Wednesday, 5 November 2025

नामनिर्देशनपत्रासाठी संकेतस्थळ

 नामनिर्देशनपत्रासाठी संकेतस्थळ

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. एका नोंदणीद्वारे  संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येऊ शकतील. संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत काढून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ती प्रत विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक राहील.

जात वैधता प्रमाणपत्राचा पुरावा

 जात वैधता प्रमाणपत्राचा पुरावा

राखीव प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहेपरंतु जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मुभा देण्यासाठी शासनाने संबंधित अधिनियमात दुरुस्ती केली आहे. मात्र, असा उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून त्याला सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहेअन्यथा त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्याची संबंधित अधिनियमात तरतूद करण्यात आली आहेअसेही वाघमारे यांनी सांगितले.

एकापेक्षा अधिक मते देणे अपेक्षित

 एकापेक्षा अधिक मते देणे अपेक्षित

नगरपरिषदेच्या निवडणुकीत बहुसदस्यी पद्धती असून एका प्रभागात सर्वसाधारणपणे दोन जागा असतात. एकूण सदस्य संख्येचा विषम आकडा असलेल्या नगरपरिषदेत एका प्रभागात तीन जागा असतात. त्याचबरोबर थेट अध्यक्षपदासाठीदेखील मतदान होत असल्याने साधारणतएका मतदाराने तीन ते चार जागांसाठी मत देणे अपेक्षित आहे. एका नगरपरिषदची एकूण सदस्य संख्या कमीत कमी 20 ते 75 पर्यंत असते.

 नगरपंचायतीची निवडणूक एकसदस्यीय पद्धतीने होत असली तरी नगरपंचायतीच्या मतदारानेदेखील दोन मते देणे अपेक्षित आहे. एक मत सदस्यपदासाठीतर दुसरे मत थेट अध्यक्षपदासाठी द्यावे लागेल. सर्व नगरपंचायतीमध्ये सदस्यपदाच्या 17 जागा असतात.

288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान 3 डिसेंबर 2025 मतमोजणी

  

288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान

3 डिसेंबर 2025 मतमोजणी

 

मुंबई, दि. 04 : राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदानतर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहेत. या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली. सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यावेळी उपस्थित होते. दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2025 असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी 18 नोव्हेंबर 2025 रोजी होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंततर अपील असलेल्या ठिकाणी  25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.

राज्यातील एकूण 247 पैकी 246 नगरपरिषदांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणूक होत असलेल्यांपैकी 10 नवनिर्मित नगरपरिषदा आहेतउर्वरित सर्व 236 नगरपरिषदांची मुदत संपली आहे. न्यायालयीन प्रकरणामुळे पातूर (जि. अकोला) नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे. त्याचबरोबर एकूण 147 पैकी 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. निवडणूक होत असलेल्यांपैकी 15 नवनिर्मिततर उर्वरित सर्व 27 नगरपंचायतींची मुदत यापूर्वीच संपली आहे. 105 नगरपंचायतींची मुदत अद्याप संपलेली नाही. निवडणुकांच्या तयारीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्याही प्रतिनिधींशीही संवाद साधण्यात आला असल्याचे वाघमारे यांनी सांगितले.

सप्तसूत्री कातकरी उत्थान समितीच्या कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर करावा

 सप्तसूत्री कातकरी उत्थान समितीच्या कामकाजाचा

 सविस्तर अहवाल सादर करावा

-         आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

 

मुंबईदि. 4 : राज्यातील कातकरी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी गठीत सप्तसूत्री कातकरी उत्थान समितीच्या कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.

 

कातकरी जमातीच्या विविध प्रश्नाच्या अनुषंगाने श्रमजीवी  संघटनेने विविध मागण्याबाबत निवेदन सादर केले होते. या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके यांनी मंत्रालयात आढावा बैठक  घेतली. यावेळी आमदार स्नेहा पंडित व संबंधित अधिकारी व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच दुरदृश्य प्रणालीद्वारे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त,  ठाणे पालघर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

 

            मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणालेया समितीमार्फत कातकरी समाजाच्या शिक्षणआरोग्यनिवासरोजगारउद्योग प्रशिक्षणजमीन हक्क व सामाजिक सक्षमीकरण या सातही घटकांवर विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना देऊन पुढील कालावधीसाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचविण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांनी अधिक कार्यक्षमतेने काम करावेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

 

ठाणे पालघर जिल्ह्यात कातकरी जमातीच्या लहान मुलांची खरेदी विक्रीबाल विवाहाच्या घटना ह्या गंभीर असून यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत. या मुलांना बालमजुरीवेठबिगारी यातून मुक्त करून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिल्या.

 

कोलामकातकरी व माडिया जमातीसाठी असणाऱ्या केंद्राच्या योजनांच्या अंतर्गत घरकुलाचा लाभ तात्काळ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. कातकरी जमातीला आधार कार्ड मिळवून देण्यासाठी ठाणे पालघर प्रशासनाने कॅम्पचे आयोजन करावे. तसेच कातकरी जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची सूचना ही मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केली.

00000

भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार समितीच्या बैठकीत प्रस्तावांचा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी घेतला आढावा

 भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार समितीच्या बैठकीत

प्रस्तावांचा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी घेतला आढावा

 

मुंबईदि.४ : २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षाकरीता भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ही बैठक आदिवासी विकास मंत्री  डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली.

 

बैठकीदरम्यान संबंधित प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री वुईके यांनी सदस्य सचिवांना पुरस्कार प्रक्रियेबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

 

या बैठकीस संबंधित अधिकारी व  आमदार मिलिंद नरोटेआदिवासी विकास विभागाचे आयुक्त तसेच संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

00000

मोहिनी राणे/स.सं


 


शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्ये महत्वाची

 शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्ये महत्वाची

- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. ४ : शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्य महत्वाची असून त्यासाठी कार्यक्रम तयार करावा अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या. मंत्रालयात आज शासकीय शाळांमध्ये योग आणि जीवनकौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याबाबत बैठक झाली त्यावेळी मंत्री भुसे बोलत होते.

वेळी शालेय शिक्षण विभागाचे सचिव रणजीत सिंह देओल यांच्यासह संबंधित अधिकारी आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुलांमध्ये चांगले विचार तयार होणे आणि चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडवणे हा शिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगून मंत्री भुसे म्हणाले की, योगा हा जीवन कौशल्यचा एक भाग आहे. तसेच स्व संरक्षण आणि कलागुणांनाही वाव मिळाला पाहिजे. मुलांमध्ये या सर्व गोष्टींचा विकास करण्यासाठी कर्यक्रम तयार करावा. प्रायोगिक तत्वावर नाशिक जिल्ह्यातील काही शाळांमध्ये हा उपक्रम रबावण्यात यावा. तसेच येत्या आठ दिवसात या उपक्रमांचा आराखडा तयार करावा, अशा सूचनाही मंत्री भुसे यांनी दिल्या.


00000

Featured post

Lakshvedhi