Sunday, 14 September 2025

यवतमाळ येथे आज एकूण 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचेशुभारंभ

 विविध विकासकामांचा शुभारंभ

         मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे आज एकूण 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पणभूमिपूजन तसेच उपक्रमांचा शुभारंभ झाला. त्यात आदिवासी विकास विभागाच्या पाच वसतिगृहे व इतर कामे मिळून 51 कोटी रुपये किंमतीच्या कामांचा समावेश आहे. तसेच बांधकाम विभागाची 67 कोटींची कामेमुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेत 11 सौर ऊर्जा प्रकल्प व इतर कामांसाठी 158 कोटी व इतर विविध विभागांच्या 59 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

         जिल्हा प्रशासनातर्फे मिशन कॉम्पिटिटिव्ह एक्सलन्सरोड मेंटेनन्स डिजीटल प्लॅटफॅार्मई-मित्र चॅटबॅाटमिशन उभारीसमग्र डॅशबोर्डप्रोजेक्ट सॅंन्ड मॅपशासन आपल्या मोबाईलवरसी. आर. एफ. ॲन्ड वार रुप डॅशबोर्ड यासह इतर विविध नाविण्यपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. यातील ई-मित्र चॅटबॅाटद्वारे 34 योजनांची माहिती केवळ 2 क्लिकवर नागरिकांना उपलब्ध होणार आहे. उभारी’ ॲपद्वारे गेल्या पाच वर्षातील 770 आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा ऑनलाईन सर्वे करण्यात आला. या कुटुंबांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी उभारी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे. जिल्हा डॅश बोर्डच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा रिअल टाइम आढावा आणि मॉनिटरिंग करणे सोपे होणार असून कमी कालावधीत योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.

शासनाने अनुकंपा तत्वावरील सेवाप्रवेशाचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम

 शासनाने अनुकंपा तत्वावरील सेवाप्रवेशाचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला. त्यात  पंधरा हजार युवकांना अनुकंपातून नियुक्ती देण्यात येणार आहे. सुमारे ३५ मे. वॅट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने शेतीला १२ तास दिवसा वीज मिळत आहे. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास मोफत वीज देण्याचेही नियोजन आहे. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने निधीची कमतरता पडू देणार नाही. पावसाने जिल्ह्यात शेतीघरेपशुधन यांचे नुकसान झाले. त्याची भरपाईही लवकरात लवकर अदा केली जाईलअशी ग्वाही त्यांनी दिली.

आदिवासी समाजासाठी ५४ हजार कुटुंबांना घरे, नळांद्वारे पाणी, उपचारासाठी दवाखाने, वसतिगृह अशा अनेक सुविधा

यवतमाळ =वमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीआदिवासी समाजासाठी ५४ हजार कुटुंबांना घरेनळांद्वारे पाणी,  उपचारासाठी दवाखानेवसतिगृह अशा अनेक सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी विकासासाठी ज्या योजना व उपक्रम आणलेतशी भरीव कामगिरी त्यापूर्वी झालेली नाही. आदी कर्मयोगी योजनेतून जिल्ह्यातील 366 गावांची निवड झाली आहे. योजनेतून राज्यातील 30 लाख युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे. त्यातून स्थानिक नेतृत्वाचा विकास होणार आहे.

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल

   यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पणभूमिपूजन

            आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल

-       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यवतमाळदि. 13 : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या असूनत्यासाठी देशात 1 लक्ष कोटी रू. निधी उपलब्ध करून दिला आहे.  महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरेरस्तेवीजपाणीवसतिगृह व रोजगार अशा सुविधांसाठी योजना-उपक्रम राबविण्यात येत असूनपुढील 3 वर्षांत आदिवासींच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडेलअसा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.

         मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे एकूण 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पणभूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ झालात्यावेळी ते  बोलत होते. मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोडमहसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेआदिवासी विकास मंत्री अशोक उईकेखासदार संजय देशमुखआमदार राजू तोडसामआमदार किसनराव वानखेडेसईताई डहाकेसंजय डेरकरश्याम कोडे,  आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारेविभागीय आयुक्त श्वेता सिंघलजिल्हाधिकारी विकास मीना आदी यावेळी उपस्थित होते.

भोसला मिलिटरी युनिव्हर्सिटीसंरक्षण, उत्पादन व संशोधन आदी विषयासंदर्भातील अभ्यासक्रमाचा समावेश

 भोसला एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर यांनी सांगितले कीसुमारे ५२ एकर परिसर डिफेन्स युनिव्हर्सिटीची सुरुवात होत असून यामध्ये संरक्षणउत्पादन व संशोधन आदी विषयासंदर्भातील अभ्यासक्रमाचा समावेश राहणार आहे. येथे सुसज्ज प्रयोगशाळा व टेस्टिंग फिल्डची व्यवस्था राहणार असून देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून विकसित करण्याचा मानस आहे.

 

प्रारंभी ॲड. अविनाश भिडे यांनी स्वागत केले तसेच विद्यापीठाच्या निर्मिती व भूमिकेसंदर्भात एअर मार्शल एस.बी. देव यांनी माहिती दिली. आभार उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर यांनी मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुर्यरतन डागासदस्य दिलीप चव्हाणरतन पटेलसचिव राहुल दिक्षितकोषाध्यक्ष संजय जोशीकर्नल अमरेंद्र हरदाससारंग लखानीहेमंत देशपांडेमानशी गर्ग आदी उपस्थित होते.

 

00000

भोसला मिलिटरी दिल्यामुळे नागपूर येथे संरक्षण उत्पादन

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांसोबतच निर्यातीला प्रोत्साहन दिल्यामुळे नागपूर येथे संरक्षण उत्पादनभोसला मिलिटरी उद्योगांची सुरुवात झाली आहे. तसेच नागपूर हे संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असल्यामुळे या विद्यापीठाला विशेष महत्व असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

 

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीची निर्मिती तसेच भविष्यातील वाटचाल यासंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. संरक्षण उत्पादन करणाऱ्या विविध संस्थांनी विद्यापीठाच्या माध्यमातून या क्षेत्राला सहाय्यभूत ठरेल असे अभ्यासक्रम असावेतअशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठामार्फत पदवीपदवीका तसेच मास्टर प्रोग्राम तयार करण्यात आले असून यामध्ये संरक्षण उत्पादन व तंत्रज्ञानलिडरशिप ॲण्ड मॅनेजमेंट इनोव्हेशन ॲण्ड डिझाईनइंटरनॅशनल रिलेशन ॲण्ड पब्लिक पॉलिशी तसेच नॉन कन्हेन्शल डिफेन्सस्टडी यासारख्या अभ्यासक्रमाचा समावेश असावाअशी सूचना केली.

 

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीचीभारताच्या संरक्षण, उत्पादन व संशोधन क्षेत्रासाठी विद्यापीठ महत्वाची भूमीका बजावेल

 भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीची सुरुवात करताना संरक्षण उत्पादन तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग घेण्यात येत असून विद्यापीठाचा अभ्यासक्रम तसेच नवसंशोधनतज्ज्ञ मनुष्यबळ निर्मिती संदर्भात विविध सूचना करण्यात आल्या आहेत. भारताच्या संरक्षणउत्पादन व संशोधन क्षेत्रासाठी विद्यापीठ महत्वाची भूमीका बजावेल,अशी अपेक्षा व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीसंरक्षण क्षेत्राची गरज लक्षात घेवून विविध अभ्यासक्रमांचा समावेश व्हावा. जागतिकस्तरावर संरक्षण क्षेत्रात नवतंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे. या क्षेत्रातील उत्पादनाची गुणवत्ता तसेच प्रमाणिकरण यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे. आयआयटी मुंबई प्रमाणेच जागतिक दर्जाचे विद्यापीठ निर्माण व्हावे, ही या संस्थेच्या निर्मितीमागची भूमिका असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

 

संरक्षण क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान असलेली संस्था म्हणून भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीचा विकास करतांना भविष्यात या क्षेत्रातील आव्हानासंदर्भातही येथे नाविन्यपूर्ण संशोधन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांसाठी हे विद्यापीठ मार्गदर्शक ठरेलअसा विश्वास व्यक्त केला.

 

Featured post

Lakshvedhi