Tuesday, 4 November 2025

आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य

 आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य

-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

औंध येथे बहुउद्देशीय दंत रुग्णालयसंशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार

 

मुंबई दि.३ : कोरोनाच्या काळात आपल्याला आरोग्य विभाग वैद्यकीय शिक्षण विभागतेथील पायाभूत सुविधांचे महत्त्व लक्षात आले. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय तसेच त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रभादेवी येथील इंडियन डेंटल असोसिएशनच्या सभागृहात इंडियन डेंटल असोसिएशनपुणे जिल्हा परिषद आणि जिल्हा शासकीय रुग्णालयऔंध यांच्यात औंध येथे बहुउद्देशीय दंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापनेबाबत सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलइंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शुभ्रा नंदीडेंटल असोसिएशनचे सचिव डॉ.अशोक ढोबळेउपमुख्यमंत्र्यांचे सहसचिव डॉ. संतोष भोसले उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi