‘दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांची विशेष मुलाखत
मुंबई, दि. ८ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’या कार्यक्रमात ‘एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेचे स्वरूप व अंमलबजावणी’या विषयावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
'दिलखुलास' कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार, दि. १३, मंगळवार, दि. १४, बुधवार दि. १५ आणि गुरुवार दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर ऐकता येईल. तसेच ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. तसेच ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. १४ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. निवेदक सुषमा जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook : https://www.facebook.com/
YouTube : https://www.youtube.com/
No comments:
Post a Comment