तीन टप्प्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या अभियानामध्ये 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीतील पहिल्या टप्प्यामध्ये ‘पाणंद रस्तेविषयक मोहीम’ राबविण्यात येईल. दिनांक 23 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या दुसऱ्या टप्प्यामध्ये ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमासाठी पूरक उपक्रम राबविले जातील. तर, 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या अंतिम टप्प्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक परिस्थितीचा विचार करुन ‘नावीन्यपूर्वक उपक्रम’ राबविले जातील.
सोशल मिडिया मार्केटिंग , पर्सनल वेबसाईट डेव्हल्पमेंट, पर्सनल मोबाईल अॅप डेव्हलपमेंट, न्युज पोर्टल स्लोगन डेव्हलपमेंट, पॉलिटीकल डॉक्युमेंटरी फिल्म,जय हो ०१ ब्लॉग, बायोग्राफी, प्रिंट मिडिया, ऑडीओ, व्हिडीओ, फिल्म, टेलिफिल्म, प्रदर्शन, पथनाट्य, जनजागृती, मेळावे, लोककला, महोत्सव, जत्रा, समारंभ, प्रशिक्षण, मार्गदर्शन केंद्र-अनुदान आर्थिक सहाय्य, कर्ज, कायदा व न्याय विषयक माध्यमातून लक्षवेधी मास मिडिया प्राय. लि. ची वाटचाल राहणार आहे.
Wednesday, 17 September 2025
17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’
महसूली क्षेत्रीय कार्यालयाकडून जनतेस सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 2025-26 या वर्षात मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि. 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि. 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘सेवा पंधरवडा’ साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात राबविण्यात येणारे कार्यक्रम हे यापूर्वीच राबविण्यात येत असून पंधरवड्यादरम्यान व त्यानंतरही निरंतरपणे राबविले जाणारे कार्यक्रम आहेत. तथापि, या कालावधीत ते मोहीम स्वरुपात युद्धपातळीवर राबविले जाणार आहेत.
राष्ट्रनेत्याच्या जन्मदिनापासून राष्ट्रपित्याच्या जयंतीपर्यंत ‘सेवा पंधरवडा’
राष्ट्रनेत्याच्या जन्मदिनापासून राष्ट्रपित्याच्या जयंतीपर्यंत ‘सेवा पंधरवडा’
महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांशी निगडीत असल्याने सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक असण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर या जन्मदिनापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 2 ऑक्टोबर या जयंतीपर्यंत मोहीम स्वरुपात ‘सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत आहे.
आदिवासी आधारभूत किंमत खरेदी योजना – पणन हंगाम २०२४-२५ (खरीप व रब्बी) अंतर्गत धान खरेदी, भरडाई, नियमित अधिकारी/कर्मचारी यांना आरोग्य विमा योजना लागू करणे, महामंडळात ई-ऑफिस प्रणाली लागू करणे
आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून
आदिवासी बांधवांचे सशक्तीकरण करणार
- आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके
· महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ संचालक मंडळाची बैठक संपन्न
मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या सामाजिक व आर्थिक सशक्तीकरणासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत असून या योजनांमध्ये काळानुरूप आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकासासाठी महामंडळाचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले.
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ संचालक मंडळाची बैठक गरवारे क्लब मुंबई येथे घेण्यात आली. या बैठकीस आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त तथा महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या प्रभारी व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, तसेच महामंडळाचे सदस्य उपस्थित होते.
मंत्री डॉ. वुईके म्हणाले, महामंडळामार्फत आदिवासी बांधवांसाठी उपजीविका वृद्धी व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी वेळोवेळी विविध उपक्रम राबविले जातात. धान खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी संबंधित विभागाच्या माध्यमातून धोरण तयार करण्याबाबत मा.मुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्यात येईल. यापुढे महामंडळाच्या बैठका नियमित घेण्यात येतील. महामंडळाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे लाभ वेळेत मिळाला पाहिजे, असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधितांना दिले.
या बैठकीत मागील बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देण्यात आली. बैठकीत महामंडळाची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नागपूर येथे घेणे, महामंडळाचे संचालक व नियमित अधिकारी/कर्मचारी यांना आरोग्य विमा योजना लागू करणे, महामंडळात ई-ऑफिस प्रणाली लागू करणे याबाबत निर्णय घेण्यात आले. आधारभूत किंमत खरेदी योजना – पणन हंगाम २०२४-२५ (खरीप व रब्बी) अंतर्गत धान खरेदी, भरडाई तसेच हंगाम २०२०-२१ ते २०२३-२४ मधील शिल्लक धानाचा ई-लिलाव याबाबत आढावा घेण्यात आला.
हंगाम २०२५-२६ मध्ये धान व भरडधान्य खरेदीसंबंधी प्रस्तावांवर चर्चा झाली. तसेच सन २०२५-२६ या वर्षाचा मंजूर अर्थसंकल्पित निधी व सन २०२६-२७ च्या वार्षिक अंदाजपत्रकाला मान्यता देण्यात आली.
ग्रामीण भागाला रोजगार व आर्थिक बळकटी देण्यासाठी मनरेगाचे कामे वेगाने पूर्ण करा
ग्रामीण भागाला रोजगार व आर्थिक बळकटी देण्यासाठी
मनरेगाचे कामे वेगाने पूर्ण करा
- मंत्री भरत गोगावले
मुंबई, दि. १६ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) ही हाताला काम आणि समृद्धीची हमी देणारी योजना आहे. ग्रामीण भागाला रोजगार व आर्थिक बळकटी देऊन कुटुंबाला आणि गावाला समृद्ध करण्यासाठी मनरेगा अंतर्गत कामांना गती देऊन वेळेत पूर्ण करा, असे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले.
राज्यातील मनरेगा कामांची प्रगती आणि जिल्हास्तरावरील अडचणी याबाबत मंत्री गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृष्य प्रणालीद्वारे आढावा बैठक पार पडली. या बैठकीत रोहयो विभागाचे सचिव गणेश पाटील, मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड, तसेच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी, संबधित अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
मंत्री श्री. गोगावले म्हणाले, केंद्र शासनाने महाराष्ट्रासाठी ठरवून दिलेल्या मनुष्यदिन निर्मितीच्या उद्दिष्टांपेक्षा अधिक संख्येने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. लवकरच विभागनिहाय विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत मनरेगा कामकाजाला नवी दिशा, गती आणि दृष्टी देण्यासाठी योजनांची अंमलबजावणी, निधी मंजुरी, तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय कार्यवाही याबाबत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.
००००
नवा भारत : सांस्कृतिक महासत्ता’ या विषयावरील प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्य
नवा भारत : सांस्कृतिक महासत्ता’ या विषयावरील प्रदर्शनाचे
सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन
मुंबई, दि १६ : सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित “नवा भारत : सांस्कृतिक महासत्ता” या उपक्रमाचा शुभारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते बुधवार, दि. १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे होणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वात भारत सांस्कृतिक महासत्ता म्हणून ओळखला जात आहे. “एक भारत, श्रेष्ठ भारत”या संकल्पनेतून देशातील विविधतेला एकात्मतेत रूपांतरित करताना त्यांनी भारताची सांस्कृतिक ताकद जगासमोर प्रभावीपणे उभी केली.
“नवा भारत : सांस्कृतिक महासत्ता” या उपक्रमांतर्गत भारतीय संस्कृतीचे वैभव, विविधतेतून एकता आणि परिवर्तनाचे दर्शन घडविणाऱ्या निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या हस्ते होणार असून हे प्रदर्शन दि. २३ सप्टेंबर पर्यंत सकाळी ११.०० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले असेल. प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर ज्येष्ठ अभिनेते आणि आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक दीपक करंजीकर यांचे “नवा भारत : सांस्कृतिक महासत्ता”या विषयावरील व्याख्यान लघुनाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले असून हे व्याख्यान रसिकांना नवा विचार देणारे ठरणार आहे. त्यानंतर प्रभात फिल्म्स निर्मित ऐतिहासिक ‘संत तुकाराम’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन होणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर रसिकांना संधी उपलब्ध होईल. तसेच हे प्रदर्शन विनामूल्य असून त्याचा लाभ जास्तीत-जास्त लोकांनी घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड .शेलार यांनी केले आहे.
राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीसाठीच्या सुकाणू समितीत शालेय शिक्षण राज्यमंत्री सहअध्यक्ष
राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मितीसाठीच्या सुकाणू समितीत
शालेय शिक्षण राज्यमंत्री सहअध्यक्ष
मुंबई, दि. 16 : राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे अवलोकन करून आवश्यक बदलांसह राज्याच्या दृष्टीने आवश्यक बाबीचा समावेश, शिफारस व मार्गदर्शन तसेच शैक्षणिक कार्याचे संनियंत्रण आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 मे, 2023 रोजी राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रधान सचिव (शालेय शिक्षण) यांच्याऐवजी समितीचे सहअध्यक्ष म्हणून शालेय शिक्षण राज्यमंत्री आणि समितीचे उपाध्यक्ष म्हणून शालेय शिक्षण विभागाचे सचिव/ प्रधान सचिव/ अपर मुख्य सचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आयुक्त हे समितीचे सदस्य म्हणून कार्यरत राहतील.
शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय शिक्षण घोरण 2020 लागू करण्यात आले आहे. शिक्षण धोरणाची राज्यात टप्याटप्याने अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्य अभ्यासक्रम आराखड्याची निर्मिती हा याचाच एक महत्वाचा भाग आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे अवलोकन करून आवश्यक बदलांसह राज्याच्या दृष्टीने आवश्यक बाबीचा समावेश, शिफारस व मार्गदर्शन तसेच शैक्षणिक कार्याचे संनियंत्रण आणि सुसूत्रीकरण करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये शालेय शिक्षण राज्यमंत्री यांचा सहअध्यक्ष म्हणून समावेश करण्यात आला आहे.
Featured post
-
एक सुट्टी घ्या ... लोक सुट्ट्या का घेत नाहीत याची कारणे काय असावीत बरे...? एक म्हणजे सुट्टी घेणारा माणूस हा गृहपाठ चुकवणाऱ्या मुला प्र...
-
मा. लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ते, गटारे व अन्य मुलभूत सुविधांच्या कामांबाबत. महाराष्ट्र शासन ग्राम ...
-
गुडघे दुखी / ढोपर दुखी कारणे - व्यायामाचा अभाव , वाढलेले जास्त वजन , बद्धकोष्ठता , थंड पाणी / पेय उभ्याउभ्याने ...