Wednesday, 17 September 2025

नंदुरबार जिल्हा आरोग्य सुविधांबाबत परिपूर्ण करावा. राज्यात दिशादर्शक ठरेल

 तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातआवश्यक प्रमाणात रक्त पुरवठा उपलब्ध करून देण्याचे सूचित करुन मंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले कीनंदुरबार जिल्हा आरोग्य सुविधांबाबत परिपूर्ण करावा. राज्यात दिशादर्शक ठरेल असे काम नंदुरबार जिल्ह्यात करायचे आहे.आरोग्य यंत्रणांनी स्वच्छतेसह  गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची कटाक्षाने काळजी घ्यावी.

नंदुरबार जिल्ह्यात रक्त साठवण सुविधा उपलब्ध करून द्यावी. यंत्रणा प्रमुखांनी दुर्गमग्रामीण भागातील आरोग्य सुविधावर खबरदारी पूर्वक नियंत्रण ठेवावे, गरजूंना चांगल्या दर्जाचे औषध तसेच उपचार सुविधा द्याव्यात. इनहाऊस लॅब सक्षमीकरणावर विशेष लक्ष द्यावे.  तसेच या भागातील कुपोषण सिकलसेलवर भरीव उपाय योजना राबविण्यात याव्यात. या सर्व कामांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रभावी नियंत्रण ठेवावे, असे मंत्री श्री.आबिटकर यांनी संबंधितांना सूचित केले.

००००

नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत टास्क फोर्सने अभ्यास दौरा करून अहवाल द्यावा - आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश

 नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत टास्क फोर्सने

अभ्यास दौरा करून अहवाल द्यावा

-         आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

 

मुंबई, दि. १७ :- राज्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणास शासनाचे प्राधान्य दिले असून ग्रामीणदुर्गम भागातही दर्जेदार आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. या दृष्टीने आठवडाभरात नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा अभ्यास दौरा करून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

 

मंत्रालयात राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (SHSRC) सोबत आयोजित बैठकीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधितांना सूचित केले. बैठकीस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग तसेच संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

 

यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नंदुरबार येथील सिकलसेल अनेमियाथैलेसिमीया व कंजानायटल अनॉमोली बाबत टास्क फोर्स तयार करण्याचे निर्देश देऊन टास्क फोर्सने आठवडा भरात नंदुरबार जिल्ह्याचा अभ्यास दौरा करूनत्याचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे सूचित केले.

 

जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया

 जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया

 - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

·                     नदीजोड प्रकल्प संदर्भात सह्याद्री अतिथी गृह येथे गुंतवणूकदार व बँकर्स समवेत चर्चासत्र

 

मुंबईदि. १७ :- सिंचन क्षेत्राचा विस्तारशेतीउद्योग व घरगुती वापरासाठी दीर्घकालीन जल नियोजनआणि पाण्याचा प्रत्येक थेंब  सिंचनासाठी हेच नदीजोड प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट आहे. मोठ्या जलप्रकल्पांमुळे शाश्वत विकासदुष्काळ नियंत्रण आणि संतुलित प्रगती साध्य होईल असे सांगतभविष्यात जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करुयाअसे आवाहन जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.

राज्यात हाती घेण्यात येत असलेल्या नदीजोड प्रकल्पासंदर्भात गुंतवणूकदारांशी चर्चा करण्यासाठी सह्याद्री अतिथी गृह येथे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात मार्गदर्शन करताना जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील बोलत होते. यावेळी  मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविण परदेशीजलसंपदा विषयक सल्लागार श्रीराम वेदिरेजलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूरसचिव संजय बेलसरे यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इन्फास्ट्रक्चर कंपनीबँकर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यातील जलसंपदा विकासाला नवी दिशा देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या दिवशी चर्चासत्र होत असल्याचे सांगून जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील म्हणालेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने राज्याच्या जलसिंचनामध्ये भरीव वाढ करण्यास प्राधान्य दिले आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांत तज्ज्ञखासगी भागीदारवित्तीय संस्था तसेच जनतेचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असल्याचेही जलसंपदा मंत्री श्री. विखे- पाटील यांनी यावेळी सांगितले.

राज्यात उभारण्यात येणारे सर्वच नदीजोड प्रकल्प परिवर्तनकारी ठरतील. या प्रकल्पांमुळे  पाणीटंचाई दूर होऊन विकासाचा समतोल साधण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे त्यांची आर्थिक संपन्नता होणार आहे. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधीमध्ये वाढ होणार आहे. यासोबतच शहरी अर्थव्यवस्था व औद्योगिक वाढीसही चालना मिळेल. पुढील पिढ्यांसाठी पाण्याची उपलब्धता होणार असल्यामुळे त्यांच्यापुढे येऊ घातलेले पाणी टंचाईचे संकट दूर होणार आहेअसा विश्वास जलसंपदा मंत्री श्री. विखे- पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

जलसंपदा मंत्री श्री. विखे- पाटील म्हणालेनदीजोड प्रकल्पासाठी आवश्यक परवानेवित्तपुरवठाजमीन अधिग्रहण आदि विषय प्राधान्याने सोडवले जातील. या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणाऱ्या हितधारकांकडून नवनवीन कल्पना व सहयोगी उपायांचे स्वागतही करण्यात येईल.

मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी आणि जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी दमनगंगा- वैतरणा- गोदावरीनार- पार- गिरणादमनगंगा- एकदरे- गोदावरीवैनगंगा- नळगंगा आणि उल्हास- वैतरणा-गोदावरी या नदीजोड प्रकल्पाबाबत माहिती दिली.  नदीजोड प्रकल्पासंदर्भातील चर्चासत्रात १३ कंपन्यांच्या २२ प्रतिनिधींनी आणि सहा बँकर्सच्या १५ प्रतिनिधींनी सहभाग घेतला .

सह सचिव तथा मुख्य अभियंता प्रसाद नार्वेकर यांनी सादरीकरण केले. तर जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे यांनी आभार मानले.

०००००००

आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत उद्यापासून 2 दिवसीय बांबू परिषद; जगभरातील तज्ज्ञ, अभ्यासक व गुंतवणूकदार राहणार उपस्थित

 वृत्त क्र. ३७४०

आंतरराष्ट्रीय बांबू दिनानिमित्त मुंबईत 

उद्यापासून 2 दिवसीय बांबू परिषद;

जगभरातील तज्ज्ञ, अभ्यासक व गुंतवणूकदार राहणार उपस्थित

पाशा पटेल

 

मुंबईदि. 17 :- बांबू उत्पादनातून आर्थिक चालना मिळण्यासाठी तसेच बांबू उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या "महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन" (MITRA) व फिनिक्स फाऊंडेशन यांच्यामार्फत मुंबईत दोन दिवसांची बांबू परिषद आयोजित करण्यात आली आहे. 18 आणि 19 सप्टेंबर 2025 मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात ही बांबू परिषद होणार आहे, अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण शाश्वत विकास टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल व वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

"बांबू फॉर पीपलप्लॅनेट अँड प्रॉस्पेरिटी : ग्रीन गोल्डग्रीन एनर्जीग्रीन अर्थ" अशी संकल्पना घेऊन या महत्त्वपूर्ण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसाच्या परिषदेतून पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकासासाठी नवी दिशा मिळेल.

श्री. पटेल यांनी सांगितले की, दोन दिवसीय परिषदेत पहिल्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. जगभरातील देशभरातील आणि राज्यभरातील तज्ज्ञअभ्यासकशास्त्रज्ञउद्योजकशेतकरी आणि धोरणकर्ते यांना परिषदेत निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी बांबूपासून इथेनॉलमिथेनॉलथर्मलसाठी बांबू पॅलेट्सलोखंड चारकोललाकूडफर्निचरबांबू कपडे अशा अनेक उत्पादनांसंबंधी चर्चा होणार आहे. शहरी वनीकरणऑक्सिजन पार्कग्रीन बिल्डिंग अशा अनेक नवकल्पना या परिषदेतून पुढे येणार आहेत.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी राज्य शासनाचे प्रतिनिधी, याविषयावरील अभ्यासक आणि  उद्योजकांची गोलमेज परिषद होणार आहे. सुमारे 35 उद्योजक यामध्ये सहभागी होणार आहेत. या परिषदेत 20 हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार आहेत, अशी माहिती पाशा पटेल यांनी दिली.

राज्यमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये बांबू लागवड वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणेनैसर्गिक आपत्ती टाळणेवनक्षेत्र वाढवणे आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी करणे हे शासनाचे ध्येय आहे. त्यानुसारच बांबू लागवडीसाठी राज्य शासन प्रोत्साहन देत आहे. मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी, वनक्षेत्राजवळील शेतामध्ये बांबू लागवड करण्यासाठी मुख्यमंत्री वनसंवर्धन धोरण तयार केले असून त्यावर नागरिकांची मते मागविण्यात आली आहेत. उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी बांबू पिकाला प्रोत्साहन देण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे आणि उद्याचा कार्यक्रम त्या दृष्टीने एक महत्त्वाचा पाऊल आहे.

जागतिक बांबू दिवस 2025, मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

https://forms.gle/8DuP4NgUx7GfvXVQ9

पर्यटनाला चालना देण्यासाठी 'जॉय मिनी ट्रेन' सुरू करणार

 पर्यटनाला चालना देण्यासाठी 

'जॉय मिनी ट्रेनसुरू करणार

- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

             मुंबई, दि. १७ : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. महाबळेश्वर-तापोळा, कोयनानगर-नेहरूनगर या दोन 'जॉय मिनी ट्रेनसुरू करण्यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

            मेघदूत शासकीय निवासस्थान येथे 'जॉय मिनी ट्रेनसुरू करण्याबाबत आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे उपस्थित होते.

            पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, देशात महत्वाच्या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आणि पर्यटन स्थळांचे कमी वेळेत भ्रमण करून देणाऱ्या 'जॉय मिनी ट्रेन' हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम आहे. हा उपक्रम राज्यातील महत्वाच्या पर्यटनस्थळावर सुरू करण्यात यावा. राज्यात माथेरानच्या धर्तीवर हा उपक्रम सुरू करण्यासाठी सर्व स्थानिक विविध परवाने घेणे, सर्व तांत्रिक बाबी तसेच या उपक्रमातून आर्थिक नफा तपासून या उपक्रमाचा प्रस्ताव तयार करण्यात यावा. कमी खर्चात अत्यंत आकर्षक पद्धतीने हा उपक्रम कसा सुरू करता येईल याची विभागाने खात्री करून घ्यावी, असे निर्देश मंत्री श्री. देसाई यांनी यावेळी दिले.

महाराष्ट्र-श्रीलंका यांच्यामधील व्यापार संबंध अधिक दृढ होतील

 महाराष्ट्र-श्रीलंका यांच्यामधील व्यापार संबंध अधिक दृढ होतील

- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

 

मुंबईदि. 17 : श्रीलंकेच्या नव नियुक्त महावाणिज्यदूत प्रियंगा विक्रमसिंघे यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या भेटीत परस्पर सहकार्य वृद्धीसाठी सकारात्मक चर्चा झाली. महाराष्ट्र आणि श्रीलंका यांच्यातील व्यापारसंबंध अधिक दृढ होतीलअसा विश्वास जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केला.

