Tuesday, 4 November 2025

सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्प राबवण्यासाठी अनुकूल भौगोलिक परिस्थिती

 राज्यात विशेषतः सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्प राबवण्यासाठी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असल्याने महाराष्ट्राला मोठा फायदा मिळणार आहे. या सौरऊर्जा आणि उदंचन जलविद्युत प्रकल्पांमुळे महाराष्ट्र हा देशातील अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात अग्रणी ठरणार असूनपर्यावरणस्नेही आणि शाश्वत ऊर्जानिर्मितीकडे राज्याची वाटचाल होईलअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र आता सौरऊर्जेच्या क्षेत्रात नवा इतिहास

 महाराष्ट्र आता सौरऊर्जेच्या क्षेत्रात नवा इतिहास रचत आहे. राज्य सरकारने आशियातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प हाती घेतला असूनत्याद्वारे शेती क्षेत्रातील संपूर्ण ऊर्जेची गरज सौरऊर्जेकडे वळविण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे. या प्रकल्पातून तब्बल 16 गिगावॅट इतकी सौरऊर्जा वितरित क्षमता निर्माण होणार आहे. या प्रकल्पामुळे शेतीसाठी लागणारा वीजपुरवठा सौरऊर्जेवर आधारित होणार असूनत्यामुळे पारंपरिक ऊर्जा स्रोतांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होईलअसेही मुख्यमंत्री  फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

उदंचन जलविद्युत प्रकल्प राबवण्यासाठी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असल्याने महाराष्ट्राला

 देवेंद्र फडणवीस म्हणाले कीराज्यात विशेषतः सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उदंचन जलविद्युत प्रकल्प राबवण्यासाठी अनुकूल भौगोलिक परिस्थिती असल्याने महाराष्ट्राला मोठा फायदा मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने ऊर्जा ग्रीड स्थिर ठेवण्यासाठी उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप्ड स्टोरेज प्रोजेक्ट्सधोरणालाही वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीड स्थिरतेसाठी सुमारे १ लाख मेगावॅट क्षमतेची उदंचन जलविद्युत प्रकल्पां

उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे परवाने जलदगतीने मिळण्यासाठीफास्ट ट्रॅक यंत्रणा

 उदंचन जलविद्युत प्रकल्पांचे परवाने जलदगतीने मिळण्यासाठी

फास्ट ट्रॅक यंत्रणा

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आठ हजार कोटींचा सामंजस्य करार

मुंबईदि. 3 : पंचमौली-देवळीपाडा उदंचन जलविद्युत (धुळे/नंदुरबार) प्रकल्पासाठी हरियाणा येथील जीएससी पीएसपी महा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. राज्य शासनाने उदचंन जलविद्युत प्रकल्पातील गुंतवणूकदारांना जलवापर आणि पर्यावरणीय मंजुरीसह इतर सर्व परवाने जलदगतीने मिळावेतयासाठी फास्ट-ट्रॅक’ यंत्रणा उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरेजीएससी पीएसपी महा प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुमित नंदासंचालक शुभ नंदामुख्य विपणन अधिकारी अनुप भटनागरउपाध्यक्ष विमल सक्सेनाविधि सल्लागार विकास कुमार पाठक आदी उपस्थित होते. यावेळी दीपक कपूर आणि कंपनीचे अध्यक्ष सुमित नंदा यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५चा नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ

 राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५चा नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ


 

मुंबई,दि.३ : भारतातील सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्र अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला आज औपचारिक सुरुवात झाली. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मंत्रालय मुंबई येथे या जनगणनेचा शुभारंभ करण्यात आला. देशातील ही पाचवी सागरी मत्स्य जनगणना असून ती ३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडणार आहे. केंद्रीय सागरी मात्स्यिकी संशोधन संस्था (सीएमएफआरआय)आणि मत्स्यव्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविली जात आहे.


केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात दंत विषयक आरोग्य सुविधा उपलब्ध

 उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले कीहा सामंजस्य करार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील नवा अध्याय आहे. या केंद्राच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात दंत विषयक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. आरोग्य म्हणजे केवळ कोणत्याही आजारावर उपचार नसून प्रतिबंधजनजागृतीशिक्षण आणि सेवा या चार घटकांचा योग्य समन्वय आहे. या केंद्राच्या स्थापनेतून हे ध्येय साध्य होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इंडियन डेंटल असोसिएशन (आयडीए) ही संस्था देशभरातल्या दंतवैद्यांच्या सशक्त नेटवर्कमुळे अगदी गावखेड्यात दातांच्या आरोग्याविषयी जागृती करत आहे,असे सांगत उपमुख्यमंत्री पवार यांनी डेंटल असोसिएशनच्या कार्याचे कौतुक केले.

आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य

 आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य

-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

औंध येथे बहुउद्देशीय दंत रुग्णालयसंशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार

 

मुंबई दि.३ : कोरोनाच्या काळात आपल्याला आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभागतेथील पायाभूत सुविधांचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रभादेवी येथील इंडियन डेंटल असोसिएशनच्या सभागृहात इंडियन डेंटल असोसिएशनपुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा शासकीय रुग्णालयऔंध यांच्यात औंध येथे बहुउद्देशीय दंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलइंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शुभ्रा नंदीडेंटल असोसिएशनचे सचिव डॉ.अशोक ढोबळेउपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ. संतोष भोसले उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi