Monday, 10 November 2025

महिला सक्षमीकरण आणि नवकल्पनांच्या नव्या युगात प्रवेश केला

   मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेब्रिटनमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हतात्या काळात भारतरत्न महर्षी कर्वे यांनी 1916 मध्ये महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज आपण महिला सक्षमीकरण आणि नवकल्पनांच्या नव्या युगात प्रवेश केला आहे. राज्य शासनाने नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी धोरण तयार केले आहे. तरुणांच्या स्वप्नांना पंख देण्याची सरकार आणि विद्यापीठांची भूमिका असून राज्य शासन प्रत्येक टप्प्यावर नवउद्योजकांना साहाय्य करीत आहे.

नाविन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची संधी

 नाविन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची संधी

     मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

        मुंबईदि. 9 - भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील 45 टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेतही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र हे देशाचे खरे 'स्टार्टअप कॅपिटलअसल्याचे सांगून भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा आणि त्यातही महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर तरुणांच्या मनातील प्रत्येक कल्पना ही नाविन्यता असून स्टार्टअप्सच्या या काळात प्रत्येक व्यक्तीला नवउद्योजक बनण्याची संधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

            एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 'इनोव्हेशन महाकुंभ 2025' चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जुहू येथील विद्यापीठ परिसरात झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महिला शिक्षणाचे महत्त्व जाणून महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करणाऱ्या भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठामार्फत केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहकाऱ्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कौशल्य विकासरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाकौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्माकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आर्मस्ट्रॉंग पामेराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेएसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ.उज्वला चक्रदेव, ‘नॅकचे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे आदी यावेळी उपस्थित होते.

Keep Your Mobile IMEI Information Safe

 Keep Your Mobile IMEI Information Safe

Citizens are urged to preserve the original invoice of their mobile purchase, as it contains the device’s IMEI number.

If a device has two SIM card slots, it will have two different IMEI numbers.
Users can check their IMEI numbers by dialling *#06#, and are advised to save a screenshot of the information securely in their email or other safe location.

This ensures that in case of loss or theft, all relevant details are readily available for necessary action.

Through Sanchar Saathi, users can prevent the misuse of lost mobile phones and play an active role in ensuring cyber safety by reporting fraud or suspicious communications.

Key Services on the Portal and App

 Key Services on the Portal and App


The Sanchar Saathi portal offers the following important services:


Know Your Mobile Connections – to check the number of mobile connections registered under a person’s name.

Block Your Lost/Stolen Mobile – to block the IMEI of a lost or stolen mobile handset.

Verify IMEI – to verify the authenticity of a device and its IMEI number.

These services strengthen mobile identity management and enhance user safety.


In addition, through a special feature named “Chakshu”, citizens can report suspicious calls, SMS, or WhatsApp messages, thereby helping prevent fraud, cybercrime, fake identities, and unsolicited commercial communications.

Sanchar Saathi’ Portal and App: Towards Transparency, Security, and Citizen Participation in the Telecom Sector

 Sanchar Saathi’ Portal and App: Towards Transparency, Security, and Citizen Participation in the Telecom Sector

Mumbai, November 8: To ensure the digital safety of over 1.2 billion telecom subscribers in India, particularly mobile users, the Department of Telecommunications (DoT) has launched a citizen-centric initiative called “Sanchar Saathi.” Introduced in May 2023, this digital platform provides mobile users with greater control over their connections, protection against fraud, and a convenient mechanism to report security threats.

Vinay Jambhali, Director, Mumbai LSA Telecom Department, and Sumnesh Joshi, Deputy Director General (DDG), appealed to citizens across Maharashtra to remain alert and responsible regarding cyber safety.

Citizens are advised to remove unnecessary apps from their mobile devices, keep their phones updated with the latest security software, and download the ‘Sanchar Saathi’ app to benefit from its user-friendly and protective features.

पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु

 पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरुhttps://mahaelection.gov.in/Citizen/Login

 

मुंबईदि. 8 : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणेनागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघतसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर, 2025 पर्यंत पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून अनुक्रमे प्रपत्र 18 व 19 मध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील. त्यानुसार 25 नोव्हेंबर, 2025 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.

 

यानंतर 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत नागरिकांना या यादीविषयी दावे व हरकती सादर करण्याची संधी मिळेल. तसेच 6 नोव्हेंबर नंतरही पदवीधर आणि शिक्षकांना प्रपत्र 18 व 19 द्वारे मतदार नोंदणी करण्याची मुभा असेल.

 

10 डिसेंबर, 2025 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर विचार करून 30 डिसेंबर, 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

 

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे. इच्छुकांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावेतअसे आवाहन करण्यात आले आहे.

 

मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता निकषआवश्यक कागदपत्रे व संबंधित माहिती या संकेतस्थळावरील Manual या विभागात पाहता येईल. त्यामुळे अद्याप अर्ज सादर न केलेल्या पात्र पदवीधर व शिक्षकांनी तात्काळ आपली नोंदणी करून घ्यावीअसे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रमुख प्रचारकांची संख्या आता 20 ऐवजी 40

 प्रमुख प्रचारकांची संख्या आता 20 ऐवजी 40

 

मुंबईदि. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने 20 वरून 40 केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवून 40 करण्यात यावीअशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या कार्यालयात 14 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत केली होती. महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणीविनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, 2025’ मधील परिच्छेद 26 मध्ये प्रमुख प्रचारकांसंदर्भातील तपशील नमूद केला आहे. त्यातील तरतुदींच्या आधारे आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही संख्या वाढविण्यात आली आहे. राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल.

 


Featured post

Lakshvedhi