Wednesday, 8 October 2025

बोईसर रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग उभारण्यासाठी राज्य शासनाकडून निधीसाठी प्रस्ताव सादर करा

 बोईसर रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्ग उभारण्यासाठी

राज्य शासनाकडून निधीसाठी प्रस्ताव सादर करा

वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक

 

मुंबईदि. : पालघर जिल्ह्यातील बोईसर रेल्वेस्थानकाजवळ उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने मार्ग काढावा. तसेच भुयारी मार्गासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधी मिळण्यासाठी राज्य शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिले.

बोईसर येथील रेल्वे लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद करून तेथे उड्डाणपूल व भुयारी मार्ग बांधण्यासंदर्भात वन मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. यावेळी खासदार डॉ. हेमंत सावराआमदार राजेंद्र गावितआमदार विलास तरेपालघर जिल्हाधिकारी इंदुमती जाखडडेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे महाव्यवस्थापक विकास कुमार यांच्यासहरेल्वे विकास महामंडळसार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बोईसर रेल्वे स्थानक येथील लेव्हल क्रॉसिंग फाटक बंद करून रेल्वे उड्डाणपूल (आरओवी) उभारण्याबरोबरच भुयारी मार्ग बांधण्याची मागणी नागरिकांनी केली होती. उड्डाणपुलाचे आरेखन करताना तेथील काही आदिवासी पाड्यांना विस्थापित होत असल्याने नागरिकांचा त्याला विरोध होता. त्यामुळे नागरिकांची सोय पाहून उड्डाणपुलाचे सुधारित आरेखन तयार करण्याचे निर्देश वनमंत्री तथा पालकमंत्री नाईक यांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi