Sunday, 5 October 2025

राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सवानिमित्त कार्यक्रम; “बहार-ए-उर्दू” चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

 राज्य उर्दू साहित्य अकादमीचा सुवर्ण महोत्सवानिमित्त कार्यक्रम;

बहार-ए-उर्दू चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन

               

मुंबईदि. ५ : महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या स्थापनेस ५० वर्षे पूर्ण होत असून या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त बहार-ए-उर्दू महोत्सवाचे उद्घाटन  उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अल्पसंख्याक विकास व औकाफ  मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते होणार आहे. हा साहित्य व सांस्कृतिक  महोत्सव ६ ते ८ ऑक्टोबर २०२५ दरम्यान एस व्ही पी स्टेडिअम डोमलाला लजपत राय मार्गवरळीमुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.  

            महोत्सवात उर्दू साहित्य व संस्कृती प्रदर्शनदेशभरातील नामवंत शायर आणि कवींचे कवी संमेलन व मुशायराउर्दू भाषेतील साहित्यिकांचा गौरव, पारितोषिक वितरण सोहळा तसेच नाट्यसंगीत आणि विविध कलाविष्कारांचे सादरीकरण होणार आहे. तसेच उर्दू साहित्य आणि भाषाविकासावर संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या महोत्सवात विविध मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमात उर्दू साहित्यकविताकला आणि संस्कृतीचा विविधांगी आविष्कार रसिकांना अनुभवता येईलअसे आवाहन विभागाने  सर्व उर्दूप्रमी नागरिकांना केले आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi