Sunday, 14 September 2025

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हडपसर परिसरात विकासकामांची पाहणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वाहतूक कोंडी सोडवा

 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून हडपसर परिसरात विकासकामांची पाहणी

 

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन वाहतूक कोंडी सोडवा

: उपमुख्यमंत्री अजित पवार

 

            पुणेदि.14 सप्टेंबर : (जिमाका वृत्तसेवा): शहरात दिवसेंदिवस वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहेवाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ती सोडवाअसे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले.

 

श्री. पवार यांनी खराडी ते केशवनगर पुलाच्या कामांसह मुंढवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथे वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता स्थळ पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी आमदार चेतन तुपेपुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर रामअपर पोलीस आयुक्त मनोज पाटीलमहानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधीनागरिक  उपस्थित होते.

 

श्री. पवार म्हणालेखराडी ते केशवनगर पुलाचे काम करतांना अत्याधुनिकदर्जेदार साहित्य वापरावे. या पुलामुळे चंदननगरकेशव नगरखराडी परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणार असल्याने कामे गतीने पूर्ण करावे. या भागातील नागरिकांनी पाणीरस्तेपथदिवेकायदा व सुव्यवस्थाबसेस व्यवस्था आदींच्या अनुषंगाने विविध मागण्या केल्या असता त्या प्राधान्याने मार्गी लावण्यात येईलअशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.

 

मूढंवा चौक आणि हडपसर गाडीतळ येथील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता आवश्यक त्या सर्व पर्याय विचारात घेऊन पुणे महानगर पालिकापोलीस प्रशासनपीएमपीएललोकप्रतिनिधींनी मिळून बैठक आयोजित करुन योग्य ती कार्यवाही करावीअशी सूचना श्री. पवार यांनी केली.

अंगणवाडी बांधकामात युनीफॉर्मिटी व आधुनिक तंत्राचा वापर आवश्यक

 अंगणवाडी बांधकामात युनीफॉर्मिटी व आधुनिक तंत्राचा वापर आवश्यक


राज्यातील अंगणवाड्यांच्या बांधकामात एकसमान पद्धत असावी तसेच आधुनिक तंत्राचा वापर करून अंगणवाड्या उभाराव्यात असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. अंगणवाड्या उभारताना राज्यभर एकच पद्धत वापरावी तसेच आधुनिक तंत्राचा वापर करावा. वीज पुरवठा करताना ऊर्जा बचतीसाठी सोलार प्रकल्पाला प्राधान्य द्यावे. तसेच अंगणवाडीमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता वाढावी यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात.


बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी अंगणवाडी महत्वपूर्ण भूमिका बजावत असताना त्यांचे आरोग्य आणि शिक्षण उत्तम दर्जाचे देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्या म्हणाल्या.


००००

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा -

 महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी

विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा

-         महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 11 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामध्ये वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी व आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी विशेष कर्ज धोरण राबविण्यात येत आहे. या कर्ज योजनेशी सांगड घालण्यासाठी महामंडळांनी मुंबई बँकेशी करार करावा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मुंबई बँकेने सुरू केलेल्या विशेष कर्ज योजनाअंगणवाडी बांधकाम संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. या बैठकीस बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरआमदार चित्रा वाघअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलविभागाचे सहसचिव वि. रा. ठाकूरवित्त विभागाचे सहसचिव स्मिता निवतकरसहसचिव मु. प्र. साबळेवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवारमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक आनंद लोमटे आदि अधिकारी उपस्थित होते.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या कीमुंबई बँकेला व्याज परतावा योजनांसाठी प्राधिकृत करून तातडीने सामंजस्य करार करावा. महामंडळाच्या व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार असल्याने यांना अपात्र ठरवता येणार नाही. यासंदर्भात्‍ विशेष सूचना जारी करण्यात याव्यात. या योजनेच्या माध्यमातून मुंबईतील पात्र महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्यास सहकार्य लाभणार आहे.

