Monday, 10 November 2025

श्रीवर्धनच्या धर्तीवर दिवेआगर समुद्र किनारा विकसित करणार

 श्रीवर्धनच्या धर्तीवर दिवेआगर समुद्र किनारा विकसित करणार

-         महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबईदि. ३१  : श्रीवर्धनच्या धर्तीवर दिवेआगर समुद्र किनाऱ्याचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यात येणार असूनआधुनिक सुविधासंग्रहालय तसेच स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत हा किनारा लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येईलअशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

दिवेआगर समुद्र किनाऱ्याच्या सौंदर्यीकरणासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीदिवेआगर किनाऱ्याचा सौदर्य दृष्टीने विकास श्रीवर्धन किनाऱ्याच्या धर्तीवर करण्यासंदर्भात कार्यवाही जलद गतीने करावी. यासाठी उच्च दर्जाची व शाश्वत साधनसामग्री वापरून पर्यावरणपूरक सुविधा उभारण्यात याव्यात. पर्यटकांना स्वच्छसुरक्षित आणि आकर्षक वातावरण उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.

वन विभागाला देण्यात येणारे प्रस्ताव सल्लागार संस्थांच्या माध्यमातून तातडीने पाठविण्यात यावेत. तसेच समुद्र किनाऱ्याच्या विकासादरम्यान पर्यावरणाचे संतुलन राखून वृक्षांचे पुनर्रोपण करण्यावर भर द्यावा. या विकास प्रकल्पामुळे दिवेआगर परिसरातील पर्यटन वाढून स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

000

एखादी कल्पना जेव्हा बाजारपेठेत रूपांतरित होते, तेव्हा ती अर्थव्यवस्थेला गती देते. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डेटा ॲनालिटिक्समुळे

 एखादी कल्पना जेव्हा बाजारपेठेत रूपांतरित होते, तेव्हा ती अर्थव्यवस्थेला गती देते. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डेटा ॲनालिटिक्समुळे आता नव्या कल्पनांना वेग मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्टार्टअप इंडिया उपक्रमामुळे आज भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची स्टार्टअप इकॉनॉमी बनला असून लवकरच दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

            कार्यक्रमात महिला उद्योजकांनी विकसित केलेल्या नवकल्पनांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी प्रदर्शनाची पाहणी करून सर्व नवोन्मेषकांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी वैद्यकीयकृषी आणि वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट तीन स्टार्टअप कल्पनांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्री इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले

महाराष्ट्र हे भारताचे खरे 'स्टार्टअप कॅपिटल' ---- नाविन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची संधी

 महाराष्ट्र हे भारताचे खरे 'स्टार्टअप कॅपिटल'

----

नाविन्यपूर्ण कल्पना असणाऱ्या प्रत्येकाला नवउद्योजक बनण्याची संधी

 

 

        मुंबईदि. 9 - भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात असून यातील 45 टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहेतही अभिमानाची बाब आहे. महाराष्ट्र हे देशाचे खरे 'स्टार्टअप कॅपिटलअसल्याचे सांगून भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा आणि त्यातही महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर तरुणांच्या मनातील प्रत्येक कल्पना ही नाविन्यता असून स्टार्टअप्सच्या या काळात प्रत्येक व्यक्तीला नवउद्योजक बनण्याची संधी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

            एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 'इनोव्हेशन महाकुंभ 2025' चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जुहू येथील विद्यापीठ परिसरात झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महिला शिक्षणाचे महत्त्व जाणून महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करणाऱ्या भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठामार्फत केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सहकाऱ्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कौशल्य विकासरोजगारउद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढाकौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्माकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव आर्मस्ट्रॉंग पामेराज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरेएसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ.उज्वला चक्रदेव, ‘नॅकचे अध्यक्ष प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे आदी यावेळी उपस्थित होते.

भूकरमापक पदांसाठी १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा

 भूकरमापक पदांसाठी १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन परीक्षा

 मुंबई, दि. ९ - भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमूह ४ (भूकरमापक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता १३ आणि १४ नोव्हेंबर २०२५ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक आणि उमेदवारांच्या प्रवेशपत्राची लिंक विभागाच्या https://mahabhumi.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जमाबंदी आयुक्त आणि भूमि अभिलेख संचालक डॉ. सुहास दिवसे यांनी कळविले आहे.

