Wednesday, 8 October 2025

सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित

 महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या द्वितीय आणि तृतीय स्तरावरील आजारांवर गुणवत्तापूर्णमोफत आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेला आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेशी एकत्रित स्वरूप देऊन लाभाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे. सुरुवातीला अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी सुरू झालेली ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १३५६ उपचार व शस्त्रक्रिया समाविष्ट असून आतापर्यंत ८२ लाखाहून अधिक उपचार व शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. प्रत्येक पात्र कुटुंबाला प्रति वर्ष पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिले जात आहे. राज्य शासनाच्या ‘आरोग्यसुरक्षा सर्वांसाठी’ या ध्येयपूर्तीकडे जाणाऱ्या या योजनेंतर्गत पात्रता निकषआवश्यक कागदपत्रेलाभ मिळविण्याची प्रक्रिया आणि योजनांची अंमलबजावणी याबाबतची सविस्तर माहिती श्री. चव्हाण यांनी दिलखुलास’ आणि जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून दिली आहे.

000

दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांची विशेष मुलाखत

 दिलखुलासआणि जय महाराष्ट्र कार्यक्रमात 

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे

मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांची विशेष मुलाखत

 

मुंबईदि. ८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलासआणि जय महाराष्ट्रया कार्यक्रमात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचे स्वरूप व अंमलबजावणीया विषयावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

 

'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत सोमवारदि. १३मंगळवारदि. १४बुधवार दि. १५ आणि गुरुवार दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल. तसेच ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. तसेच जय महाराष्ट्रकार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारदि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

 

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

 

शालेय स्तरावर एनसीसी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करावी

 शालेय स्तरावर एनसीसी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करावी

– क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

 

मुंबईदि. ८ : राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शिस्तनिरोगीपणा आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत यासाठी शालेय स्तरावर राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) प्रशिक्षण देण्यात यावेअसे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिले.

मंत्रालयात आयोजित राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी)स्काऊट आणि गाईड संदर्भातील बैठकीत क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. कोकाटे यांनी ही भूमिका मांडली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शालेय स्तरावर एनसीसी प्रशिक्षण सुरू करण्यासंदर्भात केंद्र शासनाला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावनाशिस्त आणि क्रीडाप्रेम अधिक वृद्धिंगत होईलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            यावेळी आयुक्त शितल तेलीएनसीसीचे कॅप्टन जे. जॉर्जसहाय्यक संचालक मिलिंद दीक्षितशिक्षण उपसंचालक डॉ. वंदना वाहूळशालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव अनिरुद्ध कुलकर्णी उपस्थित होते.

मंत्री कोकाटे म्हणाले कीमाजी सैनिकएनसीसीचे विद्यार्थी आणि क्रीडा शिक्षकांच्या मदतीने शाळेतील शिक्षकांना क्रीडा आणि कवायतीचे प्रशिक्षण द्यावे. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच शारीरिक स्वास्थ्यस्वयंशिस्त आणि प्रगल्भ विचार निर्माण होण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल.  विद्यार्थ्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण करण्यासाठी शालेय स्तरावर सक्तीचे क्रीडा प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. भविष्यात ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावायासाठी विविध खेळांचे प्रशिक्षण देण्याचे धोरण तयार करावे. तसेचक्रीडा शिक्षकांची संख्या वाढविण्यासाठी आणि क्रीडा स्पर्धांतील विजेत्या खेळाडूंना शिक्षक म्हणून नियुक्तीत विशेष सवलत देण्यासाठी आवश्यक पावले उचलावीतअसेही त्यांनी सांगितले.

एनसीसीचे प्रशिक्षण हे नेतृत्वगुणचारित्र्यसंवर्धनसेवाभाव आणि खिलाडूवृत्ती विकसित करण्याचे प्रभावी साधन आहे. देशाच्या आपत्कालीन परिस्थितीत सहाय्यभूत होऊ शकेल अशी शिस्तबद्ध प्रशिक्षित तरुण शक्ती घडविणे हे एनसीसीचे उद्दिष्ट आहे. तसेचस्काऊट-गाईडच्या माध्यमातून ग्रामीणशहरी आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये सहिष्णुता आणि नैतिक मूल्यांची जपणूक केली जाते.

बैठकीदरम्यान देण्यात आलेल्या माहितीनुसारवर्ष २०२३-२४ मध्ये राज्यातील विद्यालये व महाविद्यालयांमधील एनसीसी अंतर्गत एकूण १,००,८८४ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेतयामध्ये कनिष्ठ विभागात ६१,३२८ आणि वरिष्ठ विभागात ३९,५०२ विद्यार्थी सहभागी आहेत.

देहर्जे प्रकल्पबाधितांना भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करा

 देहर्जे प्रकल्पबाधितांना भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी

मलवाडा पॅटर्न तयार करा

वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक

 

मुंबईदि. : पालघर जिल्ह्यातील देहर्जे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना मलवाडा येथील दराने भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी मलवाडा पॅटर्न तयार करून तसा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करण्याचे निर्देश वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

            देहर्जे प्रकल्पबाधितांच्या भूसंपादनाच्या मोबदल्यासंदर्भात वन मंत्री नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी खासदार डॉ. हेमंत सावराआमदार राजेंद्र गावितवन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकरपालघर जिल्हाधिकारी इंदुमती जाखड यांच्यासह एमएमआरडीएजलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

            पालघर जिल्ह्याच्या पाणीपुरवठ्यासाठी देहर्जे मध्यम प्रकल्प विक्रमगड तालुक्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी जांभेसाखरे व खुडेद या तीन गावातील 238 हेक्टर खासगी जमिन संपादित करावी लागणार आहे. परंतु या संपादनासाठी देण्यात येणारा मोबदला अपुरा असल्याने त्यावर तोडगा काढण्याची मागणी प्रकल्पबाधितांनी केली होती. परंतु या परिसरात गेल्या काही काळापासून जमिनीची खरेदी विक्री न झाल्याने मोबदला देण्यात येत नव्हता. त्यामुळे जवळच्या मलवाडा येथील जमिनीच्या बाजारभावानुसार मोबदला देण्याचा प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात वन मंत्री नाईक यांनी निर्देश दिले.

