Thursday, 11 September 2025

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा -

 महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी

विशेष कर्ज धोरण योजनेचा लाभ द्यावा

-         महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. 11 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामध्ये वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजनेच्या लाभार्थी महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी व आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी विशेष कर्ज धोरण राबविण्यात येत आहे. या कर्ज योजनेशी सांगड घालण्यासाठी महामंडळांनी मुंबई बँकेशी करार करावा असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

मुंबई बँकेने सुरू केलेल्या विशेष कर्ज योजनाअंगणवाडी बांधकाम संदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. या बैठकीस बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरआमदार चित्रा वाघअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलविभागाचे सहसचिव वि. रा. ठाकूरवित्त विभागाचे सहसचिव स्मिता निवतकरसहसचिव मु. प्र. साबळेवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पवारमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक आनंद लोमटे आदि अधिकारी उपस्थित होते.

मंदिराच्या मूळ आराखड्याला कोणताही धक्का न लावता काम करण्यात यावे. अष्टविनायक मंदिर परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना पर्यायी जागा

 यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेराज्यातील अष्टविनायकांपैकी मयुरेश्वर (मोरगाव)चिंतामणी गणपती (थेऊर)विघ्नेश्वर (ओझर)महागणपती (रांजणगाव)वरदविनायक (महड)सिद्धिविनायक (सिद्धटेक) आणि बल्लाळेश्वर (पाली) या मंदिरांच्या परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने करण्यात यावीत. मंदिराच्या मूळ आराखड्याला कोणताही धक्का न लावता काम करण्यात यावे. अष्टविनायक मंदिर परिसरात राहणाऱ्या स्थानिक रहिवाशांना पर्यायी जागा देऊन त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात यावेमंदिर परिसरात अधिक मोकळी जागा उपलब्ध करावी. मूळ मंदिराशी विसंगत ठरणारी परिसरातील बांधकामे काढून टाकून आपत्कालीन स्थितीत मंदिर परिसरात अॅम्ब्युलन्ससह अग्निशमन गाड्या सहज जाऊ शकतील अशी मार्गव्यवस्था ठेवण्यात यावी.

पर्यटनाच्या दृष्टीने महाराष्ट्राला प्रचंड संधी असून पर्यटनाची अर्थव्यवस्था उभी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यावर भर द्यावा. केरळओडिशा यांसारख्या राज्यांच्या धर्तीवर विदेशी पर्यटकपरराज्यातील भाविक आणि नवी पिढीला आकर्षित करण्यासाठी आधुनिक सोयीसुविधाउच्च दर्जाच्या सेवा व पर्यटनाभिमुख उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.


अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल

  

अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल

- उपमुख्यमंत्री अजित पवार

श्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत कामांचा आढावा

 

मुंबईदि. ११ :- महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांच्या मंदिर परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने पूर्ण करण्यात यावीत. या विकास आराखड्यांतर्गत काम करताना मंदिरांच्या मूळ आराखड्याला कोणताही धक्का न लावता प्रत्येक कामाला ‘हेरिटेज टच’ द्यावा. श्री अष्टविनायक मंदिर विकास आराखडा भाविकांना दर्जेदार सोयी देण्याबरोबरच महाराष्ट्रातील पर्यटनवाढीसह अर्थव्यवस्थेला नवे बळ देणारा ठरेलअसा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

श्री अष्टविनायक मंदिर परिसर विकास आराखडा कामांची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात झाली. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ राजेश देशमुखपुरातत्व व वस्तुसंग्रहालयमुंबईचे संचालक तेजस गर्गेपुरातत्व व वस्तुसंग्रहालयपुणेचे सहायक संचालक विलास वाहणेमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारपुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीरायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळेअहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशियापुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटीलरायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसलेअहिल्यानगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी उपस्थित होते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना द्या

 अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ

अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना द्या

- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

 सारथीसह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा

 

मुंबईदि. ११ :- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजेयासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावायावर भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कामाचा आढावाही त्यांनी घेतला.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कामाचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटीलवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्तानियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजयसहकार विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडेनियोजन विभागाचे सहसचिव विवेक गायकवाड यांच्यासह दूरदृश्य प्रणालीव्दारे सहकार आयुक्त दीपक तावरेउपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ राजेश देशमुखअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुखमहाराष्ट्र बँकेचे महाव्यवस्थापक अरुण कबाडेअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक आकाश मोरेसहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यासाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनागट कर्ज व्याज परतावा योजनागट प्रकल्प कर्ज योजना अशा विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा. या योजनांची माहिती गरजूंपर्यंत योग्य प्रकारे पोहोचविणे ही महत्त्वाची जबाबदारी असल्याचे सांगूनयोजनांचा प्रचार-प्रसार प्रभावीपणे करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी दिले.

महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाच्या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये तसेच योग्य लाभार्थ्यांची निवड करून त्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळावी यासाठी यंत्रणांनी विशेष लक्ष देण्याचे निर्देश देत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणालेमहामंडळाच्या योजनांमुळे तरुणांना व्यवसायउद्योग व उद्यमशीलतेसाठी प्रोत्साहन मिळते आणि त्यामुळे राज्यात स्वयंरोजगाराच्या संधी वाढीस लागून आर्थिक प्रगतीला चालना मिळते. त्यामुळे या योजना अधिक प्रभावीपणे राबवून त्याचे परिणाम समाजाच्या तळागाळापर्यंत दिसून यावेतयासाठी प्रशासनाने जबाबदारीने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधनप्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कामाचा आढावा घेतला. सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांचा कौशल्य विकासशिष्यवृत्तीस्पर्धा परीक्षा प्रशिक्षणसंशोधनस्वाधार योजनापरदेशी शिष्यवृत्ती योजना व वसतिगृह यांसारख्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कौशल्य विकास व प्रशिक्षणाला प्राधान्य द्यावे. तसेच मुलांच्या शिक्षण व प्रगतीसाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीअशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

***

इज ऑफ ड्युईंग बिझनेस मध्ये नव्याने सुधारणा करण्यात येत आहेत. गुंतवणुकीच्या

 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीइज ऑफ ड्युईंग बिझनेस मध्ये नव्याने सुधारणा करण्यात येत आहेत. गुंतवणुकीच्या नवीन संकल्पना राबवण्यात येत आहेत. राज्यात एक्सप्रेस वे चे जाळे उभारले जात आहे. वाढवण बंदरामुळे राज्य सागरी व्यापार क्षेत्रात महत्वाचा भागीदार असणार आहे. संपूर्ण राज्यातील महत्त्वाची ठिकाणे सहा तासाच्या अंतराने वाढवण बंदराशी जोडली जात आहेत. राज्यात सांडपाणी व्यवस्थापनत्यावरील प्रक्रियासौर ऊर्जापायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. त्याचा ऑस्ट्रेलियातील उद्योगांनी फायदा घ्यावा. या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. पुणे येथे नवीन विमानतळ उभारण्यात येत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल. पुण्यात जलद वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांचे नवनवीन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. शासन उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या राऊंड टेबल कॉन्फरन्सपूर्वी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी निमंत्रित व उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीऑस्ट्रेलिया हा शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य देश आहे. अनेक भारतीय विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी जातात. आता हेच शिक्षण नवी मुंबई येथील ‘एज्यूसिटी’ मध्ये मिळणार आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठाशी कुर्निल विद्यापीठाने केलेल्या करारामुळे खाणकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे शिक्षण उपलब्ध होऊन त्याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील लोह उद्योगाला होईल. गडचिरोली ही देशाची लोह राजधानी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी पणन मंत्री जयकुमार रावलऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त फिलीप ग्रीनउद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

०००००

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य

 उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

·         उद्योगांना आणि गुंतवणूकदारांना पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध

 

मुंबईदि. ११ : महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. ‘इज ऑफ ड्युईंग बिझनेस’ अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जियो वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स (आयएबीसीए) ग्लोबल फोरम लिडर्स मीट आणि सीईओंसोबत राऊंटटेबल कॉन्फरन्स वेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.

गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तत्पर असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीराज्य शासन विविध क्षेत्रांविषयी नवीन धोरण आखत आहे. येत्या काळात १४ क्षेत्रांसाठीची धोरणे जाहीर होणार आहेत. त्यामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योजकांना गुंतवणूकदारांना अडचणी येऊ नयेत सर्व परवानग्या लवकर प्राप्त करता याव्यात या साठी मैत्री पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. एक खिडकी योजना असून उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करताना चांगला अनुभव यावा यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अंगणवाडी बांधकामात युनीफॉर्मिटी व आधुनिक तंत्राचा वापर आवश्यक

 अंगणवाडी बांधकामात युनीफॉर्मिटी व आधुनिक तंत्राचा वापर आवश्यक

राज्यातील अंगणवाड्यांच्या बांधकामात एकसमान पद्धत असावी तसेच आधुनिक तंत्राचा वापर करून अंगणवाड्या उभाराव्यात असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. अंगणवाड्या उभारताना राज्यभर एकच पद्धत वापरावी तसेच आधुनिक तंत्राचा वापर करावा. वीज पुरवठा करताना ऊर्जा बचतीसाठी सोलार प्रकल्पाला प्राधान्य द्यावे.  तसेच अंगणवाडीमध्ये पुरवठा करण्यात येणाऱ्या पोषण आहाराची गुणवत्ता वाढावी यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात. बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी अंगणवाडी महत्वपूर्ण भूमिका बजावत असताना त्यांचे आरोग्य आणि शिक्षण उत्तम दर्जाचे देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्या म्हणाल्या.

Featured post

Lakshvedhi