Thursday, 9 October 2025

सिकलसेल’ निर्मूलनाचे नंदुरबार मॉडेल विकसित करावे

 सिकलसेल’ निर्मूलनाचे नंदुरबार मॉडेल विकसित करावे

- आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबईदि. ८ : नंदुरबार जिल्ह्यातील सिकलसेल, थॅलेसेमियाॲनेमिया व लहान बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी जिल्हाभर प्रभावीपणे तपासणी व उपचार मोहीम राबवून राज्यात सिकलसेल निर्मूलनाचे नंदुरबार मॉडेल विकसित करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्यसेवा आयुक्तालय येथे आयोजित बैठकीत दिले.

राज्यातील नंदुरबारगडचिरोलीचंद्रपूरपालघर व नाशिकसारख्या आदिवासीबहुल व दुर्गम भागांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्याचा निर्धार करण्यात आला असूननंदुरबार जिल्ह्यापासून या अभियानाची सुरवात झाली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्यसेवा आणि आजारांची वास्तव स्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्यमंत्र्यांनी नुकतीच नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली होती.

  त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी व उपाययोजना याचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (SHSRC) संस्थेच्या संयुक्त समितीद्वारे पाहणी करण्यात आली. या अभ्यास समितीने पाहणी अहवाल बैठकीत आरोग्यमंत्र्यांना सादर केला. सादरीकरणात आरोग्य विषयक अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविण्यात आली.

यावेळी आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संकल्पित ‘ॲनेमियामुक्त भारत अभियान’ सर्वत्र प्रभावीपणे राबवावे. जिल्ह्यात आवश्यकतेनुसार PPP तत्वावर आरोग्य केंद्रात सेवा उपलब्ध करून द्याव्यात. बाह्य स्रोताद्वारे दिल्या जाणाऱ्या सर्व सेवांचे काटेकोरपणे निरीक्षण करावे. आरोग्य संस्थांमधील शासकीय प्रयोगशाळा सक्षम कराव्यात.

आदिवासीबहुल भागात स्थानिक भाषेत आरोग्य योजनांच्या प्रचार व प्रसाराचे साहित्य तयार करण्यात यावे. कालबद्ध नियोजन करून तपासणी मोहिमेची गती वाढवा. आवश्यकतेनुसार जिल्ह्याच्या आकृतीबंधात सुधारणा करून पदनिर्मिती करावी. कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण पुनर्वसन केंद्र वाढवणे गरोदर महिलांसाठी नियमित आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

0000

स्वदेशीचा आग्रह आणि आर्थिक स्वावलंबनाचा संदेश

 स्वदेशीचा आग्रह आणि आर्थिक स्वावलंबनाचा संदेश

वस्तू व सेवा करामधील बदलानंतर झालेल्या नवरात्रीतील विक्रमी खरेदीचा उल्लेख करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले कीदेशात टीव्हीबाईकरेफ्रिजरेटरची विक्रमी विक्री होत आहे. देशातील बाजारपेठ बळकट होत आहे. आपण सर्वांनी स्वदेशीचा स्वीकार करणे गरजेचे आहे. देशाच्या पैशाचा उपयोग देशातील कामगारांनाउद्योगांना आणि तरुणांना लाभदायक ठरेल. त्यामुळे देशवासियांनी स्वदेशीचा अंगीकार करून भारताच्या विकास प्रवासात सहभागी होण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले.

देशाच्या विकासाला गती देण्यास महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्राने विकासात आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावशहर आणि तरुण अधिक सक्षम बनवण्याचे उद्दिष्ट आहेअसेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

संपूर्ण देश विकसित भारताच्या संकल्पनेला जोडला जात आहे. लोकहित सर्वोपरी हे लक्षात ठेवून सर्व शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात विकासाचा वेग वाढत असून देशाची प्रगती लक्षात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नवी मुंबई विमानतळाची प्रतिकृती देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले. शिवकर बापूजी तळपदे यांनी उडविलेल्या देशातील पहिल्या विमानाची प्रतिकृती देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रधानमंत्री यांचे स्वागत केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रतिकृती असलेले मानचिन्ह देऊन गौतम अदानी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.

मुंबई वन अ‍ॅप’मुळे सुलभ वाहतूक अनुभव

 मुंबई वन अ‍ॅपमुळे सुलभ वाहतूक अनुभव

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहेचत्याचबरोबर सर्वाधिक व्हायब्रंट शहरापैकी हे एक शहर आहे. मुंबईतील वाहतुकीला गती देण्याचे काम होत आहे. देश एक राष्ट्रएक मोबिलिटी कडे जात असून त्या दृष्टीकोनातून मुंबई वन अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे. प्रवाशांना एकाच तिकीटाद्वारे लोकलमेट्रोबसचा वापर करता येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना तिकिटासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. मुंबईकरांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

