Monday, 6 October 2025

शेतकऱ्याला आपली ताकद

 शेतकऱ्याला आपली ताकद

ओळखायला लावायची आणि सहकारच्या माध्यमातून त्याला सशक्त करायचं या विचारातूनच आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरला उभा राहिला. हा केवळ उद्योग नव्हता तर तो ग्रामीण भारतातील परिवर्तनाचा एक आरंभबिंदू होता. आज या कारखान्याची क्षमता वाढत असताना शेतकऱ्यांनाही नवे तंत्रज्ञान स्वीकारून उत्पादन वाढवावे लागेल. सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये समृद्धी आलीत्यांच्या मदतीने शिक्षण संस्था उभ्या राहिल्याग्रामीण भागामध्ये लक्ष्मी बरोबरच सरस्वतीदेखील नांदू लागली. सहकार चळवळ अडचणीत येत असताना केंद्र सरकारने 'सहकारातून समृद्धीही संकल्पना व्यवहारात आणली. मोलायसिसवरील कर २८ टक्क्यावरून ५ टक्क्यावर आणण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. नव्याने स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील संस्थानमुळे राज्याच्या सहकार क्षेत्राला संजीवनी मिळाली आहेअसे श्री. पवार म्हणाले. नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी लवकरच पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्यात येईलशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi