Tuesday, 7 October 2025

राज्यात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 राज्यात स्वस्थ नारीसशक्त परिवार’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

·         १ कोटीहून अधिक नागरिक लाभार्थी

·         ७५ लाख ८७ हजार पेक्षा जास्त महिलांची तपासणी

 

            मुंबईदि : राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या काळात राबविण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारीसशक्त परिवार’ या विशेष आरोग्य अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारसार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारीसशक्त परिवार’ या अभियानांतर्गत एकूण २,३०,६५३ आरोग्य शिबिरे घेण्यात आलीज्यामध्ये ३,४१३ विशेष शिबिरांचा समावेश होता. या शिबिरांमध्ये १ कोटी ८ लाख ५९ हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. या ३२ लाख ७१ हजार पुरुष आणि ७५ लाख ८७ हजार महिला लाभार्थी ठरल्या.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सेवा हाच संकल्पभारत हीच पहिली प्रेरणा .... ७५ वर्षे’ यानुसार राष्ट्रीय स्तरावर 'स्वस्थ नारीसशक्त परिवारहे विशेष अभियान देशात राबविण्यात आले. महाराष्ट्रात आरोग्य विभागाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्त्रीशक्तीला आरोग्य शक्तीची साथ देण्यासाठी आणि महिला आरोग्य व सशक्तीकरणाला प्राधान्य देण्यासाठी 'स्वस्थ नारीसशक्त परिवारहे अभियान राबविले गेले. या अभियानांतर्गत महिला आणि बालकांच्या आरोग्य तपासणीसह विविध जनजागृती उपक्रम आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन जिल्हा आणि महापालिका स्तरावर करण्यात आले. या शिबिरांमध्ये महिलांच्या असंसर्गजन्य आजारउच्च रक्तदाबमधुमेहकर्करोगक्षयरोग व रक्तदाब तपासणीगर्भवती महिलांची तपासणीबालकांचे लसीकरणपोषण व मासिक पाळी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन आणि समुपदेशन करण्यात आले. याशिवाय रक्तदान शिबिरेनि-क्षय मित्र नोंदणी मोहीमआयुष्मान कार्ड वितरणप्रधानमंत्री मातृ वंदना कार्ड वितरण आणि अंगणवाडी केंद्रांमार्फत पोषण जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. अभियान यशस्वी व्हावे म्हणून सार्वजनिक आरोग्य विभागासोबत शिक्षणमहिला व बाल विकासवैद्यकीय शिक्षणग्रामविकास व नगरविकास विभाग यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपा

 साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्लासंगम माहुलीमालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपा

-  उपमुख्यमंत्री अजित पवार

 

       मुंबई दि.  :- साताऱ्यातील संगम माहुलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील महाराणी ताराराणीमहाराणी येसूबाईपहिले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचे जतन आणि संवर्धनमालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरणसंगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या स्थळांच्या परिसराचा पुनर्विकास करताना तेथील परिसरसमाधी स्थळप्राचीन वास्तूंचं मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावंअसे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत संगम माहुलीसातारा येथे महाराणी ताराराणीमहाराणी येसूबाई आणि  पहिले शाहू महाराज यांच्या समाधी स्थळाचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि जमीन विकसित करणेसाताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला सुशोभीकरणमालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणरत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक या स्थळांच्या परिसर विकासाबाबत आढावा घेण्यात आला.

            या सर्व ऐतिहासिक स्थळांचा पुनर्विकास करताना पुढील शंभर वर्षे टिकेल अशी वास्तू उभारावी. त्या ठिकाणी पुरेसे वृक्षारोपण करावेस्वच्छता राखावीपर्यटन आणि व्यावसायिक दृष्टिकोनही ठेवावाभविष्यातील देखभाल - दुरुस्ती बाबतही आतापासूनच उपाययोजना करावीअशा सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

संगमेश्वर येथील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भातही या बैठकीत आढावा घेण्यात आला आणि आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

            यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसलेमत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय,   पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणेसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव आबासाहेब नागरगोजेउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुखसांस्कृतिक कार्य विभागाच्या सहसचिव नंदा राऊतपुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे उपस्थित होते. तर पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवारकोकणचे विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशीसाताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटीलसिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे सहभागी झाले होते.

0000

नमो नेत्र संजीवनी अभियान’चा समारोप 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान 5.15 लाख नागरिकांची नेत्र तपासणी

  

नमो नेत्र संजीवनी अभियान’चा समारोप

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान 

5.15 लाख नागरिकांची नेत्र तपासणी

 

मुंबई, दि. 7 : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षातर्फे राबविण्यात आलेल्या ‘नमो नेत्र संजीवनी अभियानाचा’ समारोप झाला. या अभियानाद्वारे अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांना नेत्र आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आलेल्या अभियानाचा समारोप 2 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात आला. या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान राबविण्यात आले. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील एकूण 12,764 रुग्णालयांनी अभियानात सहभाग नोंदवला. या कालावधीत 10,720 नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आलीज्यामध्ये एकूण 5,16,752 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.

बहुतांश लोक नेत्र तपासणीकडे दुर्लक्ष करतात. डोळ्यांच्या आजारांची लक्षणं दिसेपर्यंत अनेकदा उशीर झालेला असतो. या पार्श्वभूमीवरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात आलेले नमो नेत्र संजीवनी अभियान’ हे जनजागृती व प्रत्यक्ष आरोग्यसेवेचे प्रभावी उदाहरण ठरले आहे. अल्प कालावधीत लाखो नागरिकांपर्यंत मोफत तपासणी व उपचार सेवा पोहोचविण्यात या अभियानाने यश मिळवले आहे. ग्रामीण व शहरी भागातील लोकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही या उपक्रमाची सर्वात मोठी ताकद ठरली असल्याचे मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले.

अभियानादरम्यान तपासण्यात आलेल्या नागरिकांपैकी 36,388 रुग्णांना द्वितीय स्तरीय निदानात्मक तपासण्या, उपचारात्मक सेवा (मोतीबिंदू शस्त्रक्रिया किंवा इतर नेत्र विषयक शस्त्रक्रिया) करिता संदर्भित करण्यात आले. तसेच 2,44,788 नागरिकांची चष्म्यासाठी नोंदणी करण्यात आली. पैकी 1,55,372 नागरिकांना चश्मे वाटप करण्यात आले.

या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात 32,911 मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच 4,652 इतर नेत्र विषयक शस्त्रक्रिया (मोतीबिंदू व्यतिरिक्त) यशस्वीरीत्या पार पडल्या.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून वर्षभरा

 जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून

वर्षभराचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस

 

मुंबईदि. ७ : जलसंपदा (विदर्भतापीकोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी वर्षभराचे संपूर्ण वेतन रुपये ३१ लाख १८ हजार २८६ इतक्या रकमेचा धनादेश मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.

 

राज्यात मुसळधार पाऊस व महापुरामुळे शेती आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बाधित नागरिकांना मदत पुरविण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतःचा वर्षभराचा पगार मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून डिसेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीतील संपूर्ण वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे.

 

आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून त्यांनी जालनाबीडछत्रपती संभाजीनगरधाराशिवसोलापूरजळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेऊन राज्य शासन शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची हमी त्यांनी या आपत्तीग्रस्तांना दिली. राज्यात मुसळधार पावसामुळे आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या आपत्तीग्रस्तांना शासन मदत करत आहे. शासनाच्या मदतीसोबत गिरीश महाजन यांनी वर्षभराचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस दिले आहे.

००००००

मुंबई वन’ - भारतातील पहिले एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅप

 मुंबई वन’ - भारतातील पहिले एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅप

मुंबई महानगरातील प्रवाशांना अखंड आणि सुलभ प्रवास अनुभव देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई वन’ या भारतातील पहिल्या एकात्मिक कॉमन मोबिलिटी अॅपचे अनावरण होणार आहे. हे अॅप उपनगरीय रेल्वेमेट्रो लाईन्समोनोरेलबेस्टटीएमटीएनएमएमटीकेडीएमटीएमबीएमटीनवी मुंबई मेट्रो इत्यादी ११ सार्वजनिक वाहतूक ऑपरेटरशी जोडला जाणार आहे.

मुंबई वन’ द्वारे प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा

·         एकाच क्यूआर कोडने मेट्रोबसरेल्वेमोनोरेल प्रवासाचे तिकीट मिळेल.

