Sunday, 5 October 2025

दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची मुलाखत

 दिलखुलास’ ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची मुलाखत

 

        मुंबईदि. 6माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ आणि 'दिलखुलासकार्यक्रमात महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

            जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवारदि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. तर 'दिलखुलासकार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवारदि. 10,  शनिवार दि. 11 आणि सोमवार दि.13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर तसेच ‘News On AIR’ या मोबाईल अॅपवर ऐकता येणार आहे. ही मुलाखत निवेदिका सुषमा जाधव यांनी घेतली आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी महिला व बालविकास विभाग विविध कल्याणकारी योजना आणि उपक्रम राबवत आहे. या योजनांचा उद्देश महिलांचे सक्षमीकरणबालकांचे आरोग्य व पोषणतसेच त्यांच्या शिक्षण आणि सुरक्षेला बळकटी देणे हा आहे. यामध्ये लाडकी बहिण योजनापोषण आहार योजनाबालसंवर्धन योजनावन स्टॉप सेंटरबालसंरक्षण उपक्रममहिला आर्थिक विकास महामंडळाच्या योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याशिवायआंगणवाडी सेवांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील बालकांना शिक्षणपोषण व आरोग्याची सोय उपलब्ध करून दिली जाते. या योजना आणि उपक्रमांमुळे राज्यातील हजारो महिला व बालकांना नव संजीवनी लाभत असून समाजातील दुर्बल घटक मुख्य प्रवाहात येत असून याची अंमलबजावणी व नियोजन कशा प्रकारे करण्यात येत आहेयाविषयी सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी जय महाराष्ट्र’ आणि 'दिलखुलासकार्यक्रमातून माहिती दिली आहे.

0000

लिडकॉमच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

 लिडकॉमच्या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

                  -व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार

 

             मुंबईदि. ५ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत (लिडकॉम) मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात चर्म उत्पादनांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.

 व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्यादि.२९ सप्टेंबर ते दि.१ ऑक्टोंबर२०२५ या कालावधीत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटआदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईकेसामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भेट दिली. तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे व आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी या प्रदर्शनासाठी मार्गदर्शन केले.

  राज्यात चर्मोद्योगाचा विकास करुन चर्मोद्योगातील कारागिरांचा व तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि चर्मवस्तु व पादत्राण उत्पादनाकरिता बाजारपेठ उपलब्ध करुन देणेतसेच चर्मोद्योगास प्रोत्साहन देऊन त्याच्या विकासाला चालना देणे हे या महामंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. राज्यात या महामंडळाची चार उत्पादन केंद्रे असुन सहा ठिकाणी चर्मवस्तु व पादत्राणांची विक्री केंद्रे आहेत. महामंडळातर्फे उत्पादित केल्या जाणा-या राज्यातील चर्मकार समाजातील कारागिरांनी तयार केलेल्या चर्मवस्तु व पादत्राणांना आणि विशेष करुन कोल्हापुरी चप्पलना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करुन देणे. त्यांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी तसेच कारागिरांना बाजारपेठ मिळावी यादृष्टीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांनी सांगितले.

राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सवानिमित्त कार्यक्रम; “बहार-ए-उर्दू” चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सवानिमित्त कार्यक्रम;

बहार-ए-उर्दू चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

               

मुंबईदि. ५ : महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होत असून या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बहार-ए-उर्दू महोत्सवाचे उद्घाटन  उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अल्पसंख्याक विकास व औकाफ  मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे. हा साहित्य व सांस्कृतिक  महोत्सव ६ ते ८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान एस व्ही पी स्टेडिअम डोमलाला लजपत राय मार्गवरळीमुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.  

            महोत्सवात उर्दू साहित्य व संस्कृती प्रदर्शनदेशभरातील नामवंत शायर आणि कवींचे कवी संमेलन व मुशायराउर्दू भाषेतील साहित्यिकांचा गौरव, पारितोषिक वितरण सोहळा तसेच नाट्यसंगीत आणि विविध कलाविष्कारांचे सादरीकरण होणार आहे. तसेच उर्दू साहित्य आणि भाषाविकासावर संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या महोत्सवात विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमात उर्दू साहित्यकविताकला आणि संस्कृतीचा विविधांगी आविष्कार रसिकांना अनुभवता येईलअसे आवाहन विभागाने  सर्व उर्दूप्रमी नागरिकांना केले आहे.

पूरबाधित क्षेत्रात साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी निर्जंतुकीकरण होणे

   मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या कीपूरबाधित क्षेत्रात साथीचे रोग पसरू नयेतयासाठी निर्जंतुकीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या भागात निर्जंतुकीकरणाचे (चुन्याची फक्की / फिनेल / पोटॉशिअम परमॅग्नेट इ.) औषधी फवारुन घेण्यासाठी ग्रामपंचायतीची मदत घेण्यात यावी. रोगप्रतिबंधक लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे. पशुसंवर्धन विभागाच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आवश्यक औषधी/ लस साठा उपलब्ध ठेवण्यात यावे. तसेच आवश्यकता भासल्यास नजिकच्या जिल्ह्यातून औषधीलस साठा उपलब्ध करुन घेण्यात यावी. पुरामध्ये अडकलेल्या जनावरांचे स्थलांतरण सुरक्षित जागी करण्यात यावी. तसेच बाधित परिसरातील जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 

पशुसंवर्धन विभागाला सर्व आवश्यक मदत जसे कीवाहन उपलब्धताअतिरिक्त मनुष्यबळचाऱ्याची उपलब्धताजनावरांना तात्पुरते आश्रयस्थान तयार करणे आदींसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच पशुसंवर्धन विभागाला आपत्कालीन निधीतून तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. अतिरिक्त मनुष्य बळाची आवश्यकता भासल्यास नजिकच्या जिल्ह्यातून मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित प्रादेशिक पशुसवंर्धन सहआयुक्तांनी पार पाडावीअसेही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर राबविण्यास दिलेल्या परवानगीचे

 मुख्यमंत्र्यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजना’ ही प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर राबविण्यास दिलेल्या परवानगीचे स्वागत करताना आरोग्यमंत्र्यांनी सांगितले कीया योजनेंतर्गत होणाऱ्या उपचारांसाठी नागरिकांनी खासगी रुग्णालयांऐवजी शासकीय रुग्णालयांना प्राधान्य द्यावेयासाठी आवश्यक सुविधावातावरण आणि उपचाराची गुणवत्ता शासकीय रुग्णालयांत असली पाहिजे. यामुळे शासकीय योजनांचा निधी शासकीय रुग्णालयांकडे वळेल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल. शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा व दर्जेदार औषधसाठा ठेवला गेला पाहिजेऔषध खरेदी प्रक्रियेत गैरप्रकार झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी लवकरच स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईलअसेही आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

शासकीय रुग्णालयांमध्ये उत्तम आहार पुरवठा व स्वच्छतेबाबत दक्षता घ्या

 शासकीय रुग्णालयांमध्ये उत्तम आहार पुरवठा व स्वच्छतेबाबत दक्षता घ्या

- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

 

मुंबईदि. २६ : राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना उत्तम दर्जाचा पौष्टिक आहार पुरवला गेला पाहिजे. तसेच रुग्णसेवा आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही कुचराई झाल्यास ती खपवून घेतली जाणार नाहीअसे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.

आरोग्यसेवा आयुक्तालयमुंबई येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत असलेल्या आरोग्य संस्थांमधील स्वच्छता सेवाधुलाई सेवाआहार सेवाऔषध पुरवठा आणि मनुष्यबळ सेवा आदी बाबींचा आढावा आरोग्यमंत्र्यांनी घेतला.

आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले कीरुग्णालयात दाखल रुग्णांना पौष्टिक व दर्जेदार आहार मिळाला पाहिजे. रुग्णालय व परिसराची अंतर्बाह्य स्वच्छता ठेवला गेला पाहिजे. तसेच पुरेसा औषधसाठा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. या सर्व बाबींची काटेकोर तपासणी केली जाईल. संचालकसहसंचालक व उपसंचालक यांनी रुग्णालयांना आणि आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा.

रुग्णालयात आलेल्या रुग्णाला प्रसन्न व समाधानकारक वातावरण मिळाले पाहिजे. रुग्णालयांमध्ये अस्वच्छता आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. तसेच स्वच्छता सेवेसाठी नियुक्त कंत्राटदार कामगारांना करारानुसार पगार देत आहेत कायाचीही काटेकोर पडताळणी करण्यात यावी, असे आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

समुदाय पातळीवर जागरूकता मोहीम, गृहभेटी

 समुदाय पातळीवर जागरूकता मोहीमगृहभेटी

संसर्गजन्य आजाराची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व गोदरेज कन्झ्युमर कंपनीने समुदाय पातळीवर जागरूकता मोहीमगृहभेटी यासारख्या विविध योजना राबविल्या आणि आरोग्य व पोषण दिनांच्या माध्यमातून नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले. या उपक्रमातून १ लाखांहून अधिक घरांना भेटी देण्यात आल्या. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातच ५२ हजारांहून अधिक लोकांना याचा थेट लाभ मिळाला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग व गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टच्या या एम्बेड प्रकल्पामुळे राज्यात २०२४ मध्ये डेंग्यू मृत्यूंची संख्या २७ टक्क्यांनी घटली असून तपासण्यांचे प्रमाण १३ टक्क्यांनी वाढले आहे. त्याचबरोबर मलेरियाच्या तपासण्यात वाढ करून लवकर निदान आणि उपचार करण्यात येत आहे. भविष्यात आजाराची जलद तपासणी आणि तत्काळ उपचार होण्यास गती मिळणार आहे.  

000

Featured post

Lakshvedhi