श्रीलंका वाणिज्य दूतावास आणि महाराष्ट्र शासन तसेच वाणिज्य मंडळांमध्ये नियमित संवादातून व्यापार वृद्धीचे प्रयत्नमसालेवस्त्रोद्योगपर्यटनडिजिटल तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये मुंबईत विविध व्यावसायिक परिषदा आयोजित करणेव्यापार वृद्धीसाठी सुरळीत कस्टम्स प्रक्रियाबाजारपेठेतील प्रवेश आणि व्यापारी प्रतिनिधीमंडळांना सुविधाकृषी-आधारित उत्पादनेचहा आणि डिजिटल सेवा या क्षेत्रांत विकासाच्या संधी आदी बाबींवर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.

याचबरोबर फळेभाज्याप्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ व खते श्रीलंकेत निर्यात करणे, वस्त्रोद्योगहातमाग व फॅशन क्षेत्रात संयुक्त उपक्रम राबविणे, बौद्ध परिक्रमा आणि महाराष्ट्रातील किल्ले व समुद्रकिनारे आदी ठिकाणच्या संयुक्त पर्यटनास प्रोत्साहन देणे, आयटी सेवाफिनटेक आणि स्टार्टअप भागीदारीस चालना देणे, नवीकरणीय ऊर्जेतील प्रकल्प आणि बंदर संपर्क सुधारणा करून वेगवान व्यापार साध्य करणे आदी क्षेत्रांतील व्यापार वृद्धीच्या संधींवर देखील बैठकीत भर देण्यात आला.

०००००

परस्पर सहकार्यामुळे महाराष्ट्र-सिंगापूर व्यावसायिक संबंध अधिक दृढ

 परस्पर सहकार्यामुळे महाराष्ट्र-सिंगापूर 

व्यावसायिक संबंध अधिक दृढ

- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

-----

महावाणिज्यदूतांनी दिले सिंगापूर नॅशनल डे रिसेप्शनचे निमंत्रण

मुंबई दि. 17 : सिंगापूरचे महावाणिज्य दूत चेआँग मिंग फूंग यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी वाणिज्यदूतांनी त्यांना येऊ घातलेल्या सिंगापूर नॅशनल डे रिसेप्शन’ साठी निमंत्रण दिले. तसेच सिंगापूरचे उपपंतप्रधान गॅन किम यॉन्ग यांनी नुकत्याच केलेल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या सकारात्मक परिणामांवर चर्चा केली.

            उपपंतप्रधानांच्या  भेटीत पीएसएचा भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (दुसरा टप्पा) आणि कॅपिटल लँड च्या नवी मुंबई डेटा सेंटरची पाहणीमॅपलट्री कंपनीकडून सुमारे तीन हजार कोटींच्या गुंतवणुकीसह औद्योगिक व लॉजिस्टिक पार्क आणि नवीन डेटा सेंटर उभारणीसाठी करारपीएसएचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर भारतातील सर्वात मोठे कंटेनर टर्मिनलशाश्वत जहाजवाहतूक मार्ग आणि डिजिटल व्यापार सुविधा उभारण्यावर लक्ष आदी महत्त्वाच्या मुद्यांच्या माध्यमातून या दौऱ्यामध्ये सिंगापूरने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

            याचबरोबर महाराष्ट्र-सिंगापूर यांच्यातील दीर्घकालीन आर्थिक सहकार्याला नवी गती देण्याबाबत राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल आणि सिंगापूरच्या महावाणिज्य दूतांमध्ये चर्चा झाली. सिंगापूर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा परकीय थेट गुंतवणूकदार आहे. कॅपिटल लँडसारख्या कंपन्यांनी मुंबई व पुण्यातील बिझनेस पार्कडेटा सेंटर आणि लॉजिस्टिक सुविधांमध्ये 19,200 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे.

 

            महाराष्ट्र-सिंगापूर सहकार्यामुळे आयटीसेवा आणि उत्पादन क्षेत्रात रोजगार व विकासाची संधी निर्माण होत आहे. तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांना वेग येत असून हरित व डिजिटल व्यापार मार्गांच्या उभारणीतून शाश्वत आर्थिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे श्री.रावल यांनी यावेळी सांगितले.

०००००

Featured post

Lakshvedhi