संघर्ष महत्त्वाचा तशी सबुरी फार महत्त्वाची
- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, आतापर्यंत मी 29 पुस्तके गेल्या ३० वर्षांत लिहिली. महिला धोरणे जी वेगवेगळी झाली, त्याचबरोबर स्त्रियांच्या अत्याचाराच्या विरोधात प्रतिबंध करण्यासाठी काय करता येईल, याची यशस्वी झालेली उदाहरणे या पुस्तकामध्ये लिहिली आहेत.
आरक्षण मिळाले, परंतु संरक्षण मिळालं नाही. त्यावेळेला आम्हाला मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडेंनी विचारलं, तुम्ही मला एक कार्यक्रम सांगा, की कुठला कार्यक्रम केला, तर महिलांना फायदा होईल. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं, दारुविरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांवर दाखल गुन्हे काढून टाका, आणि तिसऱ्या दिवशी ३२ हजार महिलांवरचे गुन्हे मागे घेण्यात आले. अशी अनेक उदाहरणं आहेत. पण हे काम करत असताना, अनुभव येत होता, जसा संघर्ष महत्त्वाचा आहे तशी सबुरी फार महत्त्वाची आहे, असेही त्यांनी सांगितले.
'दाही दिशा' म्हणजे काय तर पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर, ईशान्य, आग्नेय, वायव्य, नैऋत्य बरोबर, ऊर्ध्व आणि अध्व या दहा दिशांनी येणारी जी संकटं आहेत, त्याचा मुकाबला करण्यासाठी, आम्हाला दाही दिशांनी शक्ती दे परमेश्वरा असा त्याचा अर्थ आहे. दैनिक सकाळमधील एका सदरामधून दर शनिवारी लेख छापून येत होते. त्याच्यातील निवडक लेख आणि साधारण ९५ सालापासून ते २००५ पर्यंतच्या कालावधीतील काही अनुभव या सर्वांचा समावेश करुन हे पुस्तक प्रकाशित झाले आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राहुल गडपाले यांनी केले तर सूत्रसंचलन उतरा मोने यांनी केले.
No comments:
Post a Comment