Wednesday, 5 November 2025

जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 5 व 6 नोव्हेंबर 2025 रोजी दोन दिवस होणार संविधानाचा जागर

 जिल्ह्यांमध्ये भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त

 सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

 5 व 6 नोव्हेंबर 2025 रोजी दोन दिवस होणार संविधानाचा जागर

 

मुंबईदि. 4 : यंदाचे वर्ष भारतीय संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जाणार आहे.

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. छत्रपती शिवाजी नाट्यमंदिरदादरमुंबई या ठिकाणी दि. 5 व 6 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:30 ते 10:00 या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 5 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:30 ते 10.00 या वेळामध्ये "गौरवगाथा संविधानाची" सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन अमेय पाटीलसंगीत संयोजन योगेश पवारसुप्रसिध्द गायक दिनेश हेलोडेसचिन आगवणेनितेश मोरे आणि गायिका संगीता पांचाळनिवेदन प्रतिक पवार करणार आहेत. 6 नोव्हेंबर 2025 रोजी "राष्ट्रग्रंथ - आधारस्तंभ लोकशाहीचा" हे प्रसाद थोरवे आणि अभिराम भडकमकर लिखित कुमार सोहोनी दिग्दर्शित दोन अंकी नाटक सादर केले जाणार आहे. या नाटकांत 40 पेक्षा जास्त कलाकारांचा समावेश आहे. 

"गौरव गाथा संविधानाची" या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन डॉ.किरण कुलकर्णीसचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांचे लाभले आहे.

रसिक प्रेक्षकांनी या सर्व कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावाअसे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

संघर्ष महत्त्वाचा तशी सबुरी फार महत्त्वाची

 संघर्ष महत्त्वाचा तशी सबुरी फार महत्त्वाची

- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आतापर्यंत मी 29 पुस्तके गेल्या ३० वर्षांत लिहिली. महिला धोरणे जी वेगवेगळी झालीत्याचबरोबर स्त्रियांच्या अत्याचाराच्या विरोधात प्रतिबंध करण्यासाठी काय करता येईलयाची यशस्वी झालेली उदाहरणे या पुस्तकामध्ये लिहिली आहेत.

आरक्षण मिळालेपरंतु संरक्षण मिळालं नाही. त्यावेळेला आम्हाला मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडेंनी विचारलंतुम्ही मला एक कार्यक्रम सांगाकी कुठला कार्यक्रम केलातर महिलांना फायदा होईल. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतंदारुविरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांवर दाखल गुन्हे काढून टाकाआणि तिसऱ्या दिवशी ३२ हजार महिलांवरचे गुन्हे मागे घेण्यात आले. अशी अनेक उदाहरणं आहेत. पण हे काम करत असतानाअनुभव येत होताजसा संघर्ष महत्त्वाचा आहे तशी सबुरी फार महत्त्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.

'दाही दिशाम्हणजे काय तर पूर्व-पश्चिमदक्षिण-उत्तरईशान्यआग्नेयवायव्यनैऋत्य बरोबरऊर्ध्व आणि अध्व या दहा दिशांनी येणारी जी संकटं आहेतत्याचा मुकाबला करण्यासाठीआम्हाला दाही दिशांनी शक्ती दे परमेश्वरा असा त्याचा अर्थ आहे. दैनिक सकाळमधील एका सदरामधून दर शनिवारी लेख छापून येत होते. त्याच्यातील निवडक लेख आणि साधारण ९५ सालापासून ते २००५ पर्यंतच्या कालावधीतील काही अनुभव या सर्वांचा समावेश करुन हे पुस्तक प्रकाशित झाले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंतअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राहुल गडपाले यांनी केले तर सूत्रसंचलन उतरा मोने यांनी केले.