            भूमि अभिलेख विभागातील उपरोक्त रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता १ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार विहीत कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी १३ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात पुणे आणि अमरावती विभागात परीक्षा होणार असून या विभागात परीक्षा केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर सकाळी ८ वाजता उपस्थित राहावयाचे आहे. तर दुसऱ्या सत्रात नाशिक आणि नागपूर विभागांमध्ये केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी दुपारी १२ वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे. दिनांक १४ नोव्हेंबर रोजी पहिल्या सत्रात मुंबई (कोकण) विभागात परीक्षा केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी सकाळी ८ वाजता तर दुसऱ्या सत्रात छत्रपती संभाजीनगर विभागात केंद्र असणाऱ्या उमेदवारांनी दुपारी बारा वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावयाचे आहे. या परीक्षा पद्धतीबाबतची सविस्तर माहितीपुस्तिका विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे भूमि अभिलेख कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. 

महाराष्ट्र है भारत की असली ‘स्टार्टअप राजधानी’ –

 महाराष्ट्र है भारत की असली स्टार्टअप राजधानी’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 9 मार्च: भारत में सबसे अधिक पंजीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्र में हैंजिनमें से 45 प्रतिशत स्टार्टअप्स महिलाओं के नेतृत्व में हैंयह गर्व की बात है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि राज्य वास्तव में देश की स्टार्टअप राजधानी है और भारत की पांच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था को हासिल करने में महाराष्ट्र और विशेष रूप से महिला उद्यमियोंका बड़ा हिस्सा होगा।

जुहू स्थित एसएनडीटी महिला विश्वविद्यालय के परिसर में आयोजित इनोवेशन महाकुंभ 2025 के उद्घाटन सत्र में उन्होंने यह बात कही। उन्होंने यह भी कहा कि युवाओं के मन में हर विचार नवप्रवर्तन है और इस स्टार्टअप के युग में हर व्यक्ति को नया उद्यमी बनने का अवसर है।

उन्होंने ब्रिटेन में उस युग की बात याद दिलाईजब महिलाओं को मतदान का अधिकार नहीं थालेकिन 1916 में महर्षी धोंडो केशव कर्वे ने महिलाओं के लिए स्वतंत्र विश्वविद्यालय स्थापित किया। उनकी दूरदृष्टि ने आज महिला सशक्तिकरण और नवप्रवर्तन के नए युग का मार्ग प्रशस्त किया है। राज्य सरकार ने नवउद्यमियों को प्रोत्साहन देने के लिए नीति बनाई है। उन्होंने कहा कि युवाओं के सपनों को पंख देने में सरकार और विश्वविद्यालयों की महत्वपूर्ण भूमिका है और राज्य सरकार हर कदम पर नवउद्यमियों का समर्थन कर रही है।

फडणवीस ने आगे बताया कि आज नवप्रवर्तन सिर्फ नए उत्पाद नहीं ला रहाबल्कि जीवन को और सरल बन रहा है। जब किसी विचार को मार्केट में उतारा जाता हैतो वह अर्थव्यवस्था को गति देता है और आर्टिफिशियल इंटेलिजेंस एवं डेटा एनालिटिक्स ने नई सोच को तेजी दी है। उन्होंने यह विश्वास व्यक्त किया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा शुरू किए गए स्टार्टअप इंडिया’ अभियान की वजह से भारत दुनिया की तीसरी सबसे बड़ी स्टार्टअप इकॉनॉमी बना है और जल्द ही दूसरी सबसे बड़ी बनेगा।

प्रमुख प्रचारकांची संख्या आता 20 ऐवजी 40

 प्रमुख प्रचारकांची संख्या आता 20 ऐवजी 40

 

मुंबईदि. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या प्रमुख प्रचारकांच्या (Star Campaigner) संख्येची मर्यादा आता राज्य निवडणूक आयोगाने 20 वरून 40 केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी असलेली प्रमुख प्रचारकांची मर्यादा वाढवून 40 करण्यात यावीअशी मागणी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आयोगाच्या कार्यालयात 14 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत केली होती. महाराष्ट्र राज्य राजकीय पक्ष नोंदणीविनियमन आणि निवडणूक चिन्ह (आरक्षण व वाटप) आदेश, 2025’ मधील परिच्छेद 26 मध्ये प्रमुख प्रचारकांसंदर्भातील तपशील नमूद केला आहे. त्यातील तरतुदींच्या आधारे आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी केलेली मागणी लक्षात घेऊन ही संख्या वाढविण्यात आली आहे. राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल.

 

00000


डिजिटल युगातील नागरिकांचा साथीदार

 डिजिटल युगातील नागरिकांचा साथीदार

शासनाच्या या उपक्रमामुळे देशातील नागरिक डिजिटल युगात अधिक सुरक्षितसजग आणि सशक्त बनत असूनसंचार साथी हा उपक्रम नागरिकांच्या हिताचा खरा साथीदार ठरत आहे.

अधिक माहितीसाठी  www.sancharsaathi.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Featured post

Lakshvedhi