मुंबई बँकेच्या या उपक्रमांतर्गत महिलांना एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. यामध्ये 5 ते 10 महिला एकत्र येऊन व्यवसाय करू शकतात.  ₹१०,००० ते ₹१,००,००० पर्यंत कर्ज उपलब्ध करण्यात येणार आहे असे मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी सांगितले. मुंबई बँकेची मुंबईत एकूण १६.०७ लाख बचत खाती आहेत. त्यापैकी "माझी लाडकी बहीण योजना" अंतर्गत ५३,३५७ महिलांची शून्य शिल्लक खाती उघडली. पात्र महिलांना शासनाकडून दरमहा ₹१५०० थेट खात्यात जमा होत आहेत.

अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल

 अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल

- उपमुख्यमंत्री अजित पवार

श्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत कामांचा आढावा

 

मुंबईदि. ११ :- महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांच्या मंदिर परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने पूर्ण करण्यात यावीत. या विकास आराखड्यांतर्गत काम करताना मंदिरांच्या मूळ आराखड्याला कोणताही धक्का न लावता प्रत्येक कामाला ‘हेरिटेज टच’ द्यावा. श्री अष्टविनायक मंदिर विकास आराखडा भाविकांना दर्जेदार सोयी देण्याबरोबरच महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसह अर्थव्यवस्थेला नवे बळ देणारा ठरेलअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

श्री अष्टविनायक मंदिर परिसर विकास आराखडा कामांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात झाली. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ राजेश देशमुखपुरातत्व व वस्तुसंग्रहालयमुंबईचे संचालक तेजस गर्गेपुरातत्व व वस्तुसंग्रहालयपुणेचे सहायक संचालक विलास वाहणेमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीरायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेअहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियापुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलरायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसलेअहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेराज्यातील अष्टविनायकांपैकी मयुरेश्वर (मोरगाव)चिंतामणी गणपती (थेऊर)विघ्नेश्वर (ओझर)महागणपती (रांजणगाव)वरदविनायक (महड)सिद्धिविनायक (सिद्धटेक) आणि बल्लाळेश्वर (पाली) या मंदिरांच्या परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने करण्यात यावीत. मंदिराच्या मूळ आराखड्याला कोणताही धक्का न लावता काम करण्यात यावे. अष्टविनायक मंदिर परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना पर्यायी जागा देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावेमंदिर परिसरात अधिक मोकळी जागा उपलब्ध करावी. मूळ मंदिराशी विसंगत ठरणारी परिसरातील बांधकामे काढून टाकून आपत्कालीन स्थितीत मंदिर परिसरात अॅम्ब्युलन्ससह अग्निशमन गाड्या सहज जाऊ शकतील अशी मार्गव्यवस्था ठेवण्यात यावी.

पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राला प्रचंड संधी असून पर्यटनाची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर भर द्यावा. केरळओडिशा यांसारख्या राज्यांच्या धर्तीवर विदेशी पर्यटकपरराज्यातील भाविक आणि नवी पिढीला आकर्षित करण्यासाठी आधुनिक सोयीसुविधाउच्च दर्जाच्या सेवा व पर्यटनाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

***

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना द्या

 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ

अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना द्या

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 सारथीसह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा

 