दाही दिशा' पुस्तक समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक

 दाही दिशा' पुस्तक समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक

-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित 'दाही दिशापुस्तकाचे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

 

मुंबई, दि. ४ :  दाही दिशाहे पुस्तक सामाजिकराजकीयशैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा अनेक पैलूंना स्पर्श करते. हे पुस्तक केवळ महिलांसाठीच नव्हेतर समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक आहेआणि महिलांच्या प्रश्नांवर सर्व बाजूंनी विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहेअसे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथील यशोदर्शन सभागृहात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे लिखित 'दाही दिशाया पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेउच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटीलउद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंतअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशीअभिनेत्री निवेदिता सराफसकाळ मुंबई आवृत्तीचे संपादक राहूल गडपालेसकाळ प्रकाशनचे प्रमुख आशुतोष रामगिर,  अंकित काणे (संपादक मल्टीमीडिया) आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही भूमिका घेतली आणि राज्यामध्ये रखडलेले प्रकल्प पुढे नेले. विकासप्रकल्पांना चालना दिली. लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मार्गी लावला. कितीही काटकसर असलीतरीसुद्धा जे वचन दिले आहेजे शब्द आम्ही दिलेले आहेतते पाळणार आहे. महिला सक्षमीकरण अभियान, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण', लेक लाडकीलखपती योजनामहिलांना एसटीमधून प्रवास करण्यासाठी ५० टक्के सवलत योजना, मुलींना उच्च शिक्षणासाठी १०० टक्के सवलत योजना, पिंक रिक्षा आणि सारथीमहाज्योती यांच्या माध्यमातून मुलींना शिष्यवृत्ती योजना अशा लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यातल्या अन्यायग्रस्त आणि वंचितगोरगरीब महिलांसाठी अविरतपणे काम केले आहे. 'दाही दिशाहे त्यांचे पुस्तक म्हणजे या संघर्षाची कहाणीच आहे. हे पुस्तक फक्त आत्मचरित्र नाही तर एका संवेदनशील कार्यकर्त्याची अनुभवगाथाच असल्याचे असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या पुस्तकात नीलमताईंनी त्यांच्यातल्या कार्यकर्त्याला आलेले अनुभव अशा रीतीने मांडले आहेत की ते आपल्या हृदयाला भिडतात. नीलमताईंचा प्रवास हा केवळ राजकीय नाहीतर सामाजिक जागृतीचा प्रवास आहे. महिलांसाठी फिरते मदत केंद्र सुरू करण्यापासून ते राज्यासाठी महिला धोरण ठरवण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर त्यांचे मोठे योगदान आहे. महिला अत्याचाराच्या घटना असोमुलींना मुरळी बनवण्याची प्रथा बंद करणे असोमहिला सरपंचांना अधिक बळ देणे असो अशा प्रत्येक ठिकाणी त्यांनी महिलांच्या हक्कासाठी त्यांनी ठामपणे भूमिका घेतली आहे.

नीलमताईंच्या लहानपणीच्या आठवणीही या पुस्तकात आहेत. त्यांच्यावर पंढरपूरचे त्यांचे आजोबा-आजी आणि आई-वडिलांनी दिलेले संस्कारशिक्षणाचे महत्त्व आणि सर्व जग विरोधात गेले तरी जिंकता येते ही शिकवण यात दिसते.

महाविद्यालयीन जीवनातत्यांनी युवकांच्या चळवळींमध्ये सहभाग घेतला आहेमराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात आणि मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेल्या भूमिका त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देतात असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापकाची 5 पदे मंजूर

 बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी

सहयोगी प्राध्यापकाची 5 पदे मंजूर

बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यापक गट-अ संवर्गाची पाच पदे निर्माण करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. 

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निकषांप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी सहयोगी प्राध्यपकांची पाच पदे मंजूर करण्यात आली असून यासाठी येणाऱ्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी वर्ग एक ते वर्ग चार संवर्गातील पदे तसेच विद्यार्थी पदे अशा एकूण 510 पदांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे.


राज्यातील तीन आर्थिक विकास महामंडळाच्या वैयक्तिक, गट कर्ज व्याज परतावा योजनेस मान्यता

 राज्यातील तीन आर्थिक विकास महामंडळाच्या वैयक्तिक,

गट कर्ज व्याज परतावा योजनेस मान्यता

राज्यातील परशुराम आर्थिक विकास महामंडळवीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ आणि श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळांना वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

            राज्यातील ब्राह्मणराजपूतआर्य वैश्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांकरिता अर्थसहाय्य उपलब्ध करुन उद्योगरोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने या तीन महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे.

