Saturday, 11 October 2025

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्याचे शासनाचे निर्देश

 डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी

'वाचन प्रेरणा दिनसाजरा करण्याचे शासनाचे निर्देश

 

मुंबईदि. १० :- वाचन संस्कृती वाढीस लागावी तसेच मराठी भाषेचा प्रचारप्रसारविकासजतन आणि संवर्धन व्हावेया उद्देशाने माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. घे या एकच वसामराठीला बनवूया ज्ञानभाषा ही यावर्षीच्या उपक्रमाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

 

राज्य शासनाचे सर्व मंत्रालयीन विभाग तसेच त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयेशासकीय संस्था/मंडळसार्वजनिक उपक्रमसर्व आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालये हे वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणार आहेत. यामध्ये ऑनलाईन तसेच प्रत्यक्षरित्या कार्यक्रम आयोजित करण्यात येतील.

 

वाचन प्रेरणा दिनानिमित्त केवळ ललित साहित्यापुरते कार्यक्रम मर्यादित न ठेवताविज्ञानतंत्रज्ञानव्यवस्थापनपर्यावरणआरोग्यसंगणकअवकाश विज्ञान विषयांचा समावेश कार्यक्रमात करण्यात येणार असून जास्तीत जास्त तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यात येतील. यात अनुवाद लेखनव्यावसायिक लेखनई-बुकस्व-प्रकाशनऑनलाईन पुस्तक विक्रीसंहिता लेखनशॉर्ट फिल्म/डॉक्युमेंटरी लेखन यासारख्या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. त्याचबरोबरव्याख्यानेचर्चासत्रेअभिवाचनसामूहिक वाचनग्रंथ प्रदर्शनआणि 'मराठी वाचन कट्टाची निर्मितीमराठी आभासी /प्रत्यक्ष साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे. मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावाया उद्देशाने न्यायव्यवहारशासन प्रशासनप्रसार माध्यमे इत्यादी ठिकाणी होणाऱ्या मराठी भाषेच्या वापराबाबत जागरूकता वाढविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदमराठवाडा साहित्य परिषदविदर्भ साहित्य संघकोकण मराठी साहित्य परिषददक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा आणि मुंबई मराठी साहित्य संघ यासारख्या साहित्य संस्थांची मदत घेतली जाणार आहे. ग्रंथालयेमहाविद्यालयेतंत्रमहाविद्यालयेपदविका संस्था या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील संबंधित संस्था देखील वाचन संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करणार आहेत. त्याचबरोबर महापालिका/नगरपालिका यांच्या अखत्यारितील संस्था देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार आहेतअसे मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi