तरुणांसाठी रोजगार, नवनवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण
पीएम सेतू योजनेद्वारे देशभरातील आयटीआय संस्थांना उद्योग क्षेत्राशी जोडले जात आहे. ७ हजार कोटी रुपयांच्या या योजनेंतर्गत ड्रोन, रोबोटिक्स, ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहनांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. महाराष्ट्र सरकारने देखील राज्यातील शेकडो आयटीआय व तांत्रिक शाळांमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले आहेत. यामुळे लाखो तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत, असेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी नमूद केले.
No comments:
Post a Comment