Saturday, 11 October 2025

वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु करावी

 वर्धागोंदियाभंडारा जिल्ह्यातील रिक्त पदांच्या

भरती प्रक्रियेची कार्यवाही सुरु करावी

शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

 

मुंबईदि.  : शालेय शिक्षण विभागाने वर्धागोंदियाभंडारा जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या गट - अआणि गट – क दर्जाच्या रिक्त पदांवर पात्र उमेदवारांच्या भरती प्रक्रियेची  कार्यवाही सुरु करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. 

वर्धागोंदियाभंडारा जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या गट - अआणि गट – क दर्जाच्या रिक्त पदांसंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. माधुरी सावरकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वर्धागोंदियाभंडारा जिल्ह्यासाठी मंजूर असलेल्या गट - अआणि गट – क दर्जाच्या रिक्त पदांचा सविस्तर आढावा घेतला.  या जिल्ह्यातील सर्व रिक्त पदांची  भरती प्रक्रिया शालेय शिक्षण विभागाने तातडीने राबवण्याचे निर्देश भोयर यांनी  दिले.

हातपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक

 हातपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांच्या समस्या

सोडविण्यासाठी शासन सकारात्मक

 पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

 

मुंबईदि. ८ : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हातपंप कर्मचारी काम करत असतात. त्यांच्या सर्व प्रश्नांवर सकारात्मक विचार करण्यात येईल असे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

 हातपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री पाटील बोलत होते.  या बैठकीस आमदार सुधीर मुनगंटीवारपाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारेसहसचिव गीता कुलकर्णी उपस्थित होत्या. तर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि हातपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

बैठकीत चंद्रपूर जिल्हा तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये कार्यरत हातपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. हातपंप देखभाल दुरुस्ती कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या सर्व मागण्यांसंदर्भात सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यात येईलअसे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी देखील या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले. उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनपेन्शनसेवा अटी आदींबाबतच्या अडचणी मांडल्या. त्या सर्व बाबींसंदर्भात सखोल विचार करून कार्यवाही करण्यात येईलअसे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांसाठी जागा घ्याव्यात

 इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांच्या

वसतीगृहांसाठी जागा घ्याव्यात

- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

 

मुंबईदि. ०८ : राज्यात इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली वसतिगृह काही ठिकाणी भाडे तत्त्वावरील जागेत आहेत. वसतिगृहांसाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तसेच पुढील पंधरा दिवसांच्या आत प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र शासनाच्या बाबू जगजीवनराम छात्र आवास योजना’ अंतर्गत वसतिगृह बांधकामासाठी शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासंबंधी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेइतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सचिव ए.बी. धुळाजदूरदृश्य प्रणाली द्वारे सर्व जिल्हाधिकारीतसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

   महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेज्या जिल्ह्यांमध्ये वसतिगृह उभारणीसाठी मालकीची जागा अद्याप निश्चित करण्यात आलेली नाहीत्या जिल्ह्यांनी तातडीने योग्य जागा निश्चित करून प्रस्ताव सादर करावेत. जिल्ह्याधिकाऱ्यांनी जमीन हस्तांतरण प्रक्रियेसाठी मोजणी शुल्क माफ करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या लाभार्थ्यांना ओळखपत्रेप्रमाणपत्रे आणि विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश त्यांनी यावेळी दिले. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे असे निर्देशही दिले.

    बैठकीत वसतिगृहाच्या जागेबाबत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. दहा जिल्ह्यांमध्ये दुग्धविकास विभागाच्या मालकीच्या जागा वसतिगृहासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्या जागा हस्तांतरित करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही त्वरीत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले.

जागतिक दर्जाचे 'कन्व्हेन्शन सेंटर' नागपुरात उभारण्यात येणार

 जागतिक दर्जाचे 'कन्व्हेन्शन सेंटरनागपुरात उभारण्यात येणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसोबत सामंजस्य करार

 

मुंबईदि. १० : नागपुरात सर्व सोयी सुविधायुक्त जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटरउभारण्यात येणार आहे. याबाबत स्पेन येथील फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीसमवेत वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. नागपूरला उभारण्यात येणारे 'कन्व्हेन्शन सेंटरसाठी निवडण्यात येणारी जागा सर्व परिवहन सेवांनी उत्तमरित्या जोडलेली असावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेनागपुरात प्रस्तावित असलेले कन्व्हेन्शन सेंटर केवळ प्रदर्शनेकार्यक्रम आदींसाठी उपयोगात येणारे नसावेतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी हक्काचे व्यासपीठ असावे. नागपूरचा इतिहास 'कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून येथे आलेल्या प्रत्येकाला कळावा, अशा पद्धतीने कन्व्हेन्शन सेंटरची अंतर्गत रचना असावी. हे सेंटर अत्यंत आकर्षकआधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त आणि पर्यावरण पूरक वास्तूचे मूर्तिमंत उदाहरण ठरावे.

स्पेनचे राजदूत म्हणालेभारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेड्रो सांचेझ यांच्यात चांगले संबंध आहेत. यामुळे दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होत आहे. भारत कृत्रिम बुद्धिमत्ताआधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सामान्य नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत असून याची दखल जगाने घेतली आहे. मुंबई हे भारताचेच नव्हेतर दक्षिण आशियाचे 'पावर हाऊसबनत आहे. त्यामुळे मुंबई राजधानी असलेल्या महाराष्ट्रसोबत नक्कीच स्पेनला काम करायला आवडेलअशा शब्दात त्यांनी महाराष्ट्राचा गौरव के

संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी बार्टी व ‘टीआरटीआय’ने निधीची तरतूद करावी

 संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी

बार्टी व ‘टीआरटीआय’ने निधीची तरतूद करावी

-          राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम

 

मुंबईदि. १० : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित संविधान जनजागृती प्रश्नमंजुषा २०२५’ आयोजित करण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय) यांनी करावीअसे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी दिले.

 

उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली संविधान प्रश्नमंजुषा जनजागृती मोहिमेबाबत आयोगाच्या कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

 

‘टीआरटीआय’ आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे व बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी या उपक्रमासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन स्पर्धेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईलअसे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सांगितले. उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम म्हणालेआयोगाच्या पुढाकाराने इयत्ता ८ वी ते १२ वी तसेच पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी वेबसाईटही तयार करण्यात आली आहे. या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाविषयी तसेच त्यातील मूलभूत हक्ककर्तव्ये आणि मूल्यांविषयी जनजागृती निर्माण करणे हा आहे. 

 

विद्यार्थ्यांसाठी संविधानावर आधारित तीन भाषातील अभ्यासक्रम तयार करून जिल्हा व राज्यस्तरीय प्रश्नपत्रिका समन्वयातून तयार करण्याचेही निर्देश मेश्राम यांनी यावेळी दिले. शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार संविधान प्रश्नमंजुषेबाबत जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. उपक्रमाची प्रगतीविद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि अंमलबजावणीबाबतची सविस्तर माहिती सर्व संबंधित विभागांनी राज्य अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोगास सादर करावीअसे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्याचे शासनाचे निर्देश

 डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी

'वाचन प्रेरणा दिनसाजरा करण्याचे शासनाचे निर्देश

 

मुंबईदि. १० :- वाचन संस्कृती वाढीस लागावी तसेच मराठी भाषेचा प्रचारप्रसारविकासजतन आणि संवर्धन व्हावेया उद्देशाने माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. घे या एकच वसामराठीला बनवूया ज्ञानभाषा ही यावर्षीच्या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

 

राज्य शासनाचे सर्व मंत्रालयीन विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयेशासकीय संस्था/मंडळसार्वजनिक उपक्रमसर्व आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालये हे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणार आहेत. यामध्ये ऑनलाईन तसेच प्रत्यक्षरित्या कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.

 

वाचन प्रेरणा दिनानिमित्त केवळ ललित साहित्यापुरते कार्यक्रम मर्यादित न ठेवताविज्ञानतंत्रज्ञानव्यवस्थापनपर्यावरणआरोग्यसंगणकअवकाश विज्ञान विषयांचा समावेश कार्यक्रमात करण्यात येणार असून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यात येतील. यात अनुवाद लेखनव्यावसायिक लेखनई-बुकस्व-प्रकाशनऑनलाईन पुस्तक विक्रीसंहिता लेखनशॉर्ट फिल्म/डॉक्युमेंटरी लेखन यासारख्या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबरव्याख्यानेचर्चासत्रेअभिवाचनसामूहिक वाचनग्रंथ प्रदर्शनआणि 'मराठी वाचन कट्टाची निर्मितीमराठी आभासी /प्रत्यक्ष साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावाया उद्देशाने न्यायव्यवहारशासन प्रशासनप्रसार माध्यमे इत्यादी ठिकाणी होणाऱ्या मराठी भाषेच्या वापराबाबत जागरूकता वाढविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदमराठवाडा साहित्य परिषदविदर्भ साहित्य संघकोकण मराठी साहित्य परिषददक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि मुंबई मराठी साहित्य संघ यासारख्या साहित्य संस्थांची मदत घेतली जाणार आहे. ग्रंथालयेमहाविद्यालयेतंत्रमहाविद्यालयेपदविका संस्था या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील संबंधित संस्था देखील वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करणार आहेत. त्याचबरोबर महापालिका/नगरपालिका यांच्या अखत्यारितील संस्था देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेतअसे मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

0000

मच्छिमारांना दर आठवड्याला हवामानाची सूचना देण्याचे निर्देशhttps://mausam.imd.gov.in/mumbai/

 मच्छिमारांना दर आठवड्याला हवामानाची सूचना देण्याचे निर्देश

 

मुंबईदि. 10 : भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्रामार्फत दर गुरुवार किंवा शुक्रवारी महाराष्ट्रासाठी सात दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला जातो. या अंदाजात कोकण किनारपट्टीवरील वादळी वाऱ्याची शक्यता आणि समुद्रातील परिस्थितीची माहिती दिली जाते.

 

जिल्हा प्रशासनाने ही माहिती https://mausam.imd.gov.in/mumbai/ या संकेतस्थळावरून नियमितपणे मिळवून मच्छिमारमच्छिमार सहकारी संस्था आणि नौका मालकांना कळवावीतसेच स्थानिक वृत्तपत्रांद्वारे प्रसिद्धी द्यावीअसे निर्देश मत्स्यव्यवसाय विभागाने दिले आहेत. सागरी सुरक्षितता व जीवितहानी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे.

Featured post

Lakshvedhi