मुंबईदि. ११ :- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजेयासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावायावर भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कामाचा आढावाही त्यांनी घेतला.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयसहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेनियोजन विभागाचे सहसचिव विवेक गायकवाड यांच्यासह दूरदृश्य प्रणालीव्दारे सहकार आयुक्त दीपक तावरेउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ राजेश देशमुखअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुखमहाराष्ट्र बँकेचे महाव्यवस्थापक अरुण कबाडेअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक आकाश मोरेसहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनागट कर्ज व्याज परतावा योजनागट प्रकल्प कर्ज योजना अशा विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा. या योजनांची माहिती गरजूंपर्यंत योग्य प्रकारे पोहोचविणे ही महत्त्वाची जबाबदारी असल्याचे सांगूनयोजनांचा प्रचार-प्रसार प्रभावीपणे करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये तसेच योग्य लाभार्थ्यांची निवड करून त्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी यासाठी यंत्रणांनी विशेष लक्ष देण्याचे निर्देश देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेमहामंडळाच्या योजनांमुळे तरुणांना व्यवसायउद्योग व उद्यमशीलतेसाठी प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे राज्यात स्वयंरोजगाराच्या संधी वाढीस लागून आर्थिक प्रगतीला चालना मिळते. त्यामुळे या योजना अधिक प्रभावीपणे राबवून त्याचे परिणाम समाजाच्या तळागाळापर्यंत दिसून यावेतयासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कामाचा आढावा घेतला. सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौशल्य विकासशिष्यवृत्तीस्पर्धा परीक्षा प्रशिक्षणसंशोधनस्वाधार योजनापरदेशी शिष्यवृत्ती योजना व वसतिगृह यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्य विकास व प्रशिक्षणाला प्राधान्य द्यावे. तसेच मुलांच्या शिक्षण व प्रगतीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

***

धुळे येथील संदेशभूमी ट्रॅव्हलर्स बंगला ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करा

 धुळे येथील संदेशभूमी ट्रॅव्हलर्स बंगला ऐतिहासिक वास्तूंच्या यादीत

समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव सादर करा

— विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

 

मुंबईदि. १२ : धुळे येथील संदेशभूमी ट्रॅव्हलर्स बंगला (सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेस्ट हाऊस क्रमांक २) या वास्तूस ऐतिहासिक वास्तूंची मान्यता मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

 विधानभवन येथे धुळे येथील संदेशभूमी ट्रॅव्हलर्स बंगला वास्तूस ऐतिहासिक वास्तूंची मान्यता मिळण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाल्या.तर मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि धुळे येथील कृती समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणालेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही वास्तू ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत मोलाची आहे. त्यामुळे तिचा ऐतिहासिक वास्तूत समावेश करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा.

संबंधित जागेची कागदपत्रे संबंधित यंत्रणेकडून घेवून अद्यावत करून घेवून या विषयावर सामाजिक न्यायमंत्री यांच्या उपस्थितीत पुढील बैठक लवकरच घेण्यात येणार असल्याची माहिती धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिली.

धुळेकरांसाठी ही वास्तू अभिमानाची बाब असूनडॉ. आंबेडकरांच्या स्मृतींशी निगडीत हा ठेवा ऐतिहासिक वास्तूच्या रूपाने जतन करणे हे आपले कर्तव्य आहे. पुढील पिढ्यांसाठी हा वारसा जतन करणे गरजेचे असल्याचेही श्री. बनसोडे यांनी सांगितले.

०००००

राजू धोत्रे/विसंअ/

ऑनलाइन जुगार माफियांवर कठोर कारवाई करावी

 ऑनलाइन जुगार माफियांवर कठोर कारवाई करावी

                                            - विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 

मुंबई, दि. १२ : राज्यात विविध ठिकाणी ऑनलाइन जुगार सुरू असल्याचे समोर आले असूनया जुगार माफियांवर कठोर कारवाई करावी असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे ऑनलाइन जुगार माफियांविरोधात कारवाईसंदर्भात  बैठक झाली. या बैठकीस पोलीस उपायुक्त शर्मिला सहस्रबुद्धे यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी तसेच तक्रारदार उपस्थित होते.

उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणालेऑनलाइन जुगार थांबविण्यासाठी सर्व प्रकारचे पुरावे जमा करून तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागांनी योग्य नियोजन करून तपास करावा.

नागरिकांनी अशा प्रकारच्या जुगारांमध्ये सहभाग घेऊ नयेअसे आवाहन करताना उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केले. जे नागरिक या जाळ्यात अडकले आहेत त्यांच्या तक्रारी नोंदवून घेण्याचेही निर्देश पोलिसांना दिले जाणार असल्याचे उपाध्यक्ष अण्णा यांनी यावेळी सांगितले.

Featured post

Lakshvedhi