·         त्रिभाषिक इंटरफेस (मराठीहिंदीइंग्रजी) असेल.

·         रिअल-टाइम ट्रेन/बस माहिती आणि प्रवासाचे नियोजन करता येईल.

·         प्रवाशाच्या स्थान शेअर करण्याच्या सुविधेबरोबरच आपत्कालीन परिस्थितीत संपर्काची यंत्रणा उपलब्ध

·         कॅशलेस व्यवहार व डिजिटल वॉलेट्स

·         पर्यटकांसाठी शहर मार्गदर्शक आणि आकर्षण स्थळांची माहिती

·         या अॅपमुळे प्रवाशांची अनेक अॅप्स वापरण्याची गरज संपेलतिकीट रांगा कमी होतील आणि डिजिटल इंडिया उद्दिष्टांना चालना मिळेल.

मेट्रो लाईन-३ (अ‍ॅक्वा लाईन) च्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण

 मेट्रो लाईन-३ (अ‍ॅक्वा लाईन) च्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुकीत क्रांती घडवणाऱ्या ३३.५ कि.मी. लांबीच्या पूर्ण भूमिगत मेट्रो लाईन-३ च्या अंतिम टप्प्याचे आचार्य अत्रे चौककफ परेड मार्गाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यावेळी लोकार्पण केले जाणार आहे.

एकूण २७ स्थानके असलेली ही लाईन दररोज १३ लाख प्रवाशांना सेवा देईल. दर पाच मिनिटांनी धावणाऱ्या आठ डब्यांच्या गाड्या प्रति तास ७२,००० प्रवासी वाहून नेतील. सायन्स सेंटर ते कफ परेड असा १०.९९ कि.मी.चा टप्पा ₹१२,१९५ कोटी खर्चून बांधण्यात आला असूनहा मार्ग मंत्रालयउच्च न्यायालयआरबीआयशेअर मार्केटमरीन ड्राइव्हसारख्या आर्थिक व सांस्कृतिक ठिकाणांना जोडला जाणार आहे.

मुंबई मेट्रो लाईन ३ हा एकूण  ₹ ३७,२७६ कोटी खर्चाचा प्रकल्प केंद्र सरकारमहाराष्ट्र सरकारजेआयसीए आणि एमएमआरसीएल यांच्या संयुक्त भागीदारीत राबविला गेला आहे. मुंबईकरांना जागतिक दर्जाचीहरित आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक प्रणाली देण्याच्या दिशेने हा निर्णायक टप्पा आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ

भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात नवे युग सुरू करणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा देशातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प ठरणार आहे. सिडको  प्राधिकरण आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या माध्यमातून हा विमानतळ सार्वजनिक-खागी भागीदारी (PPP) अंतर्गत उभारण्यात आला आहे. या विमानतळाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रधानमंत्री मोदी हे विमानतळावरील सोयी सुविधांची पाहणी करणार आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात ₹१९,६४७ कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून,१६० हेक्टर क्षेत्रावर उभारलेला हा विमानतळ दरवर्षी २० दशलक्ष प्रवासी व ०.५ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळू शकतो. अंतिम टप्प्यात हे विमानतळ ९० दशलक्ष प्रवासी आणि ३.२५ दशलक्ष टन मालवाहतूक क्षमतेचे जागतिक दर्जाचे केंद्र बनेल.

दोन समांतर कोड-एफ रनवेजलद बाहेर पडण्यासाठी टॅक्सीवेअत्याधुनिक मालवाहतूक  टर्मिनलसौरऊर्जेवर आधारित ४७ मेगावॅटचा ऊर्जेचा पुरवठा आणि इलेक्ट्रिक बस सेवा ही या विमानतळाची वैशिष्ट्ये आहेत. तसेचहा देशातील पहिला वॉटर टॅक्सीने जोडलेला विमानतळ असणार आहे.

या विमानतळावरुन डिसेंबर २०२५ मध्ये देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होणार असूननवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारताच्या आधुनिकहरित आणि जागतिक दर्जाच्या विमान वाहतूक पायाभूत सुविधेचे प्रतिक ठरणार आहे.

Featured post

Lakshvedhi