भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार समितीच्या बैठकीत
प्रस्तावांचा आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी घेतला आढावा
मुंबई, दि.४ : २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षाकरीता भगवान बिरसा मुंडा आदिवासी भूषण पुरस्कार देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत पुरस्कारासाठी प्राप्त प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ही बैठक आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली.
बैठकीदरम्यान संबंधित प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री वुईके यांनी सदस्य सचिवांना पुरस्कार प्रक्रियेबाबत पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
या बैठकीस संबंधित अधिकारी व आमदार मिलिंद नरोटे, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त तसेच संबंधित अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
00000
मोहिनी राणे/स.सं
No comments:
Post a Comment