Monday, 6 October 2025

प्रचार-प्रसिद्धीसाठी 'डिजिटल कुंभ' संकल्पना

 प्रचार-प्रसिद्धीसाठी 'डिजिटल कुंभसंकल्पना

कुंभमेळ्याच्या प्रचार-प्रसिध्दीसाठी 'डिजिटल कुंभही संकल्पना राबविण्यात यावी. प्रचार प्रसिध्दीसाठी स्वतंत्रपणे वेगळा आराखडा तयार करून नियोजन करण्यात यावे. कुंभमेळा कामांसंदर्भात कोणत्याही प्रकारची नकारात्मक प्रसिद्धी होत असल्यास संबंधित विभागांनी यासंदर्भातील वस्तूनिष्ठ खुलासा त्वरित संबंधित माध्यमांना द्यावा. कुंभमेळ्यासाठीच्या आवश्यक कामांसाठी जिल्हास्तरावरील नोकरभरतीलाही गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेकुंभमेळ्यासाठीची विविध कामे वेगाने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. तयार होणाऱ्या सुविधा या दीर्घकालीन असाव्यात असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेकुंभमेळ्यासाठीची सर्व कामे दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे. पोलिसांच्या निवासव्यवस्थेसही प्राधान्य द्यावे, असे श्री. पवार यांनी सांगितले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणालेकुंभमेळा कालावधीत व नेहमीसाठीही नदीपात्रातील पाणी शुद्ध राहील यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने नियोजन करण्यात यावे.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणालेअनेक तीर्थक्षेत्रे कुंभमेळ्याच्या परंपरेशी जोडलेली असल्याने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जवळपासच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांनाही गती देण्यात यावी.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणालेकुंभमेळ्यापुर्वी रस्त्यांची तसेच मलनिस्सारणाची कामे पूर्ण करण्यात यावीत.

नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील यावर कटाक्षाने भर द्यावा

 नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील यावर कटाक्षाने भर द्यावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेसिंहस्थ कुंभमेळा हा धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे .संपूर्ण कुंभमेळा कालावधीत रामकुंडात आणि नेहमीसाठीच नदीपात्रातील पाणी स्वच्छ राहील हे कटाक्षाने पहावे. मलनि:स्सारणाची कामे प्राधान्याने हाती घेवून पूर्ण करण्यात यावीत. विमानतळे आणि रेल्वे सुविधांची कामेही गतीने पूर्ण करावीत. नाशिकमधील नवीन रिंग रोडचे काम त्वरित पूर्ण करावे. या कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक निधी त्वरित मंजूर करुन घ्यावा. इतर रस्त्यांची कामेही त्वरित हाती घेण्यात यावी. कामे अपूर्ण राहिल्याने नागरिकांची गैरसोय होता कामा नये याकडे लक्ष द्यावे. विविध आखाड्यांशी चर्चा करून त्यांच्या गरजेनुसार साधूग्राममध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. सीसीटीव्ही कॅमेरे प्रणाली केंद्रीकृत पद्धतीने तयार करण्यात यावी. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 'एआय'च्या विविध पर्यायांचा वापर करण्यात यावा. 'मार्व्हल'चाही उपयोग करून घेण्यात यावा. पोलिसांच्या निवासासाठीची व्यवस्था प्राधान्याने करण्यात यावी. द्वारका सर्कल येथील कामे त्वरित पूर्ण करावी. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेव्दारे बस सेवेचे नियोजन करण्यात यावे. वाहनतळांच्या ठिकाणी भंडारा/लंगरची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश श्री. फडणवीस यांनी दिले.

नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे

 नाशिकमधील नवीन रिंग रोडचे व साधूग्रामचे काम त्वरित पूर्ण करावे

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

§  सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे

दर्जेदार व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश

§  नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 आढावा बैठक

मुंबई, दि. 4 : कुंभमेळा श्रद्धासांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे  प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीची पायाभूत सुविधांची सर्व कामे दर्जेदार आणि गतीने पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नाशिकमधील नवीन रिंगरोडचे काम पूर्ण करण्याबरोबरच साधू ग्राम/टेंटसीटीसाठीची भूसंपादनाची कामेही गतीने पूर्ण करण्यात यावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे नाशिक - त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारअन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळजलसंपदा मंत्री गिरीश महाजनशालेय शिक्षण मंत्री दादा भुसेपणनमंत्री जयकुमार रावलनाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीमुख्य सचिव राजेशकुमारपोलिस महासंचालक रश्मी शुक्लासंबंधित विभागांचे सचिव उपस्थित होते. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सादरीकरणाव्दारे नियोजनाची माहिती दिली. जिल्हाधिकारी जलज शर्मा, आयुक्त मनीषा खत्री, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त करिश्मा नायर हे उपस्थित होते.

 गर्दीचे नियोजन, कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे तसेच रस्त्यांची व मलनि:स्सारणाची कामे वेगाने पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे श्री. गेडाम यांनी सांगितले

प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध

 प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

- महाज्योतीला 1500 कोटींचा निधी इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी 63 वसतिगृहे

मुंबईदि. 4 : महाज्योती  संस्थेला आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला असूनयाच महिन्यात 1500 कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. राज्यात इतर मागास वर्गासाठी (ओबीसीं) 63 वसतिगृहे तयार केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी शिष्टमंडळासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारमहसूल मंत्री तथा ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेमंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळपर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेइतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेखासदार प्रशांत पडोळेआमदार परिणय फुकेआमदार विजय वडेट्टीवारआमदार विकास ठाकरेमुख्य सचिव राजेश कुमारओबीसी शिष्टमंडळातील नवनाथ वाघमारेप्रकाश शेंडगेमंगेश ससाणे तसेच इतर सदस्य उपस्थित होते.अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजना या इतर मागास प्रवर्गातील महामंडळांनाही लागू केल्या आहेत. राज्य शासन कायम कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेत असते. या निर्णयाचा गैरवापर न होताओबीसींसह कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाहीहीच सरकारची भूमिका असते. त्यामुळे प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे श्री.फडणवीस यांनी सांगितले.

 

पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठीची कामे प्रा

 पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठीची कामे

प्राधान्याने पूर्ण करावीत

-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

       मुंबईदि.४ : 'णमोकार तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे. फेब्रुवारी महिन्यात होणा-या 'पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्याच्याअनुषंगाने तात्काळ व दीर्घ कालावधीत होणा-या कामांचा सुधारित प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

            सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मौजे मालसाने येथील जैन समाजाच्या 'णमोकार तीर्थक्षेत्र', येथे 'पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळाआयोजनासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री अजित पवारअन्न,नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण मंत्री छगन भुजबळजलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसेआमदार राहुल आहेरउत्सव समिती सदस्य संतोष पेंढारीजैन अल्पसंख्याक वित्त मंडळाचे अध्यक्ष ललीत गांधीनाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडामजिल्हाधिकारी जलज शर्मा उपस्थित होते. 

                  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'णमोकार तीर्थधर्मस्थळाचे मोठे महत्व आहे. 'पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळ्यासाठी  मोठया संख्येने भाविक येथे येतात.   हे लक्षात घेता  भाविकांसाठी रस्तेतात्पुरते निवासपार्किंगसह इतर तात्काळ  करावी लागणारी कामे प्राधान्याने करावीत.  स्थायी कामांमध्ये पर्यटनाच्या अनुषंगाने जी कामे करता येतील ती देखील करावी. दीर्घ कालावधीत करता येणा-या कामांचा प्रस्ताव शासनाला सादर करावाजेणेकरून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमधून ही कामे करता येतीलविकास आराखड्यातील स्थायी व अस्थायी कामांची यादी प्राधान्यक्रम घेऊन तयार करावी. विभागीय आयुक्त आणि स्थानिक प्रशासन व 'पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सव जैन कुंभ मेळा आयोजन समितीने याबाबतीत कामांच्या यादीचा  सुधारित प्रस्ताव सादर करावा अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

यावेळी आमदार राहुल आहेर व जैन अल्पसंख्याक वित्त मंडळाचे अध्यक्ष ललीत गांधी यांच्यासह महोत्सव समितीच्या सदस्यांनी महोत्सवाचे तसेच मंदिर परिसर विकासासाठीचे सादरीकरण केले.                                        0000

लिडकॉमच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

 लिडकॉमच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

                  -व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार

 

             मुंबईदि. ५ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत (लिडकॉम) मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात चर्म उत्पादनांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.

 व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्यादि.२९ सप्टेंबर ते दि.१ ऑक्टोंबर२०२५ या कालावधीत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटआदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईकेसामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भेट दिली. तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे व आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी या प्रदर्शनासाठी मार्गदर्शन केले.

  राज्यात चर्मोद्योगाचा विकास करुन चर्मोद्योगातील कारागिरांचा व तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि चर्मवस्तु व पादत्राण उत्पादनाकरिता बाजारपेठ उपलब्ध करुन देणेतसेच चर्मोद्योगास प्रोत्साहन देऊन त्याच्या विकासाला चालना देणे हे या महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. राज्यात या महामंडळाची चार उत्पादन केंद्रे असुन सहा ठिकाणी चर्मवस्तु व पादत्राणांची विक्री केंद्रे आहेत. महामंडळातर्फे उत्पादित केल्या जाणा-या राज्यातील चर्मकार समाजातील कारागिरांनी तयार केलेल्या चर्मवस्तु व पादत्राणांना आणि विशेष करुन कोल्हापुरी चप्पलना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करुन देणे. त्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच कारागिरांना बाजारपेठ मिळावी यादृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.

0000

शेतकऱ्याला आपली ताकद

 शेतकऱ्याला आपली ताकद

ओळखायला लावायची आणि सहकारच्या माध्यमातून त्याला सशक्त करायचं या विचारातूनच आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला उभा राहिला. हा केवळ उद्योग नव्हता तर तो ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभबिंदू होता. आज या कारखान्याची क्षमता वाढत असताना शेतकऱ्यांनाही नवे तंत्रज्ञान स्वीकारून उत्पादन वाढवावे लागेल. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आलीत्यांच्या मदतीने शिक्षण संस्था उभ्या राहिल्याग्रामीण भागामध्ये लक्ष्मी बरोबरच सरस्वतीदेखील नांदू लागली. सहकार चळवळ अडचणीत येत असताना केंद्र सरकारने 'सहकारातून समृद्धीही संकल्पना व्यवहारात आणली. मोलायसिसवरील कर २८ टक्क्यावरून ५ टक्क्यावर आणण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. नव्याने स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील संस्थानमुळे राज्याच्या सहकार क्षेत्राला संजीवनी मिळाली आहेअसे श्री. पवार म्हणाले. नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी लवकरच पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येईलशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील असेही ते म्हणाले.

Featured post

Lakshvedhi