Saturday, 11 October 2025

दोनों देशों के द्विपक्षीय रिश्ते और अधिक मजबूत हो रहे हैं। उन्होंने कहा कि भारत कृत्रिम

 स्पेन के राजदूत जुआन एंटोनियो ने कहा कि भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और स्पेन के प्रधानमंत्री पेद्रो सांचेज़ के बीच बहुत अच्छे संबंध हैंजिससे दोनों देशों के द्विपक्षीय रिश्ते और अधिक मजबूत हो रहे हैं। उन्होंने कहा कि भारत कृत्रिम बुद्धिमत्ता और आधुनिक तकनीक की सहायता से आम नागरिकों के जीवन में सकारात्मक परिवर्तन ला रहा हैऔर पूरी दुनिया इस प्रगति को स्वीकार कर रही है। उन्होंने आगे कहा कि मुंबई केवल भारत का ही नहींबल्कि दक्षिण एशिया का भी पावर हाउस बन रहा हैऔर इसलिए स्पेन को महाराष्ट्र जैसे अग्रणी राज्य के साथ काम करने में अत्यंत प्रसन्नता होगी।

 

नागपुर में प्रस्तावित यह कन्वेंशन सेंटर केवल प्रदर्शनियों और आयोजनों के लिए

 मुख्यमंत्री फडणवीस ने कहा कि नागपुर में प्रस्तावित यह कन्वेंशन सेंटर केवल प्रदर्शनियों और आयोजनों के लिए ही नहींबल्कि सांस्कृतिक कार्यक्रमों के आयोजन के लिए भी एक उपयुक्त मंच बनना चाहिए। उन्होंने कहा कि कन्वेंशन सेंटर की आंतरिक संरचना इस प्रकार की हो कि, यहाँ आने वाले प्रत्येक व्यक्ति को नागपुर का गौरवशाली इतिहास जानने और अनुभव करने का अवसर मिले। मुख्यमंत्री फडणवीस ने यह भी कहा कि यह केंद्र आकर्षकआधुनिक तकनीक से युक्त तथा पर्यावरण के अनुकूल वास्तुकला का एक उत्कृष्ट उदाहरण होना चाहिए।

नागपुर में बनेगा विश्वस्तरीय ‘कन्वेंशन सेंटर’

 नागपुर में बनेगा विश्वस्तरीय कन्वेंशन सेंटर

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • स्पेन की फिरा बार्सिलोना इंटरनेशनल कंपनी के साथ हुआ समझौता

 

मुंबईदिनांक १० : नागपुर में सभी आधुनिक सुविधाओं से युक्त विश्वस्तरीय कन्वेंशन सेंटर’ स्थापित किया जाएगा। इस संदर्भ में आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में स्पेन की फेरा बार्सिलोना इंटरनेशनल कंपनी के साथ मुख्यमंत्री फडणवीस के वर्षा निवासस्थान’ में एक महत्वपूर्ण समझौता किया गया।

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने निर्देश दिया कि नागपुर में प्रस्तावित इस कन्वेंशन सेंटर के लिए चुनी जाने वाली भूमि सभी परिवहन सेवाओं से अच्छी तरह जुड़ी होनी चाहिएताकि आगंतुकों और आयोजकों के लिए सुविधा रहे।

 

इस अवसर पर भारत में स्पेन के राजदूत जुआन एंटोनियो, फिरा बार्सिलोना इंटरनेशनल कंपनी के मुख्य कार्यकारी अधिकारी रिकार्ड ज़ेपाटेरोपरिवहन विभाग के अपर मुख्य सचिव संजय सेठीपायोनियर एग्ज़िबिशन एंड कन्वेंशन प्राइवेट लिमिटेड के अध्यक्ष मुकेश अरोराउपाध्यक्ष जीत अरोरातथा नागपुर के जिलाधिकारी विपिन इटनकर उपस्थित थे।

 

मच्छिमारांना दर आठवड्याला हवामानाची सूचना देण्याचे निर्देश

 मच्छिमारांना दर आठवड्याला हवामानाची सूचना देण्याचे निर्देश

मुंबई, दि. 10 : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्रामार्फत दर गुरुवार किंवा शुक्रवारी महाराष्ट्रासाठी सात दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला जातो. या अंदाजात कोकण किनारपट्टीवरील वादळी वाऱ्याची शक्यता आणि समुद्रातील परिस्थितीची माहिती दिली जाते.

जिल्हा प्रशासनाने ही माहिती https://mausam.imd.gov.in/mumbai/ या संकेतस्थळावरून नियमितपणे मिळवून मच्छिमार, मच्छिमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना कळवावी, तसेच स्थानिक वृत्तपत्रांद्वारे प्रसिद्धी द्यावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहेत. सागरी सुरक्षितता व जीवितहानी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

गोरेगाव मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस मान्यता

 गोरेगाव मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस मान्यता

पालकमंत्री ॲड. अशिष शेलार यांच्या पाठपुराव्याला यश

           

मुंबईदि. १० : गोरेगाव येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात आधुनिक मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमास  ५८.२२ कोटींच्या प्रारंभिक अंदाजपत्रकास कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत प्रशासकीय मान्यता आजच देण्यात आली आहे. उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या पशु वैद्यकीय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस प्रशासकीय मान्यता दिली. उपनगरातील पाळीव आणि मुक्त पशुंसाठी उत्कृष्ट उपचार व सेवांची सुविधा उभारली जाईलअसे मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.अशिष शेलार यांनी सांगितले.

 

नव्या इमारतीत तळमजला व तीन मजले असा आराखडा असून १०,२१० चौ. मीटरच्या या रुग्णालयात लहान-मोठ्या प्राण्यांसाठी अत्याधुनिक व बहुविध सेवांचा समावेश आहे. उपनगरातील व मुंबईतील विविध भागातील प्राण्यांच्या उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना ही सुविधा मोलाची ठरणार आहे. या प्रकल्पात वास्तुविशारदांची मान्यतासौरऊर्जा प्रणालीची उभारणी व पर्यावरणपूरक बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

 

या निर्णयामुळे पशुप्रेमीशेतकरीरहिवासी व मुंबई महानगरातील अनेकांची जुनी मागणी पूर्ण होत आहे. नव्या मल्टीस्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयामुळे प्राण्यांच्या आरोग्यसेवेचा दर्जा आणि उपलब्धता वाढणार असूनपालकमंत्री ॲड. शेलार यांनी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला आहे.

मेरा साया साथ होगा' कार्यक्रमाचे सावरकर स्मारक येथे आयोजन

 'मेरा साया साथ होगा' कार्यक्रमाचे सावरकर स्मारक येथे आयोजन

· तादिदींच्या अजरामर गाण्यांची मैफल अनुभवता येणार

मुंबई, दि. १० : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर गाण्यांचा स्वरसोहळा "मेरा साया साथ होगा" या संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे शनिवार ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वा. स्वा. सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या सांस्कृतिक कार्यक्रमात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर गीतांद्वारे त्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शैलजा सुब्रमण्यम, आनंदी जोशी, निहिरा जोशी, जय आजगांवकर या कलाकारांचा सहभाग आहे. कार्यक्रमाचे निवेदन अंबरीश मिश्र हेतर करणार असून संगीत संयोजन प्रणव हरिदास यांचे आहे. या कार्यक्रमात १६ वादकांचा सहभाग आहे.

"मेरा साया साथ होगा" कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून प्रवेशिका स्वा. सावरकर नाट्यगृह, शिवाजी पार्क, दादर येथे उपलब्ध आहेत.

या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमचीक्रीडा संकुल, स्पोर्ट्स क्लब, जिमखाना, स्टेडियम व क्रीडांगणांवर सुविधा

 महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा

-         क्रीडा युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

क्रीडा संकुलस्पोर्ट्स क्लबजिमखानास्टेडियम व क्रीडांगणांवर सुविधा

 

मुंबईदि. १० : राज्यातील महिला खेळाडूंसाठी शासनाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व क्रीडा संकुलस्पोर्ट्स क्लबजिमखानास्टेडियम तसेच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्रस्वच्छ आणि सुरक्षा-सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा महिला खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी काही दिवसांपूर्वी दादर जिमखानाच्या नूतनीकरण उदघाटनप्रसंगी महिलांना क्रीडांगणावर सुरक्षित व आदरयुक्त वातावरण मिळालेच पाहिजेत्यासाठी देशभरातील क्रीडा संकुलात महिलांना चेंजिंग रुमची सुविधा उपलब्ध करून देण्याबद्दल आवाहन केले होते.

या आवाहनाला तत्काळ व सकारात्मक प्रतिसाद देणारे क्रीडा व युवक कल्याण मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे हे देशातील पहिले मंत्री ठरले आहेत.

क्रीडा मंत्री ॲड.कोकाटे यांनी सांगितले कीराज्यभरातील महिला खेळाडूंना सुरक्षित आणि सन्मानजनक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना तातडीने राबवली जाणार आहे. प्रत्येक जिल्हातालुका आणि स्थानिक क्रीडांगणावर या सुविधा प्राधान्याने उभारल्या जातील.

चेंजिंग रूममध्ये स्वच्छतागृहआरोग्य सुविधा आणि आवश्यक सुरक्षिततेसाठी मर्यादित क्षेत्रात सीसीटीव्ही देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी महिला सुरक्षा कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जुनी इमारती दुरुस्त करणे अथवा नवीन चेंजिंग रूम बांधण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री श्री. कोकाटे यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे केवळ सुविधा उपलब्ध होणार नाहीततर महिलांचा सहभाग आणि विश्वास क्रीडा क्षेत्रात वाढीस लागेल.

क्रीडा मंत्री ॲड.कोकाटे म्हणाले कीक्रीडा क्षेत्रातील प्रत्येक मुलगी आता अभिमानाने मैदानात उतरेल. तिच्या प्रत्येक यशामागे सुरक्षित आणि सन्मानित वातावरणाचा मजबूत पाया असेल. या निर्णयामुळे राज्यातील महिला खेळाडूंसाठी एक नवा अध्याय सुरू होणार असूनमहाराष्ट्र महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक पुढचा टप्पा पार करत आहे.

000

Featured post

Lakshvedhi