तरुणांसाठी रोजगार, नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

 तरुणांसाठी रोजगारनवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

पीएम सेतू योजनेद्वारे देशभरातील आयटीआय संस्थांना उद्योग क्षेत्राशी जोडले जात आहे. ७ हजार कोटी रुपयांच्या या योजनेंतर्गत ड्रोनरोबोटिक्सग्रीन हायड्रोजनइलेक्ट्रिक वाहनांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. महाराष्ट्र सरकारने देखील राज्यातील शेकडो आयटीआय व तांत्रिक शाळांमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. यामुळे लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेतअसेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्र आणि देशाची अभिमानास्पद ओळख

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्र आणि देशाची अभिमानास्पद ओळख

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणालेनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देश आणि राज्यासाठी महत्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नवी मुंबईच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे डिझाईन कमळाच्या आकारात असून ते भारतीय संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या विमानतळामुळे महाराष्ट्रातील शेतकरीलघुउद्योग व निर्यातदार थेट युरोपमध्यपूर्व यांच्यासह जागतिक बाजारपेठेशी जोडले जातील. त्याचा थेट फायदा स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला होणार आहे. राज्यातील फळेभाजीपाला व मासे निर्यातीला युरोप व इतर देशात नवीन बाजारपेठ मिळेल. यामुळे नवीन गुंतवणूक आणि उद्योग वाढेल.

२०१४ मध्ये देशात केवळ ७४ विमानतळ होते. आज ही संख्या १६० च्या पुढे गेली आहे. उडान योजनेंतर्गत लाखो सामान्य नागरिकांनी प्रथमच विमान प्रवासाचा अनुभव घेतला आहे. भारत आता जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक करणारा देश बनला आहे. विमान उत्पादक कंपन्यांकडे सध्या एक हजारहून अधिक नव्या विमानांच्या निर्मितीची मागणी आहे. त्यामुळे पायलट्सइंजिनीअर्सकेबिन क्रू आणि देखभालदुरुस्ती व तपासणी (एमआरओ) सुविधांमुळे हजारो रोजगार संधी उपलब्ध होणार असून भारत हा एमआरओ’ हब होणार आहे. त्याचबरोबर ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदरामुळे रोजगार वाढणार असल्याचेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मुंबई मेट्रो आधुनिक भारताच्या गतिशीलतेचे प्रतीक

 मुंबई मेट्रो आधुनिक भारताच्या गतिशीलतेचे प्रतीक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले कीमुंबई शहराला आज एक ऐतिहासिक भेट मिळाली आहे. देशातील सर्वात गजबजलेल्या शहरांपैकी एक असलेल्या मुंबईला पूर्णतः भूमिगत मेट्रो सेवा मिळाली आहे. या मेट्रो प्रकल्पामुळेशहरातील लाखो प्रवाशांचा प्रवास आता अधिक सोयीस्करजलद आणि सुरक्षित होणार आहे. मुंबईच्या हृदयात भूमिगत मेट्रो सेवा सुरू करणे हे एक अभूतपूर्व यश मानले जात आहे. ही मेट्रो सेवा केवळ मुंबईच्या विकासाचे प्रतीक नाहीतर ती आधुनिक भारताच्या गतिशीलतेचे देखील प्रतीक आहे. मुंबईतील प्रवास आता दोन-अडीच तासांऐवजी ३०-४० मिनिटांत पूर्ण होईल.

मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे भारताचा वेग आणि विकास अधोरेखित

 मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे

भारताचा वेग आणि विकास अधोरेखित

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूकतरुणांसाठी रोजगार संधी,

आणि विकसित भारताच्या दिशेने मजबूत पाऊल

 

नवी मुंबईदि. ८ : आजचा दिवस केवळ प्रकल्पांच्या उद्घाटनाचा नव्हेतर भारताच्या झपाट्याने होत असलेल्या परिवर्तनाचे आणि प्रगतीच्या दिशेने घेतलेल्या ठोस पावलांचे प्रतीक आहे. मुंबईतील विविध प्रकल्पांमुळे देशाचा वेग आणि विकास अधोरेखित झाला आहे. पायाभूत सुविधांतील गुंतवणूकतरुणांसाठी रोजगार संधी हे विकसित भारताच्या दिशेने टाकलेले मजबूत पाऊल असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनमुंबई मेट्रो लाईन-३ च्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे राष्ट्राला अर्पण, ‘मुंबई वनया देशातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅपचा शुभारंभ तसेच राज्यातील ४१९ आयटीआय आणि १४१ तांत्रिक संस्थांमध्ये २ हजार ५०६ बॅचेसच्या माध्यमातून नवीन अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास राज्यपाल आचार्य देवव्रतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारकेंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडूकेंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेविधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकरजपानचे भारतातील राजदूत ओनू केईचीवन मंत्री गणेश नाईकसांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारकौशल्यरोजगारउद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढामहिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेपरिवहन मंत्री प्रताप सरनाईकलोकसभा सदस्य श्रीरंग बारणेखासदार सुनील तटकरेखासदार नरेश म्हस्केखासदार धैर्यशील पाटीलआमदार सर्वश्री रवींद्र चव्हाणअमित साटमप्रशांत ठाकूरमहेश बालदीविक्रांत पाटीलमंदाताई म्हात्रेअदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध मान्यवर उपस्थित होते.

Featured post

Lakshvedhi