देहर्जे प्रकल्पबाधित हे आदिवासी असल्याने त्यांच्या जमिनींना योग्य भाव मिळावायासाठी मलवाडा येथील जमिनीच्या दराने भूसंपादनाचा मोबदला देण्यासंदर्भात मलवाडा पॅटर्न तयार करावा. त्यासाठी आवश्यक तो प्रस्ताव शासनस्तरावर पाठवावा. यावर शासनस्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईलअसे वन मंत्री नाईक यांनी यावेळी सांगितले.

 खासदार डॉ. सावराआमदार श्री. गावित यांनी प्रकल्प बाधितांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.

0000

बोईसर रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग उभारण्यासाठी राज्य शासनाकडून निधीसाठी प्रस्ताव सादर करा

 बोईसर रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग उभारण्यासाठी

राज्य शासनाकडून निधीसाठी प्रस्ताव सादर करा

वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक

 

मुंबईदि. : पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वेस्थानकाजवळ उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने मार्ग काढावा. तसेच भुयारी मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी मिळण्यासाठी राज्य शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

बोईसर येथील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद करून तेथे उड्डाणपूल व भुयारी मार्ग बांधण्यासंदर्भात वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी खासदार डॉ. हेमंत सावराआमदार राजेंद्र गावितआमदार विलास तरेपालघर जिल्हाधिकारी इंदुमती जाखडडेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे महाव्यवस्थापक विकास कुमार यांच्यासहरेल्वे विकास महामंडळसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बोईसर रेल्वे स्थानक येथील लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद करून रेल्वे उड्डाणपूल (आरओवी) उभारण्याबरोबरच भुयारी मार्ग बांधण्याची मागणी नागरिकांनी केली होती. उड्डाणपुलाचे आरेखन करताना तेथील काही आदिवासी पाड्यांना विस्थापित होत असल्याने नागरिकांचा त्याला विरोध होता. त्यामुळे नागरिकांची सोय पाहून उड्डाणपुलाचे सुधारित आरेखन तयार करण्याचे निर्देश वनमंत्री तथा पालकमंत्री नाईक यांनी यावेळी दिले.

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन

 राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व

मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन

- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

            मुंबईदि. ८ : राज्यात सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच एमएसआरडीसीएनएचएआयअशा अनेक संस्थाच्या वतीने रुग्णवाहिका सेवा देण्यात येतात. या सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क व संचलनमॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री आबिटकर बोलत होते. या बैठकीला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे - बोर्डीकरआरोग्य सचिव डॉ. निपुण विनायकआरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडेपरिवहन आयुक्ततसेच आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा पुरवठादार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

            राज्याच्या रुग्णसेवेत लवकरच नवीन अत्याधुनिक १०८ ॲम्बुलन्स रुजू होणार आहेत. या सर्व  रुग्णवाहिका निर्धारित केलेल्या वेळेत सेवेत रुजू करून आवश्यकतेनुसार ठिकाणे निश्चित करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.

नवीन अत्याधुनिक १०८ रुग्णवाहिकेसोबतच १०२१०४११२ या क्रमांकाच्या रुग्णवाहिकाही कार्यरत आहेत. एमएसआरडीसीएनएचएआय या संस्थांच्या वतीने महामार्गावरटोल नाक्यावररुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. या सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क तयार केल्यासरुग्णांना  गोल्डन अवर मध्ये जलद रुग्णसेवा उपलब्ध होईलअसे मंत्री आबिटकर यांनी सांगितले.

राज्यातील रुग्णवाहिका सेवावर महाराष्ट्र शासनअसे स्पष्ट लिहिले असावे. कोणत्याही कंपनीचे नाव किंवा चिन्हे वापरू नये. पुरवठादार संस्थेनेरुग्णवाहिकेवर आपल्या कंपनीची नव्हे तर महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असल्याचे ब्रॅण्डिंग करावे.  शासकीय अधिकाऱ्यांच्या मान्यता घेऊनच रुग्णवाहिकेवरील ब्रँडिंग करावेअशा स्पष्ट सूचना मंत्री आबिटकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा; परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय शैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

 पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा दिलासा;

परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय

शैक्षणिक संस्थांनी पूरग्रस्त विद्यार्थ्यांच्या

शैक्षणिक मदतीसाठी पुढे यावे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

 

मुंबईदि. ८ : राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पुरामुळे कागदपत्रेशैक्षणिक साहित्य वाहून गेलेल्या एकाही विद्यार्थ्याचे शिक्षण बाधित होणार नाहीयाची दक्षता घेतली जात असून परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सोबतच शैक्षणिक संस्थांनीही सामाजिक जबाबदारी म्हणून विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घ्यावाअसे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

मंत्रालयात राज्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणींचा आढावा घेण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकरतंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकरउपसचिव प्रताप लुबाळमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णीप्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरेतसेच राज्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणालेअनेक विद्यार्थ्यांचे साहित्य आणि शैक्षणिक साधने पुरामुळे नष्ट झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयेविद्यापीठे आणि खासगी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना वह्यापुस्तकेगणवेश अशा स्वरूपात सामाजिक कर्तव्य म्हणून मदत करावी. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांचे शिक्षण अखंडितपणे सुरू राहील.

Featured post

Lakshvedhi