यामुळे मुंबई उपनगरातील प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र हे नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक व्हावेअशी अपेक्षा माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केली          

चेतना महाविद्यालय येथील सभागृहात आयोजित आपले सरकार सेवा केंद्र वितरण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियारउपजिल्हाधिकारी सुभाष काकडे तसेच मुंबई उपनगरातील आपले सरकार सेवा केंद्र चालक उपस्थित होते.

बैठकीत रस्ता अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात

 बैठकीत रस्ता अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ब्लॅक स्पॉट्स दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यातअशी सूचना करण्यात आली.

 

केंद्र सरकारच्या आयआरएडी पोर्टलचा प्रभावी वापरआयटीएमएसएटीएस आणि एडीटीटी प्रकल्पांची गतिमान अंमलबजावणीतसेच हेल्मेटचा अनिवार्य वापर या विषयांवरही समितीने भर दिला. सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनीही दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करणे बंधनकारक असल्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

 

तसेच जिल्हास्तरावर नियमितपणे रस्ता सुरक्षा समित्यांच्या बैठका घेऊन अपघात प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. रस्ता सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यातील अपघात आणि अपघाती मृत्यू रोखण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती करा - रस्ता सुरक्षा समितीची राज्य सरकारला सूचना :

  

अपघात रोखण्यासाठी समन्वयाने कृती करा

- रस्ता सुरक्षा समितीची राज्य सरकारला सूचना :

 

सर्वोच्च न्यायालयाच्या समितीची मुख्य सचिवांसमवेत बैठक;

हेल्मेट वापर आणि ब्लॅक स्पॉट्स कमी करण्यावर विशेष भर

 

मुंबईदि. 10 : सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश तथा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील रस्ता सुरक्षा उपाययोजनांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली. बैठकीस मुख्य सचिव राजेशकुमार तसेच गृहपरिवहननगर विकाससार्वजनिक बांधकामसार्वजनिक आरोग्य आणि शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

सनितीचे अध्यक्ष अभय सप्रे 9 ते 14 नोव्हेंबरदरम्यान मुंबईपुणे दौऱ्यावर असूनरस्ता सुरक्षा सुधारणा आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली.

 

Other Useful Services

 Other Useful Services

The “Find Wireline Internet Service Providers (ISPs)” service helps citizens easily identify licensed ISPs in their locality.

The “Trusted Contact Details” feature enables users to verify the authenticity of websites, email IDs, or contact numbers, protecting them from online fraud.

Strengthening National Security

 Strengthening National Security

The Sanchar Saathi portal has also been instrumental in tackling cases where international numbers appear as Indian (+91) numbers to defraud citizens.

The Department of Telecommunications and Police authorities coordinate closely to investigate such cases promptly, disable fraudulent networks, and thereby reinforce national security.

Citizens are requested to report any international calls appearing from Indian numbers by contacting the toll-free helpline 1963.

Featured post

Lakshvedhi