यातील लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृतखाजगीसहकारी बँक यांच्याकडून घेतलेल्या 15 लाखापर्यंतच्या कर्जाचे व व्याजाचे हप्ते वेळेवर भरल्यास लाभार्थ्यांने बँकेकडे भरलेल्या व्याजाची रक्कम महामंडळाकडून दरमहा लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. व्याज परताव्याची कमाल रक्कम साडे चार लाख रूपये राहील. यामुळे या समाजातील तरूण उद्योगाकडे वळतील आणि त्यातून रोजगार निर्मिती होणार आहे.

हे कर्ज कृषि संलग्न पारंपरिक उपक्रमलघुमध्यम व गृह उद्योग उत्पादनव्यापार व विक्रीसेवा क्षेत्र व पर्यटन या क्षेत्रातील व्यवसायासाठी घेतले असल्यास व्याज परतावा योजना लागू होणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाच्या निर्णयात दुरुस्ती

 राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाच्या निर्णयात दुरुस्ती

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित पदावर समायोजन करताना सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती न करता एक वेळची विशेष बाब म्हणून करण्यास राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील  14 मार्च 2024 रोजी किंवा त्यापूर्वी 10 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सेवांचे समायोजन करण्याबाबतचा निर्णय यापूर्वी मंत्रिमंडळाने घेतला होता. त्या निर्णयात दुरुस्ती करून या सेवांचे समावेशन सेवा प्रवेश नियमात दुरुस्ती न करता एक वेळची विशेष बाब म्हणून करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार 10 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समकक्ष पदावर सेवा समायोजन सार्वनजिक आरोग्य विभागातील पदांबरोबरग्रामविकास विभागामार्फत भरण्यात येणारी आरोग्य सेवेतील रिक्त पदांवर करण्यात येणार आहे. यात सरळसेवेने भरावयाची सद्या रिक्त असलेली पदे व राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 14 मार्च 2024 पूर्वी 10 वर्षे पूर्ण झालेल्या कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांची संख्या यापैकी जी संख्या कमी असेल तेवढी पदे राखून ठेवण्यास मान्यता देण्यात आली.

विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या उपचारांच्या संख्येत वाढ

 विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या उपचारांच्या संख्येत वाढ

विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सध्या समाविष्ट असलेल्या उपचारांमध्ये वाढ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. यानुसार 34 विशेषज्ञ सेवांतर्गत 1356 उपचारांऐवजी आता 38 विशेषज्ञ सेवांतर्गत एकूण 2399 आजारांवर उपचार होणार आहेत. यामुळे बहुतेक आजारांवर उपचार उपलब्ध होणार असल्यानेगरजूंना मोठा दिलासा मिळणार आहे.

विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पॅकेजचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी गठित समितीने उपचारांमध्ये वाढ करण्यासह इतर शिफारसी केल्या होत्या. त्यानुसार या शिफारशींना नियामक परिषदेनेही मान्यता दिली होती. नियामक परिषदेने दिलेल्या मान्यतेनुसार विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 2399 उपचारांपैकी 223 उपचार शासकीय रुग्णालयांकरिता राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच या योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांच्या श्रेणीनुसार पॅकेज दर अदा करण्याची सध्याची पद्धत बंद करण्यात येत आहे. त्याऐवजी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे दर तसेच राज्याच्या उपचारांचे निश्चित केलेले दर बेस पॅकेज रेट म्हणून लागू करतील. त्यानुसार अंगीकृत रुग्णालयांना प्रोत्साहनपर रक्कम मिळणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत उपचार व त्यांचे दर यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार नियामक परिषदेस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विस्तारित महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजने व आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत समग्र यादीतील उपचारांची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेऊन एकूण उपचारांची संख्या निश्चित करणेउपचारांच्या संख्येतवर्णनात व दरात बदल करणेशासकीय राखीव उपचारामध्ये भर घालणे किंवा कमी करणेअपवादात्मक परिस्थितीत विशिष्ट क्षेत्रासाठी राखीव उपचार खासगी रुग्णालयांना खुले करण्याचे अधिकार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सचिवांना देण्यास मंजुरी देण्यात आली.

००००

Featured post

Lakshvedhi